आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उघडी खिडकी:निराशा आणि हिंमत यापैकी एक निवडायचे असल्यास हिंमत निवडा

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे जीवन जितके प्रेरणादायी होते, तितकेच त्यांच्या जीवनावरील द थिअरी आॅफ एव्हरीथिंग हा चित्रपटही कमी प्रेरणादायी नाही. तो २०१४ मध्ये प्रदर्शित झाला आणि स्टीफन यांचे जीवन अशा हृदयस्पर्शी पद्धतीने सादर केले आहे की ते पाहून खुद्द स्टीफनच भावूक झाले होते. तेव्हापासून हा चित्रपट लोकप्रिय झाला आणि त्याने ऑस्करसह महत्त्वाचे पुरस्कार मिळवले. शारीरिकदृष्ट्या असहाय असूनही हिमतीने सर्जनशील योगदान कसे देता येते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा चित्रपट.

तुम्ही अपेक्षेपेक्षा जास्त बलवान आहात... कठीण परिस्थितीला तोंड देत असता तेव्हा तुम्हाला सहानुभूती मिळते, त्यामध्ये कुठे तरी तुम्ही कमकुवत आहात, याला मदतीची गरज आहे, अशी भावना असते. माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्ही अपेक्षेपेक्षा अधिक बलवान आहात. अनेकदा आपण आपल्या क्षमतांना कमी लेखतो आणि इतर आणखी कमी लेखतात. पण स्वतःला आव्हान देऊन पाहा, तेव्हा स्वतःमधील ताकदीचा प्रत्यय येईल.

दृढनिश्चय असेल तर सर्व काही आहे... स्टीफन हॉकिंग त्यांच्याकडे जगण्यासाठी फक्त दोन वर्षे आहेत, असे सांगण्यात आले होते, परंतु ते अनेक वर्षे जगले आणि त्यांनी एक उत्कृष्ट शैक्षणिक कारकीर्ददेखील केली. (स्टीफन यांच्या मोटर न्यूरॉन आजाराबाबत १९६३ कळले, पण ते २०१८ पर्यंत जगले.) प्रबळ इच्छाशक्तीशिवाय हे घडू शकले नसते. निराशा आणि हिंमत यापैकी एक निवडायचे असेल तेव्हा हिंमत निवडा.

आनंद शोधावा लागतो... तुम्ही नुसते बसून सर्व काही आपोआप घडण्याची वाट पाहत राहिलात तर काहीही होणार नाही. कोणत्याही परिस्थितीत असाल तरी काही तरी चांगले करण्याचा प्रयत्न करत राहावे लागेल. आनंद मिळत नाही, तो शोधावा लागतो.

नजर नेहमी वर असावी... स्टीफन हॉकिंग यांच्या जीवनावरील या चित्रपटातून आपल्याला सर्वात मोठा धडा कोणता मिळतो? तो म्हणजे कुठेही असलात तरी नजर नेहमी ताऱ्यांवर, वरच्या बाजूला असावी. हार मानली नाही तर नेहमी काही तरी चांगले करून यशस्वी होऊ शकता.

चित्रपट : द थिअरी ऑफ एव्हरीथिंग दिग्दर्शक : जेम्स मार्श मुख्य कलाकार : एडी रेडमेन, फेलिसिटी जोन्स

बातम्या आणखी आहेत...