आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • If The Girl Is Taught, Who Should Leave The Security In The Trust? | Marathi News

अग्रलेख:मुलीला शिकवले तर सुरक्षा कुणाच्या भरवशावर सोडावी?

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदिगड विद्यापीठाच्या वसतिगृहातील या लाजिरवाण्या घटनेची देशभर चर्चा होत असून शरमेने काही मुलींनी आत्महत्येचा प्रयत्नही केला. प्रशासन नाकारत असले तरी या गैरकारभारामागे काही संस्थांची उदासीनता असेल. मुलींनी आणि त्यांच्या पालकांनी कोणावर विश्वास ठेवायचा? काही काळापूर्वी बालिकागृह प्रकरणात जिल्हा अधीक्षक आणि होमगार्डवर मुलींना धमकावून प्रभावशाली लोकांच्या घरी पाठवल्याचा आरोप झाला होता. सीबीआय तपासात आरोप खरे असल्याचे आढळून आले. म्हणजे व्यक्ती सोडा, संस्थेवरही विश्वास ठेवता येत नाही. खेड्यापाड्यात अत्याचार करणाऱ्यांकडून दुर्बल घटकातील मुलींकडे टक लावून पाहणे आणि बलात्कारानंतर त्यांची हत्या करणे हे सर्रास झाले आहे. हाथरसच्या घटनेनंतरही या महिन्यात लखीमपूरमध्ये अशीच दुसरी घटना घडली असून, ती संविधान आणि कायद्याला बगल देत आहे. एका राज्यात खेड्यापाड्यात पालकांनी उघडपणे कायद्याचे उल्लंघन केले, आपल्या मुलींना शाळेत पाठवणे बंद केले आणि लहान वयातच त्यांचे लग्न लावून दिले. सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन दर महिन्याला बलात्काराच्या डझनभर बातम्या ऐकू येतात. लाज आणि लोकलज्जेमुळे या मुली आपल्या पालकांना महिनोन््महिने आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराबद्दल सांगत नाहीत आणि शेवटी आत्महत्या करतात. पालकांना सत्य माहीत असूनही पोलिसांकडे तक्रार करण्यास गेले तरी त्यांना बहुतांश घटनांमध्ये घालवून दिले जाते किंवा खटला चालवल्यास तुमचा आणि तुमच्या मुलीचा अपमान होईल, असा अनाठायी सल्ला दिला जातो. आजही भारतात मुलींना मोकळेपणाने शिक्षण किंवा नोकरीचे वातावरण तयार होणार नाही का?

बातम्या आणखी आहेत...