आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्थात्:बदलत्या हवामानाच्या परिणामामुळे शेतीवर संकट

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोणता इतिहास आपल्यासाठी जास्त मौल्यवान आहे? एक हजार-दोन हजार वर्षांपूर्वीचा की आपल्या सर्वात जवळचा? एखाद्या समाजासाठी कदाचित त्याच्या भविष्यावर परिणाम करणारा इतिहास अधिक समर्पक असतो. आपण घडवत असलेल्या जवळच्या इतिहासाला भेटूया. हा इतिहास आपल्या वर्तमानात पायातल्या खिळ्यासारखा घुसला आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेच्या पायातील खिळ्याचा परिणाम जास्त सखोल आहे. गतवर्षी लवकर आलेल्या उन्हाळ्याने गव्हाचे (रब्बी) पीक नष्ट केले होते. त्यानंतर सुरुवातीचा दुष्काळ आणि त्यानंतरच्या पावसाळ्यात आलेल्या पुरामुळे शेती उद्ध्वस्त झाली. आता उन्हाळी वादळ म्हणजेच अल निनो येत आहे. यामुळे मान्सून अडचणीत येईल. दुष्काळाचे पडघम वाजू लागले आहेत. २००८ आणि २०१४ च्या भीतिदायक आठवणी येत आहेत. हाच आहे आपला सर्वात जवळचा इतिहास. हवामानाच्या परिणामामुळे शेतीसमोर मोठे संकट आहे! सार्वजनिक-अलीकडील इतिहास : अमेरिकन ओशनोग्राफिक एजन्सी आणि ग्लोबल कार्बन अॅटलसने सांगितले की, २०१० ते २०१९ हे दशक १४० वर्षांच्या इतिहासातील सर्वात उष्ण होते. त्यातही २०१९ मध्ये मानवी इतिहासातील सर्वोच्च तापमानाची नोंद झाली आणि समुद्राच्या तापमानातही विक्रमी वाढ झाली. गेल्या ३० वर्षांत समुद्राची पातळी दुप्पट झाली आहे. २०२२ मध्ये जगाचे सरासरी तापमान १.१५ अंश होते, ते १९०० च्या तुलनेत १ ते १.२८% जास्त आहे. पर्यावरणावरील आंतर-सरकारी पॅनेलने २०२२ पर्यंत तापमानवाढ १.०९ अंश सेल्सियसपर्यंत मर्यादित ठेवण्याचे लक्ष्य ठेवले होते. हा संकल्प कधीच निकालात निघाला आहे. आपत्तींचे अर्थशास्त्र : आपत्तींचे अर्थशास्त्र भयानक आकडेवारी सांगते. २०२२ मध्ये पर्यावरणीय आपत्तींमुळे जगाला ३६० अब्ज डाॅलरचे नुकसान झाले. जगातील अग्रगण्य पुनर्विमा दलाल गॅलगरने सांगितले की, यातील फक्त १४० अब्ज डाॅलर नुकसानीचे विमे उतरवले होते. अमेरिकेच्या राष्ट्रीय पर्यावरण केंद्राचा अंदाज आहे की, २०२२ मध्ये केवळ अमेरिकेत सुमारे १८ आपत्तींमुळे प्रत्येक संकटात एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त नुकसान झाले. अमेरिकेबाहेर गेल्या वर्षीची सर्वात मोठी आपत्ती म्हणजे पाकिस्तानातील पूर, त्यामुळे १५ अब्ज डाॅलरचे नुकसान झाले. तिथे विमा संरक्षण नव्हते. भारतात पीक विम्याचीच अद्याप योग्य वाढ झालेली नाही. जोशीमठच्या डोंगरापासून ते मैदानी शेतापर्यंत संतप्त निसर्ग उपजीविका गिळंकृत करत आहे. कशाचा सामान्य मान्सून? : जीडीपीमध्ये शेतीचा वाटा १५% आहे, परंतु लोकसंख्येच्या ४५% रोजगार आहे. हवामानाच्या परिणामामुळे भारताच्या अन्नसुरक्षेच्या पायामध्ये तीन मोठे तडे गेले आहेत. एक- वाढती उष्णता व पाणीटंचाई, दुसरा- अचानक