आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआपली अनेक कामे अर्धवट राहतात. अर्धे वाचलेले पुस्तक, अर्धी लिहिलेली कथा. काही शिकायला सुरुवात केली, अर्ध्यातच सोडून दिले. नवीन वर्षात काही ठरवले, ते कधीच पूर्ण झाले नाही. उत्साहाने सुरू केलेले काम मध्येच अडकून पडते. स्टार्ट-अप व्यवसाय सुरू होऊन बंद पडतात. आयुष्यात प्रत्येक काम पूर्ण करणे शक्य नसते, पण प्रत्येक काम अर्धवट राहिले तर काही ना काही अडचण येते. एका ऑस्ट्रेलियन मॅरेथॉन धावपटूने सांगितले की, धावण्यापूर्वी शर्यत पूर्ण करेल, असा विचार करत नाही. दहा मैल धावल्यानंतर पाय दुखू लागले की, त्या वेळी ती पूर्ण करायचे ठरवतो. त्याची खरी शर्यत त्यानंतर सुरू होते. एक मास्टरशेफ एक अप्रतिम डिश बनवत होता. त्यांनी सर्व पदार्थ टाकले, अन्न शिजू लागले, रंग दिसू लागला. पदार्थ तयार झाला का, अशी विचारणा झाल्यावर ते हसले आणि म्हणाले, ही तर सुरुवात आहे. आपण आपल्या कामाची सुरुवात ही आपल्या क्षमतेनुसार एक सामान्य प्रक्रिया मानली पाहिजे, हे आवश्यक आहे. याचा अर्थ विझलेल्या मनाने काम सुरू करावे असे नाही, पण आपण अभूतपूर्व असे काही तरी करणार आहोत, असा आवेशही नसावा. शल्यचिकित्सक ऑपरेशन सुरू करतात त्याच तयारीने आणि काळजीने ते काम सुरू केले पाहिजे. त्या कामाचा निष्कर्ष काय निघेल, हे अर्ध्या वाटेवर गेल्यावरच कळेल. अर्धा रस्ता झाला की मगच काम सुरू होते. मी काही पुस्तके वाचली, त्यांची सुरुवात खूप मनोरंजक होती. अर्ध्या पुस्तकाने मला खिळवून ठेवले, पण त्यानंतर असे वाटले की, लेखकाने कशी तरी कथा पूर्ण केली. चित्रपटांच्या बाबतीतही असे घडते. अर्ध्या प्रवासाचा हा नियम मी वाचताना अंगीकारला की, जोपर्यंत मी अर्धे पुस्तक वाचत नाही तोपर्यंत मी सुरुवात मानणार नाही. त्यासाठी पुस्तकाच्या मध्यभागी एक बुकमार्क ठेवण्यास सुरुवात केली. या पद्धतीनंतर अगदी जाड पुस्तकेही वाचणे सोयीचे झाले. नाही तर पहिल्या पानाला सुरुवात मानून ते कधी संपेल माहीत नाही! अलीकडेच मी माझ्या एका ओळखीच्या व्यक्तीला एका चित्रपटात अभिनय करताना पाहिले. त्याचे फोन करून अभिनंदन केले आणि विचारले की, सोशल मीडियाच्या जमान्यातही तुम्ही याबाबत सांगितले नाही. कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी लोक घोषणा करतात. तोही तेच चिरपरिचित बोलला, आताच काय बोलू? प्रवास तर नुकताच सुरू झाला आहे! असो, सुरुवात आणि शेवट हे फक्त मैलाचे दगड आहेत. पाब्लो पिकासो म्हणाले होते की, एखादे काम किंवा कलाकृती पूर्ण करणे म्हणजे तुम्ही काम मारले आहे, त्याचा आत्मा मेला आहे. चित्रकार चित्र काढतो, तो चित्र पूर्ण करत नाही. जगाला ते परिपूर्ण वाटत असले तरी चित्रकारासाठी ते कधीच परिपूर्ण नसते. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)
डॉ. प्रवीण झा नॉर्वेतील लेखक-डाॅक्टर doctorjha@gmail.com
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.