आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनंत ऊर्जा:मुलांना आदर्श शिकवायचे असतील तर सुरुवात स्वत:पासून करावी लागेल

ज्ञानवत्सल स्वामी, प्रेरक वक्ते आणि विचारवंतएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुलांमध्ये सुधारणा घडवण्यासाठी आधी मोठ्यांना स्वत:त सुधारणा करावी लागेल. फोनचा वापर मर्यादीत करावा लागेल, तेव्हाच तुमच्या कुटुंबाला वेळ देऊ शकाल. कौटुंबिक मूल्यांचा पाया कुटुंबासोबत गुणवत्तापूर्ण आणि चांगला वेळ घालवणे आहे. आम्हाला वाटते की घरात सर्चच जवळपास आहे. मात्र विशेष वेळ काढणे आवश्यक आहे.

कुटुंब मूल्य समजून घेण्यासाठी आपल्याला कुटुंब समजून घ्यावे लागेल. एक संयुक्त कुटुंब ज्यात तीन पिढ्या सोबत राहतात. अाजी- आजोबांसोबत मुलांना शिक्षणाबरोबर संस्कार मिळतात. दुसरे न्यूक्लिअर फॅमिली. ज्यात इलेक्ट्रॉन-प्रोटॉन म्हणजे आई- वडिल आपापल्या वर्तुळात फिरतात किंवा आपल्या कामात व्यस्त असतात आणि मध्ये न्यूट्रॉन अडकून राहतो. तिसऱ्या प्रकारचे कुटुंब आहे वायर्ड फॅमिली. ज्यात कुटुंबाचा प्रत्येक सदस्य कोणत्या ना कोणत्या गॅझेटसोबत वायर्ड आहे, त्यात गुंतलेला आहे. गॅझेटला जास्त वेळ देतात. आज लोकांना देश- विदेशातील सर्व माहिती आहे, मात्र आपल्या मुलांच्या मित्रांबाबत माहिती नाही. आज लोक जेवायला बसले तर एका आता चमचा असतो आणि दुसऱ्या हातात मोबाइल. शेकडो किलाेमीटर अंतरावरून फोन करणारी व्यक्ती आपल्या जवळ बसलेल्यापेक्षा जास्त आवश्यक आहे का? तुमच्या आयुष्यात कोण जास्त आवश्यक आहे, कुटुंबातील लोक की दुसरी व्यक्ती? कुमार मंगलम बिर्ला आणि त्यांची पत्नी नीरजा बिर्ला यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की, बिर्ला हाउसमध्ये अशी परंपरा आहे की, रात्री ८ वाजता प्रत्येक जण आपला फोन जमा करतो. कुमार मंगलम स्वत: आपला फोन आपल्या आईकडे देतात. रात्री ८ ते ८.४५ पर्यंत जेवणाची वेळ असते. त्यानंतर ९.१५ पर्यंत कुटुंबात चर्चेची वेळ असते. आणि ९.१५ नंतर सर्वांना त्यांचे फोन परत मिळतात. म्हणजे कोणाला काही काम असेल तर करता येईल. आपण आपल्या आयुष्यात काय करतोय? तुम्ही वेगळ्या खोलीत मोबाइल वापर आहात. मुले वेगळ्या खोलीत बसून मोबाइल वापरताहेत. ते काय बघताहेत, काय ऐकत आहेत आणि आपल्या अंतर्मनात काय भरताहेत ते तुम्हाला माहित नसते. मग मुले बिघडल्याची तक्रार करता. मुलांना सुधारण्यासाठी आधी मोठ्या स्वत: सुधारावे लागेल.

स्टीव्ह जॉब्सच्या मुलांना फोन दिला नाही अॅपलचे सह संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांनी एकदा त्यांचे मित्र निक बिल्टन आणि त्यांच्या कुटुंबाला जेवणासाठी बोलावले. निकने स्टीव्ह यांना विचारले की, तुमची मुले कोणता आयफोन वापरतात. तेव्हा स्टीव्हच्या मुलाचे वय १३-१४ वर्षे आणि मुलाचे वय ११-१२ असेल. स्टीव्ह यांनी सांगितले, तुम्हीच त्यांना विचारा. दोन्ही मुले खाली मान घालून जेवत होते, मुलांनी ते ऐकले नसावे. निकने पुन्हा स्टीव्ह यांना हाच प्रश्न विचारला. यावेळी स्टीव्हने उत्तर दिले की, ‘आजपर्यंत त्यांच्या मुलांनी आयफोन वा आयपॅडला हातही लावलेला नाही.’ निकने सांगितले, हे ऐकून माझ्या हातातून चमचा सुटलाच होता. निकने या घटनेचा उल्लेख स्टीव्ह जॉब्सच्या चरित्रात केला आहे. स्टीव्हने पुढे उत्तर दिले की, ‘मी आणि पत्नी मिळून मुलांशी बोललो की, तुमच्या सर्व मित्रांकडे आयफोन असेल. जर तुम्हालाही हवा असेल तर हा घ्या आणि त्यांनी समोर ठेवला. मात्र मी तो बनवला असल्याने मला त्याची ताकद आणि त्रुटीबाबत माहिती आहे. जोपर्यंत तुम्ही परिपक्व होत नाहीत, या स्मार्टफोनमुळे तुमच्या शिक्षणावर परिणाम होऊ शकतो. चरित्रावर वाईट परिणाम होऊ शकतो आणि भविष्य बिघडूही शकते. असे नाही की आम्हाला तुम्हाला फोन द्यायचा नाही. मात्र आम्हाला वाटते की जेव्हा तुम्ही १७-१८ च्या परिपक्व वयात याल तेव्हा तुम्हाला फोन भेटावा. दोन्ही मुले समजली. आणि त्यांनी परिपक्व होईपर्यंत आयफोन वापरला नाही. या गॅझेट्सबाबत कुटुंबात शिस्त आणने आवश्यक आहे. फॅमिली टाइममध्ये अडथळा आणणाऱ्या वस्तू दूर करतात. कौटुंबिक मूल्यांसाठी वेळे देणे आवश्यक आहे. आपण सोबत जेवतो वा सोबत टीव्ही बघतो, ही चांगली गोष्ट आहे. मात्र एक समर्पित वेळ देणे खूप आवश्यक आहे.

बातम्या आणखी आहेत...