आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजीवनाविषयी एक रोचक कथा आहे. आरोग्य ही प्रत्येकासाठी जीवनातील १ क्रमांकाची प्राथमिकता असली पाहिजे. नंतर तुम्ही शिक्षण घेता, तेव्हा त्याला १० नंबर बनवण्यासाठी त्यात एक ० जोडता. नंतर नाेकरी मिळते तेव्हा एक आणि ० जोडून ही संख्या १०० होते. नंतर पैसा कमावणे सुरू करता, तेव्हा हा आकडा १००० होतो, नंतर लग्न झाल्यावर आणाखी एक ०, नंतर मुले झाल्यावर ० मिळून १,००,००० होतो. नंतर जसेजसे तुम्ही कोट्यधीश, अब्जाधीश होता, त्यात अनेक झीरो जोडून ‘१००००००००००००’ ही संख्या बनते. मात्र जीवनातून जर १ नंबर हातून गेला तर सर्व काही ‘००००००००००००’ राहते.
मला ही कथा रविवारी आठवली, जेव्हा मी इंग्लंडच्या ९६ वर्षांच्या महाराणीला आपल्या ७० वर्षे राजवटीच्या स्मरणार्थ प्लॅटिनम ज्युबिली समारंभाच्या समारोपप्रसंगी बकिंगहॅम पॅलेसच्या बाल्कनीत उभे असताना पाहिले, त्यांनी हिरव्या रंगाचा चमकीचा पोशाख व कोट घातला होता. तो सर्वात प्रतिष्ठित फॅशन डिझायनर स्टीवर्ट प्रवीण यांनी तयार केला होता.
त्यांनी नकळत एक संदेश दिला, असे मला वाटते. तुम्ही जर आपल्या आरोग्याची काळजी घेतली तर तुम्हाला ‘लॉन्जिविटी डिविडंड’ म्हणजेच दीर्घाआयुष्याचा फायदा मिळेल. माझ्या व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून सांगायचे झाले तर समाजाने स्वीकारण्यास सुरुवात करायला हवी की, वृद्ध कामगार अर्थव्यवस्थेत ५० वर्षांपूर्वी जे योगदान देत होते, त्यापेक्षा अधिक योगदान देत आहेत. अनेक दशकांच्या अनुभवासह, त्यांच्यात उत्कृष्ट समस्या सोडवण्याची कौशल्ये आणि प्रत्येक परिस्थितीचे मूल्यांकन करण्याची क्षमता असते.
अनेक अभ्यासांनी असे सुचवले आहे की, वाढत्या वृद्ध लोकसंख्येचा राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमावर कमी दबाव आहे. २०१३च्या तुलनेत आता ६५ वर्षांपेक्षा जास्त हॉस्पिटल बेड घेण्याचा आकडा ९ टक्के कमी झाला आहे, रिकव्हरीची वेळही कमी झाली आहे. कामकाजाचे जीवन चांगले होत चालल्याचे आणि वृद्ध लोक कर आणि जीडीपीमध्ये अधिकाधिक योगदान देत असल्याचे अनेक सर्वेक्षणातून सिद्ध झाले. एका अहवालानुसार, फक्त ब्रिटनमध्ये २०१६-१७ मध्ये १६० अरब पाउंडचे योगदान दिले. नियोक्ता आणि अर्थव्यवस्थेला अधिक काळ जगण्याचा फायदा होत असल्याचे यावरून स्पष्ट होते. पण दुर्दैवाने भारतात, जिथे आपण ४० वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकसंख्येला तरुण राष्ट्र म्हणतो, तिथे समाजात एक गैरसमज आहे की, आरोग्याच्या बाबतीत वृद्ध समाजासाठी ओझे आहेत. मी काही कुुटुंबांना सल्ला दिला तेव्हा मला ही गोष्ट जाणवली, ही मंडळी लग्न जुळवण्यासाठी जमली होती. तेव्हा मुलीच्या आईवडिलांनी मुलाला विचारले की, तुमच्या घरात जुने फर्निचर किती आहे ? याचा थेट संदर्भ घरातील वडिलधाऱ्यांकडे होता. वेगवेगळी कुटुंबे ही ओळ वेगळ्या पद्धतीने बोलतात. किंबहुना आपणच भेदभाव करत आहोत. म्हातारे आपल्यासारखे नाहीत, असे मानणे मूर्खपणाचे आहे. त्यांना नाकारल्यामुळेच समाजात वृद्धाश्रमाची संख्या जास्त आहे, त्यातही वाहतुकीच्या साधनात मोठ्या आणि छोट्या कंपन्यांनी ज्येष्ठांना सूट दिलेली नाही.
सरासरी २७ टक्के लोकसंख्या वृद्ध असल्याने, महाराष्ट्र, पंजाब आणि दक्षिण राज्यांनी त्यांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी डाॅक्टर्सला सल्ला द्यायला हवा, ७० च्या दशकात जेव्हा स्त्रिया कार्यशक्तीचा भाग बनल्या तेव्हा ‘जेंडर डिव्हिडंड’चा लाभ घेतला होता. त्याप्रमाणे नोकरदारांनी कष्टकरी पिढीचा लाभ घ्यावा.
एन. रघुरामन मॅनेजमेंट गुरू raghu@dbcorp.in
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.