आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा२८ एप्रिलपासून देशाच्या बऱ्याच भागात उष्णतेची लाट आली. या रविवारी बिकानेरमध्ये देशात सर्वाधिक ४७.१ डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली. इतर ठिकाणी बाडमेर, जोधपूर, नागपूर, अकोला, करीमनगर, दुर्गमध्ये ४४ डिग्रीवर तापमान गेले. भारताच नव्हे तर जवळपासच्या इतर देशांचीही हीच परिस्थिती आहे. एकट्या महाराष्ट्रात उष्माघाताने २५ लोकांचा मृत्यू झाला. तापमान वाढल्याने पूर्ण देशाचे शेतकरी उत्पादन १५ ते २० टक्के कमी झाल्याचे बोलत आहेत. उष्माघातामुळे शेतातील कामेही बंद झाली आहेत.
दुसरीकडे, एका अभ्यासात सरपटणाऱ्या प्राण्यांच्या पाचपैकी एक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्याचे पृथ्वीवर विनाशकारी परिणाम होतील, असा इशारा देण्यात आला आहे. सरपटणाऱ्या प्राण्यांवरील आतापर्यंतचे सर्वात मोठे संशोधन गेल्या आठवड्यात “नेचर’मध्ये प्रकाशित झाले होते. त्यात आढळून आले की, सापांपासून सरड्यापर्यंत २१ टक्के सरपटणारे प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, त्याचा परिणाम जगाच्या परिसंस्थेवर होऊ शकतो. ते नामशेष झाल्याने कीटकांची संख्या वाढेल. त्याचा थेट परिणाम अन्नसाखळीवर होईल. ५२ टक्क्यांपेक्षा जास्त तज्ज्ञांनी डेटाचे विश्लेषण केले. यात १७ वर्षे सहा खंडातील ९०० शास्त्रज्ञांनी योगदान दिले. जगातील या दोन मोठ्या घटनांविषयी मी जेव्हा माझा मित्र पर्यावरणशास्त्रज्ञाशी बोलत होतो, तेव्हा त्याने जगभरातील शक्तिशाली होत चालल्या बीफ कंपन्यांकडे माझे लक्ष वेधले. गेल्या वर्षी एकट्या अमेरिकेने एकाच ब्राझील देशातून एक लाख ६० हजार टन बीफ विकत घेतले होते. या वर्षी ब्राझीलकडून दुप्पट घेण्याची अपेक्षा आहे. तुम्ही विचार करत असाल, याचा हवामान बदलाशी काय संबंध? तर उत्तर आहे...
अॅमेझॉनमध्ये जंगल नष्ट होण्याच्या मागे मोठ्या प्रमाणावर पशुपालक जबाबदार आहेत. शास्त्रज्ञांनी अपरिवर्तनीय डायबॅकचा इशारा दिला आहे, मर्यादेपेक्षा ते त्याचे शोषण करत आहेत, ते बऱ्याच बायोम्स (वनस्पती आणि प्राण्यांचे नैसर्गिक अधिवास)साठी जबाबदार आहेत. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, जगातील सर्वात मोठ्या रेन फॉरेस्टचे संरक्षण करण्यात आपण अयशस्वी झालो आहोत, यासाठी जास्त प्रमाणात मांसाचे सेवन करणे जबाबदार आहे.
प्राणी घनदाट जंगले नष्ट कसे करू शकतात, असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. ही कथा कोणत्याही योगायोगाशी संबंधित नसून हेतूशी संबंधित आहे. १९६० च्या दशकात ब्राझीलमध्ये लष्करी हुकूमशाहीचे राज्य होते. अॅमेझॉनच्या या मोठ्या आणि अनियंत्रित क्षेत्रावर परदेशी लोक आक्रमण करू शकतात, अशी भीती त्यांना वाटत होती, म्हणून सेनापती जंगल जिंकण्यासाठी निघाले, तोपर्यंत तेथे कुणीही गेले नव्हते. ते जिंकण्याचे साधन प्राणी बनले, त्यांच्या चाऱ्यांसाठी नवीन जंगलांची निर्मिती थांबली आणि स्वस्तात निर्यात होणारे मांस आणि उत्पन्न दोन्ही मिळू लागले. श्रीमंत आणि गरीब दोघेही अॅमेझॉनकडे धावले, जंगल नष्ट केले, प्राण्यांना जंगलात सोडले आणि कायदेशीर आणि बेकायदेशीरपणे जमिनीवर हक्क दाखवू लागले. ब्राझील मांसाची निर्यात करू लागला आणि अमेरिका आयात करू लागला.
अशा जागतिक परिस्थितीत मांसाचा वापर कमी करण्यासाठी भारतात शाश्वत कृषी व्यवस्थापनाची गरज आहे. विविध कारणांमुळे शेतकऱ्यांचे ३० टक्के उत्पादन गोदामात पोहोचण्यापूर्वीच खराब होते. पर्यावरण आणि आजच्या परिस्थितीवरील परिणाम कमी करण्यासाठी शेतकऱ्यांना आता आपल्यासाठी पाणी, कीटनाशक, खतासह ‘डेटा’ जोडायची गरज आहे. भविष्यात डेटाआधारित हरितक्रांती उपग्रह निरीक्षणामध्ये सेन्सर व्यवस्थापन, मातीचा प्रकार, पाण्याची उपलब्धता, बदलणारी उष्णतेची परिस्थिती, पुराचा धोका, पावसाचा अंदाज आणि कीटकांचा प्रादुर्भाव यांचा समावेश असेल. या सर्वांचे विश्लेषण केल्याने शेतकऱ्यांना वारंवार पीक घेणे, पसंतीचे पीक आणि उच्च उत्पन्न ठरवण्यास मदत होईल.
फंडा असा की, मांसाचा वापर कमी करण्यासाठी आपल्याला ‘फार्मिंग २.०.’ची गरज आहे, त्यामुळे हा ग्रह हिरवागार होऊ शकेल.
एन. रघुरामन मॅनेजमेंट गुरू raghu@dbcorp.in
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.