आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • If The Country Goes To War, It Will Only Benefit The Enemy| Article By Makarand Paranjape

चर्चा:देश रणांगण झाला तर त्याचा फायदा तर शत्रूंनाच होणार

औरंगाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज देशात जो जातीय संघर्ष पाहायला मिळत आहे, ते पाहता सलोख्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता असू शकतो, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. द्वेष करणारे आणि मानवविरोधी वगळता देशातील शांतता आणि समृद्धीसाठी राष्ट्रीय एकात्मता आवश्यक आहे, हे जवळपास सर्वच मान्य करतील. पण, ज्यांच्याकडे भारतात अशांतता निर्माण करण्याची क्षमता आहे त्यांच्याकडेही आपण दुर्लक्ष करू शकत नाही. हा स्तंभ त्यांच्यासाठीच आहे.

चला तर मग संघर्षाची मुळे शोधण्याचा प्रयत्न करूया. आज दोन्ही समाजांतील परस्पर अविश्वासाची भावना प्रबळ होत चालली आहे. ही परिस्थिती बहुसंख्य हिंदूंसाठी चांगली आहे, असे काही समीक्षकांचे मत आहे. का? कारण याद्वारे ते अल्पसंख्याकांना धडा शिकवू शकतील आणि त्यांना त्यांची योग्य जागा दाखवू शकतील, असे त्यांना वाटते. त्यासाठी द्वेष, संशय आणि तणाव पृष्ठभागावर कायम राहणे आवश्यक आहे, ज्याद्वारे ज्याला हवे तेव्हा भडकवता येईल आणि इतर समाजातील असामाजिक घटकांना संपवून बहुसंख्यांचे वर्चस्व निश्चित करता येईल. दुसऱ्या बाजूचे द्वेष करणारेदेखील या परिस्थितीत अस्वस्थ नाहीत, यात आश्चर्य वाटायला नको. ते केवळ बहुसंख्य-वर्चस्ववादी विचारसरणीच्या समर्थकांचे मित्रच आहेत. तेही याद्वारे परस्पर अविश्वासाची भावना भडकवू शकतात, हे त्यांचे हित यातून साधते. हिंदू समाज शांतताप्रिय आणि सौहार्दपूर्ण नाही, हे ते सिद्ध करू शकतात. पण परिणाम काय? अखेर यामुळे भारतीय मुस्लिमांमधील परकेपणाची भावना अधिकच बळकट होते. विटेला दगडाने उत्तर दिले जाते. रोजगाराच्या शोधात आलेल्या मुस्लिम तरुणांचा दंगलखोर आणि दगडफेक करणारे म्हणून वापर केला जातो. हे सर्व घडू लागले तर भारतात शेकडो गृहयुद्धे होऊ लागतील, देश रणांगण होईल. आपण आतून पोकळही होऊ आणि जगात आपली प्रतिष्ठाही कमी होईल. शेवटी आपण तेच करू जे देशाच्या शत्रूंना हवे आहे - ‘भारत तेरे टुकडे होंगे, इंशाअल्ला इंशाअल्ला’. उलट असे म्हणायला हवे की, देव असे न करो, असे कधीही होऊ नये. आज देशातील सर्व उजव्या विचारसरणीच्या नागरिकांनी - मग ते हिंदू असो वा मुस्लिम - या सर्वांना एकजुटीने उत्तर द्यावे लागेल, परस्पर अविश्वास आणि द्वेष संपवावा लागेल. सर्व मुस्लिम कट्टरपंथी आहेत किंवा ते हिंदूविरोधी आहेत, त्यामुळे त्यांच्यासोबत शांतता शक्य नाही, असे विचार आपण सोडून दिले पाहिजेत. खरे तर असे म्हणणाऱ्यांना मुस्लिमांनी भारतात द्वितीय श्रेणीचे नागरिक म्हणून जगावे, असे वाटते. मात्र, यामुळे देशात एकता येऊ शकत नाही. खरे तर अल्पसंख्याक समाजाला आपण देशाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असल्याचे वाटू लागले, तर त्याचा फायदा देशविरोधी घटकांनाच होणार आहे. हिंदू मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी स्वीकारलेल्या निवडणूक धोरणांमुळे देशाच्या जडणघडणीचे झालेले नुकसान कधीही भरून निघणार नाही.

दुसरीकडे, भारतीय मुस्लिमांना हेदेखील स्पष्ट झाले पाहिजे की, शांतता आणि सौहार्दाची जबाबदारी कोणत्याही एका समुदायाची असू शकत नाही. भारतीय मुस्लिमांनी एकाकी पडण्याऐवजी शांतता आणि विश्वास निर्माण प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी पुढे आले पाहिजे. हिंदू इफ्तार पार्ट्या आयोजित करू शकतात, तर मुस्लिम रामनवमी किंवा गणेश चतुर्थीचे उत्सव का आयोजित करू शकत नाहीत? हिंदूंच्या मिरवणुकांचे स्वागत का होऊ शकत नाही? मिरवणुकीत येणाऱ्यांवर गुलाबाचा वर्षाव का केला जाऊ शकत नाही, त्यांना फेणी किंवा शेवई का खाऊ घालू शकत नाही? हे सर्व आदर्शवादी वाटेल, पण पूर्वीपासून ते घडत आले आहे. ज्याप्रमाणे दंगली भडकवण्याचे मनसुबे आखले जातात, त्याचप्रमाणे ते हाणून पाडण्याचीही तयारी केली जाऊ शकते. तुष्टीकरणाच्या धोरणामुळे हिंदूंचे नुकसान झाले होते, तर ते वैमनस्य दाखवून आपले स्थान मजबूत करू शकत नाहीत. तुष्टीकरणाच्या उलट आक्रमकता नाही. तसेही आक्रमकतेने कधीच कोणत्याही समस्येवर उपाय निघत नाही. उलट ती नियंत्रणाबाहेर जाऊन सर्वांचेच नुकसान करू लागते आणि इतिहास याला साक्षीदार आहे. सर्व नागरिकांना समान वागणूक देऊनच देशाची प्रगती होऊ शकते. आपल्या राज्यघटनेचा मूळ आत्माही हाच आहे.

(ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.) मकरंद परांजपे जेएनयूमध्ये प्राध्यापक makarandblog@gmail.com

बातम्या आणखी आहेत...