आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • In Discussion Guneet Monga | This Is Guneeth's Second Oscar For Sold Sandwiches, A Crowd funded Film Production

चर्चेत - गुनित मोंगा:सँडविच विकले, क्राउड फंडिंगने चित्रपट निर्मिती, गुनित यांचा हा दुसरा ऑस्कर

छत्रपती संभाजीनगर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गुनित मोंगा, यांच्या ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ डाॅक्युमेंट्रीला ऑस्कर पुरस्कार

जन्म ः २१ नोव्हेंबर १९८३, नवी दिल्ली कुटुंब ः पौगंडावस्थेत आपल्या आई-वडिलांना गमावले, डिसेंबर २०२२ मध्ये सनी कपूर यांच्याशी विवाह केला. शिक्षण ः िदल्लीच्या ब्लू बेल्स शालेत शिक्षण. २००४ मध्ये गुरू गोविंदसिंग इंद्रप्रस्थ विद्यापीठातून मास कम्युनिकेशनमध्ये पदवी.

१३ मार्च २०२३... या दिवशी भारतीय सिनेमाने दोन ऑस्कर जिंकले. पहिला पुरस्कार आरआरआरच्या ‘नाटू-नाटू’ या गाण्याला मिळाला. दुसरा पुरस्कार ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ या माहितीपटाला मिळाला. हा माहितीपट बनवण्यात दोन महिलांचा हात आहे, पहिल्या गुनित मोंगा आणि दुसऱ्या कार्तिकी गोन्साल्विस. ३९ वर्षीय गुनित निर्मित ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ डॉक्युमेंट्रीला सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री शॉर्टफिल्मचा पुरस्कार मिळाला, यामुळे ऑस्कर जिंकणारी ही पहिली भारतीय डॉक्युमेंट्री ठरली. लंच बॉक्स, गँग्ज ऑफ वासेपूर आणि मसान या सुपरहिट चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या गुनित यांची जागतिक मनोरंजन उद्योगातील टॉप १२ महिलांमध्येही गणना होते. अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट््स अँड सायन्सेसमध्ये सामील होणाऱ्या गुनित या भारतातील पहिल्या निर्मात्यांपैकी एक आहेत. गुनित मोंगा यांनी ऑस्कर जिंकण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०१९ मध्येही त्यांच्या ‘पीरियड एंड ऑफ सेंटेन्स’ या माहितीपटाने डॉक्युमेंट्री लघु विषयात ऑस्कर जिंकला. गुनित या चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्या होत्या.

२००९ मध्ये ऑस्कर सोहळ्याला जाण्यासाठी नव्हते पैसे गुनित यांनी आपला ‘सलाम इंडिया’ हा पहिला चित्रपट बनवण्यासाठी शेजाऱ्यांकडून पैसे उसने घेतले. हा चित्रपट मुलांच्या क्रिकेटवर आधारित होता, चित्रपट प्रदर्शित झाला त्याच दिवशी भारत विश्वचषकातून बाहेर पडला होता. चित्रपटगृहांमध्येही हा चित्रपट प्रदर्शित झाला नाही. २००९ मध्ये गुनित यांचा ‘पेडलर्स’ चित्रपट ऑस्करसाठी नामांकित झाला तेव्हा त्यांच्याकडे अमेरिकेला जाण्यासाठी पैसे नव्हते. त्यांनी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना पत्र लिहून मदत मागितली. त्याचे त्यांना उत्तर मिळाले. त्यानंतर केंद्रीय मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एअर इंडियाशी बोलून गुनित यांच्या टीमसाठी विमानाची व्यवस्था केली.

सुरुवात : वयाच्या १६व्या वर्षी काम करणे सुरू केले होते गुनित एका पंजाबी मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत, दिल्लीत लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांच्या वडिलांचे नाव दमनजीतसिंग मोंगा आणि आईचे नाव अमरप्रीत कौर होते. गुनित एका संयुक्त कुटुंबात राहत असत, तिथे घरगुती वादामुळे त्यांच्या कुटुंबाला सतत तणावाचा सामना करावा लागत होता. एकदा त्यांच्या वडिलांच्या भावांनी त्यांच्या आईला जिवंत जाळण्याचा प्रयत्नही केला होता, या घटनेनंतरच गुनित यांचे वडील घर सोडून गेले. दुसरीकडे, आईसाठी घर बांधण्याच्या उद्देशाने गुनित यांनी वयाच्या १६ व्या वर्षी काम करायला सुरुवात केली. रस्त्यावर सँडविच विकण्यापासून ते पीव्हीआरमध्ये उद्घोषक म्हणून काम केले.

संघर्ष : ६ महिन्यांच्या आतच आई-वडील गमावले कॉलेजच्या काळापासून गुनित यांनी मुंबईत काम करायला सुरुवात केली. त्यांची कमाई घर बांधण्यासाठी बचतीत भर घालत असे. गुनित यांच्या कुटुंबीयांनी घरही बुक केले होते, पण ६ महिन्यांतच गुनितने आई-वडील दोघेही गमावले. त्यांच्या आईला कॅन्सर होता आणि वडिलांची किडनी निकामी झाली होती. यानंतर त्यांनी घेतलेले घर विकले आणि मुंबईत राहायला गेल्या. यानंतर गुनित यांनी क्रिकेटवर आधारित ‘सलाम इंडिया’ चित्रपटातून चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. गुनित यांचा पहिला मोठा आंतरराष्ट्रीय चित्रपट ‘कवी’ होता, तो २००९ मध्ये प्रदर्शित झाला होता व ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट लाइव्ह अॅक्शन शॉर्टफिल्म श्रेणीसाठी नामांकित झाला होता.

शाळेच्या सहलीला पाठवण्यासाठी वडिलांनी विकले सोन्याचे कडे }लहानपणी गुनित यांना शाळेच्या सहलीसाठी अमेरिकेला जायचे होते, पैशाअभावी तिच्या वडिलांनी सोन्याचे कडे विकले होते. गुनित यांनी संपूर्ण जग पाहावे, अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. }पैसे जमवण्यासाठी गुनित यांनी त्यांच्या ‘पेडलर्स’ चित्रपटाची स्क्रिप्ट फेसबुकवर अपलोड केली होती. त्यानंतर त्यांनी फेसबुकवरून सुमारे १ कोटी रुपये जमा केले होते. }त्यांच्या ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ या माहितीपटासाठी ऑस्कर जिंकल्यानंतर गुनित यांचा पुढचा प्रकल्प हा रॅपर हनीसिंगवरील माहितीपट आहे. हा प्रकल्प लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...