आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावर्ष १९६९ मध्ये आलेल्या ‘प्रिन्स’ चित्रपटात वैजयंतीमाला आणि हेलन यांच्यावर नृत्य स्पर्धेचे दृश्य चित्रीत करण्यात आले होते. वैजयंती भारतीय राजकन्येच्या आणि हेलन एका इंग्रज मुलीच्या भूमिकेत होती. वैजयंती यांनी भारतीय नृत्य सादर केले - भरतनाट्यम ते कथ्थक, तर हेलनने फ्लेमेन्को ते बेली डान्स सादर केले. हा पूर्व विरुद्ध पश्चिम सामना होता आणि शम्मी कपूर दोघांमध्ये फ्रीस्टाइल डान्स करत होता. चित्रपटाची पार्श्वभूमी एका राष्ट्रीय कथानकावर आधारित होती, त्यामध्ये सरदार पटेल यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यानंतर ब्रिटिशांशी एकनिष्ठ असलेले संस्थान भारतीय प्रजासत्ताकाचा भाग बनणार होते. हे २०२३ आहे, पण तरीही आपण नृत्य-गाणे हा राष्ट्राभिमानाचा युक्तिवाद आणि साम्राज्यवादी-पूर्वग्रहांचा प्रतिकार करण्यासाठी सादर करत आहोत. ‘आरआरआर’ चित्रपटाबद्दल बोलायचे तर त्यात कोमुराम भीम आणि अल्लू सीताराम राजू एका देशी स्पर्धेत नाचताना दाखवले आहेत आणि त्यांची कला फिरंगी महिलेचे मन जिंकते. सामन्याच्या आधी भीम आणि राम यांना कला कळत नाही, असे सांगून त्यांचा अपमान करण्यात आला. त्यामुळे मिरवणुकीत उपस्थित कृष्णवर्णीय ढोलवादक आणि भारतीय सेवकांना वाईट वाटते. पण, नृत्य सुरू झाला की खेळ उलटतो. ‘नाटू नाटू’ या गाण्याला सर्वोत्कृष्ट गाण्याचा अमेरिकेचा गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला तेव्हा त्यात एक काव्यात्मक न्यायच होता. अनेक दशकांपासून नृत्य आणि गाणी हे भारतीय चित्रपटांचे वैशिष्ट्य आहे आणि ‘नाटू नाटू’ला मिळालेला पुरस्कार हे सिद्ध करतो की, आपण जे चांगले करतो त्यातच आजमावून पाहिले पाहिजे. २००९ च्या ‘स्लमडॉग मिलेनियर’ च्या आंतरराष्ट्रीय यशात त्याचे ‘जय हो’ या प्रसिद्ध गाण्याचेही योगदान होते, ते देव पटेल आणि फ्रीडा पिंटो यांच्यावर छत्रपती शिवाजी टर्मिनसवर नृत्य करताना चित्रित करण्यात आले होते. पूर्वी याला व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणत. देव पटेल फ्रीडा पिंटोला पाहतो तेव्हा ती टर्मिनसची रचना करणाऱ्या ब्रिटिश वास्तुशिल्प अभियंता फ्रेडरिक विल्यम स्टीव्हन्सच्या पुतळ्याच्या पायाजवळ बसलेली असते. राणी व्हिक्टोरियाच्या कारकीर्दीच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त हे १८८७ मध्ये पूर्ण झाले. नुकतेच ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाकडे लक्ष वेधले गेले आहे, तेही नृत्य आणि गाणी हा भारतीय चित्रपटाचा आत्मा असल्याचा पुरावा आहे. अशाच प्रकारे २००२ च्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘देवदास’ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि ऐश्वर्या रायला आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटातील ‘डोला रे’ हे गाणे खूप गाजले. भारतीय चित्रपटांतील नृत्य-गाणीही लक्षणीय आहेत, कारण त्यात अनेक लोकप्रिय प्रवाहांचा समावेश करण्यात आला आहे. वॉल्ट्ज, चा-चा-चा, ट्विस्ट, स्विंग, डिस्को, जॅझ, हिप-हॉप, साल्सा, बेली डान्सिंग, सर्व प्रकारच्या डान्स-मूव्हज भारतीय लोक आणि शास्त्रीय नृत्य प्रकारांसोबत आपल्या चित्रपटांमध्ये पाहायला मिळतील. अलीकडच्या वर्षांत हिंदी चित्रपटसृष्टी आपली वाट चुकली आहे आणि त्यामुळे आपला यूएसपी गमावला आहे, असे दिसते. मात्र, दक्षिणेकडील सिनेमांबाबत, विशेषत: तामिळ आणि तेलुगू सिनेमांबाबत असे म्हणता येणार नाही. कमल हसनने भरतनाट्यमचे प्रशिक्षणही घेतले आहे. जगासाठी चित्रपट बनवण्याचा अर्थ असा नाही की, आपल्याला जे उत्तम जमते ते विसरावे. राजामौली यांच्यामुळे आज पाश्चिमात्य देश प्रभावित होण्याचे कारण म्हणजे पाश्चात्त्य प्रेक्षकांसाठी त्यांची चित्रपटनिर्मिती शैली बदलण्याची गरज नाही, हे मान्य करण्याचे धाडस त्यांच्यात आहे. खरं तर लॉस एंजलिसमध्ये ‘आरआरआर’ प्रदर्शित झाला तेव्हा प्रेक्षक आपली जागा सोडून त्याच्या गाण्यांवर नाचू लागले. अजूनही उशीर झालेला नाही, आपण आपल्या मुळांकडे परत जायला हवे, कारण त्यातच आपण आपले सर्वोत्तम देऊ शकतो. (ही लेखिकेची वैयक्तिक मते आहेत.)
कावेरी बामजई पत्रकार आणि लेखिका kavereeb@gmail.com
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.