आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा:समस्या दिसल्या तर त्या सोडवा, नोकऱ्या चालत येतील

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चीनमधील शेतकरी आता ‘बहुवर्षीय’ (पॅरेनियल) तांदळाचे वाण वाढवत आहेत. तुम्हाला वाटेल की, हे काय आहे? तांदळाचे पीआर २३ नावाचे वाण एकदा लागवड केल्यानंतर चार वर्षे सलग आठ पिके देईल. हे वाण एकदा कापणीच्या वेळी मुळे मजबूत झाल्यामुळे वेगाने वाढते. चीनच्या दक्षिण प्रांतातील सुमारे ४४,००० शेतकरी या वाणाची लागवड करत आहेत. यातून त्यांची ५८% मजुरीच्या खर्चात आणि ४९% पीक खर्चात बचत होत आहे. कोरोना चीनमधून आला हे जगात सिद्ध झाले असले तरी बहुतांश लोकांचा चीनवर विश्वास नाही, पण भारत हा जगातील चीननंतरचा तांदूळ उत्पादन करणारा दुसरा आणि जागतिक बाजारपेठेतील ४०% मोठा निर्यातदार देश आहे. याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. या वाणाचे उत्पादन ६.८ टन प्रति हेक्टर आहे, ते नियमित सिंचन केलेल्या भाताच्या समतुल्य आहे. म्हणूनच ते कोणी नाकारू शकत नाही. या वाणाची दरवर्षी लागवड करण्याची गरज नसल्यामुळे याला कमी वेळ लागणार असून या शोधामुळे भातशेती पर्यावरणपूरक होऊ शकते. चार वर्षांतून एकदा शेताची नांगरणी करावी लागणार असल्याने यामुळे मातीची धूप किंवा माती वाया जाण्याची मोठी समस्या दूर होईल आणि माती एका जागी राहील, त्यामुळे झाडांना पाण्याची उपलब्धता वाढेल. आर्थिकदृष्ट्या टिकाऊ असल्याने ते गेम चेंजर आहे. हे उत्पादन विकसित करण्यासाठी अनेक वर्षे संशोधन करावे लागले असेल, परंतु यामुळे अन्नधान्याचे दर कमी राहण्यास मदत होईल आणि अन्न पुरवठा कंपन्यांमधील कामगार व मोठ्या शेतकऱ्यांना शेतीचा अभ्यास करण्याची संधी मिळेल हे नाकारता येत नाही. विद्यार्थी यात खूप रस घेत आहेत.

ही समस्या सोडवणारी मानसिकता आहे, कारण लोकसंख्या ८ अब्जांवर पोहोचली आहे आणि ११ अब्जांपर्यंत वाढ थांबणार नाही, तर ज्या वेगाने लोकसंख्या वाढत होती त्यावर परिणाम होईल. तथापि, वस्तुस्थिती अशी आहे की, जगातील निम्म्या लोकसंख्येसाठी तांदूळ हे मुख्य अन्न आहे आणि लोकसंख्या वाढत असताना आपल्याला त्याची अधिक गरज आहे. आशियावर अधिक जबाबदारी आहे, कारण हा खंड बाकी खंडांचे पोट भरतो.

तांदळाच्या बारमाही वाणांची वाढ हा उपासमारीच्या समस्येवर उपाय असल्याचे दिसून येत असताना भारत हळूहळू एक खरी डिजिटल शक्ती बनत असल्याने सायबर हल्ले वाढत आहेत. हे हल्ले थांबवायचे असतील तर छोट्यातील छोट्या उपाययोजना ही येत्या काळात काळाची गरज असेल. सायबर सिक्युरिटीमधील पॅकेज मुख्य प्रवाहातील तंत्रज्ञांपेक्षा ४०-५०% जास्त आहेत. क्लाउड अॅप्लिकेशन आणि सुरक्षा विश्लेषक, इथिकल हॅकर्स, मालवेअर संशोधक, नेटवर्क व सिस्टिम अॅडमिनिस्ट्रेटर, फॉरेन्सिक विश्लेषक, क्रिप्टोग्राफी तज्ज्ञ आणि आयओटी सुरक्षा विश्लेषक यांसारख्या क्षेत्रांचे प्रशिक्षण घेणाऱ्यांना फक्त आयटी पदवीधरांपेक्षा जास्त मागणी असेल. महत्त्वाचे म्हणजे तंत्रज्ञानात ठसा उमटवण्यासाठी अभियंता असण्याची गरज नाही, समस्या सोडवण्याची मानसिकता आणि मजबूत तांत्रिक कौशल्ये मदत करतील.थोडक्यात, मानवी संस्कृती नेहमीच विकासाच्या टप्प्यावर असते. जसजसे पुढे जाल तसतशा नवीन समस्या येतील. अशा अनेक समस्यांपैकी एक निवडण्याची आणि ती हुशारीने सोडवण्याची तुमची मानसिकता असेल तर याचा अर्थ तुम्हाला अधिक पैसे मिळणार आहेत. कालांतराने ही मानसिकता त्या क्षेत्रातील उद्योजक बनवेल.

फंडा असा ः समस्या दिसल्यास पळून जाऊ नका. त्या सोडवल्या तर नोकऱ्या आपोआप चालत येतील.

एन. रघुरामन, मॅनेजमेंट गुरू [raghu@dbcorp.in]

बातम्या आणखी आहेत...