आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनाचा धडा:जीवनाचा हा धडा घेतला तर अपयश कधीच येणार नाही

औरंगाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

धाडसी व्हा जीवनात प्रगती आणि स्वातंत्र्याचा एकच मार्ग आहे निडरता. त्यामुळे निर्भय होऊन न्यायासाठी लढा. जे ज्ञान न्यायाच्या कामी येत नाही, ते काही कामाचे नसते. -मदनमोहन मालवीय

चुका करा चुका करण्याचे दार बंद झाले तर नवीन आविष्काराचे मार्गही बंद होतील. त्यामुळे स्वतंत्र व्हा, मग तुम्ही जगातील प्रत्येक गोष्ट मिळवू शकता. -रवींद्रनाथ टागोर

प्रश्न विचारा प्रश्न विचारले तर निसर्ग रहस्यांचे दरवाजे तुमच्यासाठी उघडे करेल. अपयश येऊ द्या, त्यावर अधिकार ठेवा.. अपयश आले नाही तर धडा मिळणार नाही. -डॉ. सी.व्ही. रामन

स्वत: माध्यम व्हा तुम्ही शरीराला धनुष्य बनवा. कर्माला बाण बनवा. ध्येय गाठण्यासाठी स्वत:च माध्यम व्हा. यशासाठी बाहेर पर्याय शोधू नका. – बीकेएस आयंगर

स्वप्ने पाहा ध्येयाच्या मागे चला, त्याचेच स्वप्ने पाहा... त्याचाच विचार करा.. तेच पूर्ण करण्यात मग्न व्हा. रोज एकदा तरी स्वत:शी बेाला, स्वत:ला विचारा, ध्येय कुठपर्यंत आले. - स्वामी विवेकानंद

मनाचे ऐका तुम्ही नेहमी मनाचे ऐका. तुमचे मन आणि शरीर तुमच्या विचारांवर नाचायला हवे. मनाच्या लयीवर नाचा, हे नृत्य तुमच्या आत्मा आणि मेंदूत संतुलन राखेल. - पंडित बिरजू महाराज

लढा.. अज्ञानता सोडा, त्याला झोडून काढा आणि जीवनातून पळवून लावा. बदल घडवायचा असेल तर आधी स्वत: बदला. उठा आणि अधिकारांसाठी लढा. -सावित्रीबाई फुले

बातम्या आणखी आहेत...