होणारी अतिवृष्टी आणि तीन- सुपीक जमिनीची धूप. सामान्य मान्सून कुठेही सामान्य नाही. उदा. २०२२ च्या सुरुवातीला मान्सून सामान्य होता, परंतु खरीप पेरणीच्या हंगामात संपूर्ण कृषी पट्ट्याला आंशिक दुष्काळाचा सामना करावा लागला. पेरणीला उशीर झाला. मान्सून उशिराने परत जाेणे हा दुहेरी त्रास आहे. गेल्या वर्षी उत्तरेकडील धान्य पट्ट्यातील अनेक भागांत मान्सूनचे आगमन उशिराने झाले आणि जाताना मोठ्या प्रमाणात पूरस्थिती सोडली. मान्सूनच्या या लहरीपणामुळे पिकांची पेरणी व काढणी दोन्ही अडचणीत येतात. क्रिसिलच्या अध्ययनात आढळले की, सामान्य पाऊस असलेल्या क्षेत्रांची संख्या सातत्याने कमी होत आहे. कमी-जास्त पाऊस कायमचा झाला आहे. गेल्या काही वर्षांत सप्टेंबर-ऑक्टोबरचा महापूर हा एक प्रकारे नियमच झाला आहे. पावसाळ्याच्या शेवटी पाऊस हंगामाच्या सरासरीपेक्षा ४७% जास्त आहे. दुष्काळ घशापर्यंत आला आहे : जागतिक हवामान संघटनेचा जागतिक हवामान अहवाल २०२२ सांगतो की, उत्तर प्रदेशातील गव्हापासून ते दार्जिलिंगमधील चहाच्या लागवडीपर्यंत हवामान एक मोठी समस्या आहे. पर्यावरणावरील आंतरराष्ट्रीय आंतरशासकीय समितीचा अंदाज आहे की, २१ व्या शतकात तापमानात एक ते चार अंश सेल्सियस वाढ झाल्यास भारतातील तांदूळ उत्पादन १० ते ३०% आणि मक्याचे उत्पादन २५ ते ७०% कमी होईल. २०१८ मध्ये सरकारच्या आर्थिक सर्वेक्षणानुसार हवामान बदलामुळे भारताचे शेती उत्पन्न पुढील २५ ते ३० वर्षांत १८% कमी होऊ शकते. बिगर सिंचन क्षेत्रात उत्पन्नात २५% घट होईल. गेल्या वर्षी पीक वाचले, पण अन्नधान्य महागाईने पाठ सोडली नाही. कुठे आहे सुरक्षा कवच? : हवामानाचा भरवसा नसल्याने सरकारांना तातडीने धान्य साठवणुकीसाठी मोठी गुंतवणूक करावी लागेल. हंगामी अन्न महागाई प्रक्रियेच्या मदतीने हाताळली जाऊ शकते, परंतु कर कमी असावेत. कृषी संशोधन बदलायला हवे. उच्च तापमानात लवकर तयार होऊ शकणारी तृणधान्ये, कडधान्ये आणि भाजीपाल्याच्या नव्या पिढीची गरज आहे. भारताला गतवर्षी पाच चक्रीवादळांचा सामना करावा लागला, त्यापैकी तीन चक्रीवादळांचा प्रभाव जास्त होता. जर्मनवॉच ग्लोबल क्लायमेट इंडेक्स आणि कौन्सिल फॉर एनर्जी एन्व्हायर्नमेंट अँड वॉटर यांचे अहवाल सांगतात की, १९७० ते २०१९ दरम्यान भारतात पर्यावरणीय आक्रमकतेत अभूतपूर्व वाढ झाली आहे. भारत अशा मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे, जिथे पर्यावरण सर्वात घातक झाले आहे. अनपेक्षित इव्हेंट्स थ्रेट इंडेक्समध्ये भारत आता टॉप २० देशांमध्ये आहे. हवामानामुळे अर्थव्यवस्थेच्या विकासाची सर्व स्वप्ने धुळीस मिळणार आहेत. या उसाशाचा परिणाम व्हायला एक जीवन लागणार नाही. खाद्यपदार्थाचा खर्च किंवा किराणा बिल बघा, परिणाम आधीच सुरू झाला आहे! (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)

अंशुमान तिवारी मनी-९ चे संपादक anshuman.tiwari@tv9.com