आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा}इंडोनेशियाजवळील १७ हजार बेटांपैकी एक बेट बालीदेखील आहे. जावाच्या पूर्वीकडे असलेल्या बालीमध्ये ‘कनंग सारी’ ही परंपरा आहे. हिंदू लोकांची यावर प्रचंड श्रद्धा आहे. ही परंपरा शतकापासून चालत आली आहे. ‘कनंग सारी’मध्ये सारीचा अर्थ त्याचा सार-तत्त्व असा आहे अाणि कनंगचा अर्थ म्हणजे खजुराच्या पानांची छोटी टोपली. पानांपासून बनवलेल्या टोपलीतून देवाला फुले, अगरबत्ती आणि प्रसाद अर्पण केला जातो.
} बालीमधील ही कनंग सारी टोपली केवळ हिंदूंपुरती मर्यादित नाही, तर इतर धर्माचे लोकही त्याचा वापर करतात. साधारणतः खजुराच्या पानांपासून ती टोपली बनवली जाते. त्यात विविध रंगांची फुले ठेवली जातात. यामध्ये पांढऱ्या रंगाची फुले देवाला चढवली जातात, लाल रंगाची फुले ब्रह्मदेवासाठी, पिवळ्या रंगाची फुले महादेवासाठी आणि निळ्या आणि हिरव्या रंगाची फुले विष्णूजींना चढवली जातात.
} बालीमध्ये सार्वजनिक ठिकाणी या कनंग सारी टोपल्या सकाळी-सकाळी विक्रीसाठी ठेवलेल्या असतात. ही टोपली महिला बनवतात. ही त्यांची प्रमुख जवाबदारी असते. देवाला फुले अर्पण केल्यानंतर कनंग सारी म्हणजे ही टोपली, घराच्या दारावर, गाडी किंवा फुटपाथवर ठेवली जाते. बालीमध्ये लोक रोज असे करतात. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते, असे म्हटले जाते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.