आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • 'If You Make A Mistake, It Stays With You, Accept It And Move On' \ Marathi News

इन्स्पायरिंग:‘चूक झाली तर ती तुमच्यासोबतच राहील, हे स्वीकारा आणि पुढे चला’

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘प्रत्येक व्यक्ती वेगळी असते, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. मी अशा समाजात वाढलो जेथे लहानपणीच असे सांगितले जाते, की जोखीम पत्करू नका, सुरक्षित खेळा आणि तुमच्याजवळ जे आहे त्यातच आनंदी राहा. तुमचा पाया मजबूत करण्याच्या दृष्टीने या गोष्टी चांगल्या आहेत. जीवनात तुम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे. वेग आणि नाटकीपणा दाखवून तुम्ही आयुष्यावरील नियंत्रण गमावू शकत नाही. संतुलन साधणेे आवश्यक आहे. मात्र मी सुरक्षिततेएवजी जोखीम पत्करणाऱ्यांपैकी आहे. हा गुण माझ्यात जन्मजात आहे की मी तो विकसित केला आहे, हे मला माहीत नाही. परंतु मला अशी व्यक्ती व्हायचे होते जी अवघड वाटणारे प्रत्येक काम करण्याचा प्रयत्न करते. ते काम आधी कुणी केलेले नाही. असे काम केले तर मला अत्यंत आनंदी आणि सकारात्मकतेची जाणीव होते. याच गोष्टीने मला खेळात सक्षम बनवले आणि व्यवसायातही हाच विचार उपयुक्त ठरतो.

व्यवसाय आणि क्रिकेटमध्ये अनेक साम्य आहेत. क्रिकेटमध्ये तुम्हाला एका सेकंदापेक्षाही कमी वेळेत निर्णय घ्यावा लागतो. तुम्हाला त्यावेळी माहीत असते की तुम्हाला काय हवे आहे आणि तुम्ही काय करणार आहात. ही समज क्रिकेटमध्ये मोठी भूमिका पार पाडते. व्यवसायातही असेच असते. तुम्ही जर अंतर्वस्त्रांच्या व्यवसायाचा विचार करत असाल आणि फिट दिसत नसाल तर हे स्पष्ट आहे की तुम्ही कोणतीही तयारी केलेली नाही. तुम्ही एखादे वचन घेतले असेल, तर ते पाळणे आणि त्यानुसार स्वत:ला तयार करणे ही तुमची जबाबदारी आहे. मी जे काही करतो किंवा करू इच्छितो, त्यासाठीच्या आवश्यकता पूर्ण करण्याचा विडा आधीच उचलतो.

चुका झाल्या याची जाणीव
मी क्रिकेटमध्ये अनेक चुका केल्या, मात्र मला त्याची जाणीव आहे. त्या वेळी मला ते योग्य वाटले. ते योग्य नव्हते याची जाणीवही लवकरच झाली. अशा प्रकारे तुम्ही शिकता. मी माणूस आहे, त्यामुळे माझ्याकडून चुका झाल्या. पुन्हा चूक होणार नाही, याकडे तुम्हाला लक्ष द्यावे लागेल. चूक झाली तर ती तुमच्यासोबत राहते, त्याचा स्वीकार करा.

अपयशाला मी घाबरत नाही
मला भीती वाटत नाही. सर्वजण दबावात असतात आणि निराशही होतात. कारण तुमचे मन तुमची फसवणूक करते. मी दबावात नाही असे जर कुणी म्हणत असले तर ते खोटे आहे. यशस्वी नाही झालो तर काय, असा विचार मी करू शकतो, मात्र त्यामुळे खेळणारच नाही, असा विचार करू शकत नाही. अयशस्वी झालो तरी हरकत नाही, ते तर होत राहील.

(२०१९ मध्ये फोर्ब्जशी बोलताना कोहली)

बातम्या आणखी आहेत...