आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबगदादमधील रेस्टॉरंटमध्ये ६० वर्षीय झैनब भाजी निवडतात. त्या दिवसाला १३.७० कमावतात. पण, एवढ्याशा रकमेतून कुटुंबाला रात्रीच्या जेवणाचीही व्यवस्था करणे कठीण झाले आहे. भरमसाट फीमुळे त्यांच्या मुलींना शाळा सोडावी लागली. झैनब यांना रेस्टॉरंटच्या मालकाने टाकलेले भरपूर तेलाचे जेवण खावे लागते. आठवड्यातून फक्त एकाच दिवशी गुरुवारी त्यांना फळे आणि भाज्या मिळतात. त्या दिवशी शेजारी त्यांना अन्नदान करतात. झैनब यांचे वजन १२० किलो आहे. झैनब यांच्या चार मुली मोठ्या आहेत. त्यांचेही वजन वाढण्याची शक्यता आहे. पुरुषांचा छळ आणि विनयभंगाच्या भीतीने त्या त्यांना कामावर पाठवत नाहीत.
जगभरात महिला पुरुषांपेक्षा जास्त लठ्ठ असतात. १५% महिला आणि ११% पुरुषांसाठी लठ्ठपणा ही समस्या आहे. त्यांचा बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) ३० किंवा त्याहून अधिक आहे. परंतु, लठ्ठपणातील अंतर जगभरात वेगवेगळे आहे. मध्यपूर्व आणि उत्तर आफ्रिकेत पुरुष व महिलांमधील फरक सर्वाधिक आहे. मध्यपूर्वेत १६% पुरुषांच्या तुलनेत २६% स्त्रिया लठ्ठ आहेत. हे धोकादायक ठरू शकते. २०१९ मध्ये लठ्ठपणामुळे (हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब) सर्वाधिक मृत्यू झालेल्या ११ देशांमध्ये आठ अरब देश होते.
आखाती देशांत परदेशी लोक घरात कष्टाची अनेक कामे करतात. अरब देशांतील महिलांना खेळांमध्ये भाग घेण्याच्या कमी संधी आहेत. हिजाब आणि इतर पोशाख महिलांना व्यायामासाठी अडथळा ठरतात. रस्त्यावरून चालणाऱ्या महिलांची छेड काढली जाते. वातानुकूलित मॉल मोठ्या शहरांपुरते मर्यादित आहेत व फक्त महिलांसाठीच्या व्यायामशाळांत व्यायाम, चालणेच करता येते.
इजिप्तमध्ये श्रीमंतांपेक्षा गरीब स्त्रिया जास्त लठ्ठ असतात. श्रीमंत कुटुंबांना त्यांच्या मुलींना बाहेर पाठवताना अधिक सोयीस्कर वाटते. तरीही काही पॅसिफिक बेटे वगळता इजिप्शियन महिलांचा बीएमआय जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त आहे. याचे मुख्य कारण म्हणजे आहार. इजिप्तमधील लोकांना त्यांच्या ३०% कॅलरीज ब्रेडमधून मिळतात. १९७५ पासून जास्त वजन असलेल्या अरब महिलांचे प्रमाण अरब पुरुषांपेक्षा जास्त आहे. दरम्यान, जंक फूडकडेही कल वाढला आहे. केवळ २०% महिला काम करतात जागतिक बँकेच्या म्हणण्यानुसार, अरब देशांमध्ये फक्त २०% महिला काम करतात. इराकमध्ये ही संख्या दहापैकी एक आहे. याचा अर्थ बहुतेक अरब महिला घरी जास्त वेळ घालवतात. त्यांच्या जास्त शारीरिक हालचाली होत नाहीत. इतर भागात रुग्णालये, शाळा, महाविद्यालये आणि रेस्टॉरंटमध्ये महिला मोठ्या संख्येने काम करतात. पण, अशा अनेक नोकऱ्या अरब देशांमध्ये पुरुष करतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.