आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारताची अनौपचारिक अर्थव्यवस्था कठीण काळातही आर्थिक उलाढाली करते. बेरोजगारी कमी करण्यात त्याचा मोठा वाटा आहे. कोट्यवधी फेरीवाले, छोटे व्यापारी लोकांना खाण्यापिण्याची, वाहतुकीची साधने आणि इतर जीवनावश्यक वस्तू पुरवतात. पण, आता परिस्थिती बदलत आहे. अनेक स्रोतांकडून मिळालेल्या डेटावरून दिसते की, देशाचे कार्यबल औपचारिक क्षेत्रात जात आहे. अशीच अवस्था व्यवसायाची आहे. कराच्या कक्षेत येणाऱ्या कंपन्या आणि व्यवसायांची संख्या वाढली आहे. नवीन नोकऱ्यांमध्ये तरुणांचा वाटा जास्त आहे.
२०२२-२३ आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत कर्मचारी निवृत्तिवेतन योजनेत मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ३५% कामगारांची वाढ झाली आहे. सुमारे ९० लाख नवीन कर्मचारी आले आहेत. २०१७ नंतर वस्तू आणि सेवा कर भरणाऱ्या कंपन्यांची संख्या ८० लाखांवरून एक कोटी ४० लाख झाली आहे. मॉन्स्टरसारख्या रिक्रूटमेंट साइट्सनी औपचारिक रोजगारामध्ये समान वाढ नोंदवली आहे. कोविड-१९ नंतर देशाची अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करत आहे. २०२२ चा जीडीपी सुमारे ७% होता, असा अंदाज आहे. बर्कलेज बँकेचे राहुल बाजोरिया म्हणतात की, अनेक व्यापक निर्देशक मोठ्या बदलाची झलक दाखवत आहेत.
कर्मचारी पेन्शन योजनेचे आकडे नवीन कामावर प्रकाश टाकतात. प्रत्येक वयोगटातील कर्मचारी वाढले आहेत. १८ ते २५ वयोगटातील लोकांमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. कोडर, लिपिकांसह इतर तज्ज्ञ सेवांमध्ये जास्तीत जास्त ३८% नवीन कामगारांची भरती करण्यात आली. यानंतर बहुतांश कर्मचारी सफाई संबंधित सेवेत आले आहेत. आतापर्यंत या नोकऱ्यांची नोंदणी झालेली नव्हती. शक्तिशाली व्यवसाय ट्रेंड बदल स्पष्ट करतात. २०१७ मध्ये लागू झालेल्या जीएसटीअंतर्गत कंपन्यांची खरेदी विक्री कराच्या कक्षेत आली आहे. सरकारच्या पुढाकाराने २०१६ मध्ये सुरू झालेल्या इलेक्ट्रॉनिक पेमेंट प्रणालीमुळे करचोरी कमी झाली आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांचा रोजगारात मोठा वाटा आहे. ते सहसा कर चुकवेगिरी करत नाहीत.
पर्यटन, हॉटेल उद्योगात अधिक काम फॉक्सकॉन ही तैवानची इलेक्ट्रॉनिक्स कंपनी चेन्नईजवळ बांधत असलेल्या घरांत ६०,००० कामगारांना जागा मिळणार आहे. गेल्या पाच वर्षांत कंत्राटावर काम करणाऱ्या फॉक्सकॉनसारख्या भारतीय कंपनीच्या डिक्सन टेक्नॉलॉजीजच्या कर्मचाऱ्यांची संख्या पंधराशेवरून वीस हजारांवर गेली आहे. ती डझनभर परदेशी कंपन्यांसाठी काम करते. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी या रिसर्च फर्मच्या मते, ज्या क्षेत्रात जास्त लोकांची गरज आहे अशा क्षेत्रात रोजगार वाढला आहे. यामध्ये पर्यटन व आदरातिथ्य उद्योगांचा समावेश आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.