आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘वयाच्या दहाव्या वर्षी माझ्या आयुष्यात क्रिकेट नव्हते. आईला वाटायचे की मी नृत्यांगना व्हावे. वडिलांना वाटायचे मी क्रिकेटर बनावे. ते एअरफोर्समध्ये होते. घरात शिस्त होती. मी लहान होते. मला मोठा भाऊ होता. मला उशिरापर्यंत झोपायची सूट मिळत असे. मी उशीरा उठायचे. मी लवकर उठावे यासाठी वडिलांनी मला क्रिकेटमध्ये घातले. मी उन्हाळी शिबिरात सहभाग घेतला. तेथे माझा भाऊ क्रिकेटच्या प्रशिक्षणासाठी जायचा.
शिबिरात मी एकमेव मुलगी होते. मी थेट व्यावसायिक प्रशिक्षण सुरू केले. याचा फायदाही झाला. मी क्रिकेटची निवड केल्यामुळे आजी-आजोबांना धक्का बसला. त्यांना वाटायचे की मुलगी दिवसभर उन्हात खेळते. एकदा तर बॉल माझ्या चेहऱ्यावर लागला, टाकेही पडले. घरात हंगामा झाला. माझी बारावी बोर्डाची परीक्षा होती, त्याचवेळी टुर्नामेंट होती. यातून पुढील वर्ल्डकपसाठी संघ निवडला जाणार होता. पालकांनी मला विचारले, ‘तू काय करणार आहेस?’ मी एका सामान्य किशोरीप्रमाणे उत्तर दिले, मला बोर्डाची परीक्षा द्यायची आहे. मी टुर्नामंेटमध्ये सहभागी व्हावे, हे त्यांनी मला आठवडाभर समजून सांगितले. माझ्या पालकांना वाटत होते की बोर्डाच्या परीक्षेएेवजी मी टुर्नामेंटमध्ये सहभागी व्हावे आणि अशी खात्रीही नव्हती की त्यातून माझी निवड होईल.
मी एक संधी घ्यावी असे त्यांची इच्छा होती. मी लहान असल्यामुळे माझ्यासाठी ते अवघड होते. माझी निवड झाली आणि मी न्यूझीलंड दौऱ्यावर गेले. मला असे वाटते की, तुम्ही काय निवडता यावर तुमचे भवितव्य अवलंबून आहे. प्रत्येक निवड तुम्हाला वेगळ्या संधीकडे घेऊन जात असते. मी आरामात जगणाऱ्यांपैकी आहे, माझी कधी महत्त्वाकांक्षाही नव्हती. मी कोणतेही नियोजन केले नाही. आयुष्याने मला जे काही दिले ते मी केवळ स्वीकारत गेले. काम झाले तर आनंदी व्हायचे, नाही झाले तर पुढे चालत राहायचे. तुम्ही पुढे चालत राहणे गरजेचे आहे. स्वत:ला समजून घेण्यासाठी वेळ द्या. पुढे चालत राहा, हे मला खेळाने शिकवले. प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. आज भलेही मी शतक ठोकले असेन तर उद्या मला पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागणार आहे.’
तरुणांनी लक्ष केंद्रित करायला शिकावे
नव्या पिढीसाठी परिस्थिती कठीण आहे. तरुणांनी लक्ष केंद्रित करायला शिकावे. लक्ष विचलित करण्यासाठी आज अनेक बाबी आहेत. मी १६ वर्षांची होते त्यावेळी असे नव्हते. माझ्याजवळ इन्स्टाग्राम, ट्विटर, फेसबुक नव्हते. आता प्रशिक्षण संपले की तरुणाई मोबाइलमध्ये अडकते. त्यांच्याकडून अपेक्षा खूप आहेत, दबावही खूप आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.