आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअनुपस्थित असूनही उपस्थित राहणे हे हनुमानजींचे वैशिष्ट्य. श्रीरामांनी देवलोकात जाताना हनुमानजींना सांगितले की, मी गेल्यानंतर तू या जगात राहून माझ्या भक्तांचे विशेषत: रावणासारख्या वाईट गुणांपासून रक्षण कर. रावण हनुमानजींना खूप घाबरत होता. आजही हनुमानजी आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी व मदत करण्यासाठी नेहमी उपस्थित असतात. आपल्या जीवनशैलीत अधीरता आली आहे. अधिक संयम शिकायचा असेल तर हनुमानजींकडून शिका. या अधीरतेमुळे आपल्या जीवनात एखादी घटना घडली की आपण प्रलाप किंवा विलाप करतो. लक्ष्मण मूर्च्छित झाल्यावर श्रीरामांनीही विलाप केला होता. त्यांचा विलाप दूर करण्यासाठी हनुमानजींनी संजीवनी बुटी आणली. विलाप होणे साहजिक आहे, कारण हा भावनांचा विषय आहे. आपल्या आयुष्यात अशी घटना घडली तर आपण विलाप करतो. पण, आपण प्रलाप खूप करतो. इतरांना दोष देणे, निंदा, स्वतःची प्रशंसा, चुकीचे समर्थन करणे. हा सगळा प्रलाप. एकाच घटनेत श्रीराम विलाप करत होते व रावण प्रलाप. हनुमानजी संजीवनी घेऊन आल्याचे समजताच त्याने डोके बडवले. हनुमानजींनी एकच शिकवले की, चांगले काम करत राहा, मी तुमच्या पाठीशी आहे. म्हणूनच तुलसीदासांनी हनुमान चालिसात लिहिले ः ‘सब सुख लहै तुम्हारी सरना, तुम रक्षक काहू को डरना’।
पं. िवजयशंकर मेहता humarehanuman@gmail.com Facebook:Pt. Vijayshankar Mehta
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.