आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्रीमंत देशांमध्ये संसर्गजन्य रोग जवळजवळ संपुष्टात आले होते, पण या देशांच्या सरकारांना समृद्धीमुळे होणाऱ्या आजारांकडे अधिक लक्ष द्यावे लागले आहे. भरपूर कॅलरीयुक्त आहार आणि बैठी जीवनशैली यामुळे मधुमेह, लठ्ठपणा आणि हृदयविकार वाढले आहेत. गेल्या काही दशकांपासून पूर्व आशियाई देशांतील मुले व किशोरवयीन मुलांची दृष्टी कमकुवत (मायोपिया) झाली आहे. कमी उजेड असलेल्या वर्गखोल्यांत मुले जास्त वेळ घालवत असल्याने अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. १९६० च्या दशकात आर्थिक समृद्धी सुरू होण्यापूर्वी पूर्व आशियामध्ये मायोपिया जवळजवळ नव्हता. आजकाल तो सर्वव्यापी आहे. हाँगकाँग, सिंगापूर आणि तैपेई-तैवानमध्ये ८०% शाळकरी मुलांची दृष्टी कमकुवत आहे. दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलमध्ये दहापैकी नऊ तरुण दूरच्या दृष्टीने पीडित आहेत. चीनमधील परिस्थितीही झपाट्याने बिघडत आहे. ग्वांगझू प्रांत आणि मंगोलियातील सुमारे ८०% तरुण मायोपियाने ग्रस्त आहेत. पूर्व आशिया डोळ्यांच्या महामारीचे केंद्र असेल तर पाश्चात्त्य देशही अस्पर्शित नाहीत. युरोपमध्ये याचा दर २०% ते ४०% असल्याचे अध्ययन दर्शवते. कॅलिफोर्निया, अमेरिकेत १७ ते १९ वयोगटातील ५९% तरुणांना मायोपियाचा त्रास होतो. मुलांच्या डोळ्यांच्या योग्य विकासासाठी तेजस्वी प्रकाश आवश्यक आहे. खूप कमी प्रकाशाने डोळे विस्तारतात. दूरदृष्टी कमकुवत होते. संशोधक म्हणतात की, आशियात मायोपियाचे प्रमाण जास्त आहे, कारण शाळा दीर्घ काळ असतात.
दूरदृष्टी दोषामुळे अनेक तोटे दूरदृष्टीच्या दोषाचे अनेक तोटे आहेत. चष्मा आणि काँटॅक्ट लेन्स महाग आहेत आणि त्या आयुष्यभर पिच्छा सोडत नाहीत. चीनच्या ग्रामीण भागातील अनेक कुटुंबे हा खर्च उचलण्याच्या स्थितीत नाहीत. त्यामुळे मुलांना अडचणी येत असल्याने ते अभ्यासात मागे पडतात. गंभीर मायोपियामुळे मध्यम वयात डोळ्यांचे इतर गंभीर आजार होऊ शकतात. काही आजारांमुळे दृष्टीहीनता येते.
(ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.