आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • If You Want To Do Something Good, You Can Get Rid Of Laziness | Marathi News

सेल्फ हेल्प:काही चांगले करायची इच्छा असेल तर आळस सोडू शकाल

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रिच डॅड पुअर डॅड थोड्याशा लालसेमुळे आळसावर मात शक्य थोडीशी लालसा नसेल, चांगले प्राप्त करण्याची इच्छा नसेल तर प्रगती होत नाही. आपल्या वाट्याला चांगले जीवनामन यावे म्हणून जग प्रगती करते. उत्कृष्ट हवे असते म्हणून नवीन शोध लागतात. तुम्हाल जे करायचे आहे, त्यापासून दूर जात असाल तर स्वत:ला विचारा की त्यात माझ्यासाठी काय आहे? थोडी लालसा बाळगा. आळसावर हा सर्वात जालीम उपाय आहे.

अब्दुल कलामांचे जीवनचरित्र अंतरात्मा तितकाच खरा आहे, जितके हे जीवन अंतरात्मा हा आत्म्याचा तो प्रकाश आहे जो आपल्या मनोवैज्ञानिक हृदयाची कक्षा प्रकाशमान करत असतो. हे तितकेच खरे आहे जितके की आयुष्य खरे आहे. सदाचाराच्या विपरीत एखादा विचार केला जातो तेव्हा तो याला विरोध करतो. अंतरात्मा सत्याचे असे रूप आहे जे चांगले किंवा वाईट याबाबत आपली स्वत:ची कामे आणि भावनांच्या माध्यमातून मार्गदर्शन करत असते.

अवेकन द जायंट विदीन पेहराव हा विचार आणि ऊर्जेला चालना देतो पेहराव हे एक असे यंत्र आहे जो तुमचे विचार आणि ऊर्जा या दोहोंना चालना देतो. प्रेरक वक्ते मार्क जॉर्डन म्हणतात की, छान दिसण्याच्या माध्यमातून तुम्ही समोरच्याला स्वत:बाबत संदेश देता की तुम्ही चांगल्या मूडमध्ये आहात, तुमच्याजवळ पूर्ण अधिकार आहे, तुम्ही तयारीनिशी काम करता, नेहमी सतर्क राहता आणि यशस्वी आहात. वाईट पेहराव तुम्ही बेफिकीर, प्रभावहीन, महत्त्व नसलेले आहात असा संदेश देतो.

माइंडसेट यशसासाठी आवश्यक आहे तुमचा उत्साह तुम्हाला जे काम करायचे आहे ते पूर्णपणे समजून घ्या. जीवनात असे कोणतेही काम करू नका, जे तुम्हाला आ‌वडत नाही. कारण तुम्हाला त्यात आवड नसल्याने ते तुम्ही मन लावून करू शकत नाही. जीवनात प्रगती करायची असेल तर उत्साह खूप उपयुक्त ठरतो याची खूणगाठ मनाशी बांधा. उत्साह नसेल तर मनात नेहमी निराशाजनक विचार येतील आणि तुमची प्रगती खुंटेल.

बातम्या आणखी आहेत...