आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवा विचार:काही प्रकरणांबाबत बदलता येतो कायदा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तर पुन्हा एकदा आपण हिंदू-मुस्लिम, मंदिर-मशीद वादात अडकलो आहोत. ज्ञानवापी मशिदीच्या मुद्द्यावर देशाचे लक्ष लागले आहे. पण, आनंदाची बातमी अशी की, आज भारतातील हिंदू-मुस्लिम संघर्षाचा सर्वोच्च बिंदू काही जुन्या धार्मिक स्थळांपुरताच मर्यादित राहिला तर या दोन समुदायांमधील संबंधांमध्ये आपण खूप पुढे आलो आहोत, असे समजा. बरं, प्रत्येक जण अशा प्रकारे गोष्टींकडे आशावादी दृष्टिकोनातून पाहत नाही. काही लोक या विषयावर बोलतात तेव्हा खूप उत्तेजित होतात (तुम्ही त्यांना टीव्हीवरील वादविवादांमध्ये पाहू शकता). मी त्यांना एवढेच सांगेन की, शांत व्हा आणि दीर्घ श्वास घ्या. अखेर ते श्रद्धास्थान आहे. आणि तुम्ही जगातील कोणत्याही ठिकाणाहून देवाची उपासना करू शकता, कारण हे जगदेखील देवानेच निर्माण केले आहे.

या संपूर्ण प्रकरणावर एक नजर टाकूया. वाराणसीतील ज्ञानवापी मशीद जिथे पूर्वी मंदिर होते त्या जागेवर बांधली गेली. हे सिद्ध करण्यासाठी कोणत्याही रॉकेट-सायन्सची गरज नाही. हे मंदिर औरंगजेबाने सतराव्या शतकात पाडले असावे. हे त्यांच्या हिंदूंच्या दडपशाहीच्या धोरणाशी सुसंगत होते. त्या वेळी मोगलांनी केलेल्या अनेक वाईट गोष्टींपैकी ही एक होती. मोगल साम्राज्यवादी आणि क्रूर होते. त्यांच्या काळात लोकशाही नव्हती. त्या काळात टीव्ही तज्ज्ञ असते तर त्यांना सरकारवर टीका करता आली नसती.

बरं, मोगलांनी जे केले ते फार वाईट होते. त्या वेळी हिंदूंवर अन्याय झाला हे खरे आहे. आता आपण हिंदू बहुसंख्य देश आहोत, पण आपला इतिहास हिंदूंच्या दडपशाहीने भरलेला आहे. अशा स्थितीत न्यायाची मागणी रास्त वाटू शकते. त्यामुळेच इतिहासातील चुका सुधारण्याचे प्रयत्न हिंदूंच्या हृदयात स्थान मिळवून देत राहतील. अयोध्या प्रकरणाचे नेतृत्व भाजपने केले होते. इतरत्रही असेच वाद आहेत. परंतु, आपल्या जीवनात धर्माला महत्त्वाचे स्थान असले तरी व्यावहारिकताही कमी महत्त्वाची नाही. देशातील प्रत्येक मशिदीचा ऐतिहासिक एक्स-रे करायला सुरुवात केली तर भानुमतीचा पेटारा उघडला जाईल. कारण मंदिराच्या जागेवर बांधल्या गेलेल्या अशा हजारो मशिदी असू शकतात. आपला इतिहास तसा होता. मंदिरांचे मशिदीत रूपांतर तर सोडाच, आज भारतातील बहुतेक मुस्लिमांचे पूर्वज प्रामुख्याने हिंदू होते, त्यांचे इस्लाममध्ये रूपांतर करण्यात आले.

त्यामुळे आता काय करायचे, असा प्रश्न पडतो. या ऐतिहासिक चुका सुधारण्यात आपण आपला वेळ घालवत राहायचा का? की आपण यथास्थिती स्वीकारून पुढे जाण्यास तयार व्हायचे? यथास्थिती स्वीकारणे हा वाजवी दृष्टिकोन आहे. १९९१ मध्ये संसदेने प्रार्थनास्थळांचा कायदा मंजूर केला तेव्हाही असेच केले होते. १५ ऑगस्ट १९४७ रोजी तेथे असलेल्या प्रार्थनास्थळाचे धार्मिक स्वरूप कायम राहील, असे या कायद्यात म्हटले आहे. बाबरी मशीद-राम जन्मभूमी प्रकरण विशेष लक्षात घेऊन या कायद्यातून सूट देण्यात आली.

यथास्थिती राखण्याचे धोरण शांतता राखते आणि आपल्याला विवाद आणि अनावश्यक संघर्षांपासून वाचवते, पण गोष्टींकडे पाहण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे का? स्वातंत्र्यानंतर धार्मिक स्थळाचे स्वरूप बदलता येणार नाही, असे कायदा सांगतो, पण स्वातंत्र्यापूर्वी आपण न्याय मागायला मोकळे नव्हतो. तेव्हा आपल्यावर परकीय सत्तेचे राज्य होते. त्यामुळे स्वातंत्र्यापूर्वी जे काही घडले तेच स्वातंत्र्यानंतरही आपल्यावर लादले जात राहील, असे मानायचे का? हे कठीण, पण वैध प्रश्न आहेत. व्यावहारिकतेमुळे आपल्याला एका कठीण स्थितीचे निराकरण करता येत असले, तरीही मंदिरांच्या तपासणीच्या तर्काकडे दुर्लक्ष करता येत नाही.

भारत आजही धर्मनिरपेक्ष देश आहे आणि यापुढेही राहणार आहे, पण धर्मनिरपेक्ष असण्याचा अर्थ काय? याचा अर्थ धर्माच्या बाबतीत आपण कोणताही बदल करू नये किंवा कोणतेही प्रश्न विचारू नयेत का? की एकमेकांना नीट समजून घेण्याऐवजी आपण एकमेकांपासून दूर राहावे? आज तुम्ही ज्याला मशीद म्हणता, ती भूतकाळातील अनेक शतकांपासून हिंदूंच्या सर्वात पवित्र देवस्थानांपैकी एक होती. मग आपण याबद्दल बोलू नये का? हे न्याय्य प्रश्न आहेत आणि त्यांच्याबद्दल बोलल्याने कोणी जातीय किंवा धर्मनिरपेक्ष होत नाही. कदाचित आपण विशिष्ट परिस्थितीत काही देवस्थानांना त्यांचे जुने स्वरूप देण्याची परवानगी देऊ शकतो आणि यासाठी अत्यंत कठोर नियमांचे पालन करू शकतो. निकष असे असू शकतात की, त्या जागेला दुसऱ्या धर्मासाठी खूप महत्त्व आहे का आणि आज त्या जागेचा वापर करणाऱ्या समाजाला आपण ते मंदिर पूर्वपदावर आणण्यासाठी पटवून देऊ शकतो का? कदाचित ९९.९९ टक्के प्रकरणांमध्ये पूजास्थळ कायदा लागू केला जाऊ शकतो, परंतु ०.०१ टक्के प्रकरणांसाठी दुसरा उपाय शोधला जाऊ शकतो.

काही देवस्थानांसाठी मंदिर-मशीद एकत्र असे संकरित स्मारक का तयार करू नये, असे मी सुचवीन. अखेर, इतरांना आपल्यापासून वेगळे होऊ देण्यापेक्षा आपण एकत्र राहून आनंद साजरा करणे हीच खरी धर्मनिरपेक्षता आहे. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)

चेतन भगत इंग्रजीतील कादंबरीकार chetan.bhagat@gmail.com

बातम्या आणखी आहेत...