आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवामान:वेळीच जाग न आल्यास हवामान आणीबाणी जाहीर करावी लागेल

डॉ. राकेश गोस्वामी20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक हवामान संघटनेच्या अहवालानुसार, हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी आपण कितीही पावले उचलली तरी अत्यंत तीव्र हवामानाचा हा प्रकार २०६० पर्यंत कायम राहणार आहे.

गतवर्षी उष्णतेच्या कडाक्याने युरोप इतका होरपळून निघाला की कमाल तापमानामुळे किमान १५ हजार लोकांचा मृत्यू झाला. खंडातील अनेक देशांनी आतापर्यंतच्या सर्वोच्च तापमानाचा सामना केला. ब्रिटनमध्ये प्रथमच पारा ४० अंशांवर गेला. जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलाचे परिणाम वर्षागणिक अधिक भयानक होत आहेत. २०२२ च्या मागील ८ वर्षे पृथ्वीवरील सर्वात उष्ण वर्षे होती. जागतिक हवामान संघटनेने (डब्ल्यूएमओ) नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या ‘स्टेट ऑफ द ग्लोबल क्लायमॅट २०२२’ अहवालात नमूद केले की, २०२२ मधील जागतिक सरासरी तापमान औद्योगिक कालावधीच्या (१८५०-१९०० कालावधी) सरासरीपेक्षा १.१५ अंश सेल्सियस जास्त होते. हवामान बदलाचे वाईट परिणाम टाळण्यासाठी विशेषतः विकसित देश जागतिक तापमानवाढ १.५ अंश सेल्सियसच्या मर्यादेपेक्षा कमी ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. डब्ल्यूएमओने म्हटले आहे की, २०२२ मध्ये मान्सूनपूर्व कालावधीत भारत आणि पाकिस्तानमध्ये तीव्र उष्णता होती, परंतु सर्वात वाईट परिस्थिती युरोपीय देशांत होती, तिथे उष्णतेमुळे मृत्यूंची नोंद झाली.

२०२१ मध्ये कार्बन डायऑक्साइड, मिथेन आणि नायट्रस ऑक्साइड या तीन मुख्य हरितगृह वायूंचे प्रमाण आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर होते. वातावरणातील कार्बन डाय ऑक्साइडचे प्रमाण आता ४१५ भाग प्रति दशलक्ष (पार्ट््स पर मिलियन किंवा पीपीएम) पेक्षा जास्त झाले आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत ४०० पीपीएम हे धोक्याचे चिन्ह मानले जात होते आणि त्याची घनता त्यापेक्षा कमी ठेवण्याचा प्रयत्न केला जात होता. हरितगृह वायूच्या घनतेची वाढ शक्य तितकी कमी ठेवण्यासाठी आता प्रयत्न केले जात आहेत. वातावरणातील हरितगृह वायूंच्या घनतेमुळे ग्लोबल वाॅर्मिंग होते. २०२२ ची आकडेवारी अद्याप जाहीर झालेली नाही. गेल्या वर्षभरात या वायूंची पातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे. यूएस नॅशनल ओशनिक अँड अॅटमाॅस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशन (एनओएए) च्या अहवालानुसार पृथ्वीने दुसऱ्या सर्वात उष्ण मार्चने वर्षाची विलक्षण सुरुवात केली आहे. एनओएएच्या ताज्या मासिक जागतिक हवामान अहवालानुसार, मार्चसाठी सरासरी जागतिक जमीन व समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान २० व्या शतकातील सरासरी १२.७ अंश सेल्सियसपेक्षा १.२४ अंश सेल्सियस होते, ते १७४ वर्षांच्या जागतिक हवामान नोंदींत दुसरा सर्वात उष्ण मार्च म्हणून नोंदवले गेले.

भारतात उन्हाळा दोन महिन्यांचा असतो - ज्येष्ठ (मे-जून) व आषाढ (जून-जुलै). एनओएएच्या नॅशनल सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंटल इन्फर्मेशनच्या (एनसीईआय) जागतिक वार्षिक तापमान आउटलूकनुसार २०२३ हे रेकॉर्डवरील १० सर्वात उष्ण वर्षांपैकी एक असेल, हे जवळजवळ निश्चित आहे. वनक्षेत्रातील घटही याला कारणीभूत आहे. आपण वेळीच जागे झालो नाही, तर न्यूझीलंडप्रमाणे भारतातही हवामान आणीबाणी जाहीर करावी लागण्याचा दिवस दूर नाही.

(ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)

प्रो. राकेश गोस्वामी
आयआयएमसीचे प्राध्यापक