आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देश व जगातील सकारात्मक परंपरा:स्पेनमध्‍ये घराबाहेर खुर्च्या टाकून तासन््तास गप्पा मारण्याची परंपरा

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

*स्पेन या युरोपियन देशात लोक संध्याकाळी जुन्या खुर्च्या घराबाहेर टाकून बसतात आणि मग शेजारी व मित्र एकत्र येतात आणि तासन््तास गप्पा मारतात. सहसा या खुर्च्यादेखील कौटुंबिक वारसाहक्क असतात आणि ५० वर्षांपूर्वीच्या असतात. लोक या संवादाला ‘अल्फ्रेस्को चॅट’ म्हणतात. अल्फ्रेस्कोचा शब्दशः अर्थ खुली हवा आहे आणि अनेक दशकांपासून स्पेनच्या अनेक प्रांतांमध्ये ही परंपरा आहे.

* अल्गर या दक्षिणेकडील स्पॅनिश शहरात ‘अल्फ्रेस्को चॅट’ची परंपरा अनेक शतकांपूर्वीची आहे. सोशल मीडियावर वेळ घालवण्याची इथे संस्कृती नाही. अल्गरच्या महापौरांनी २०२१ मध्ये युनेस्कोला एक अर्ज लिहून ही परंपरा आणि अल्गरला जागतिक वारसास्थळ जाहीर करण्याची मागणी केली. लोक याला मानसिक आरोग्य चांगले ठेवण्याचे साधन मानतात. येथे ‘अल्फ्रेस्को चॅट’ जिवंत ठेवण्याची कसरतही सुरू आहे.

*अल्गर या शहराव्यतिरिक्त लोक ही परंपरा स्पेनच्या इतर अनेक प्रांतांमध्ये अगदी उघडपणे जगतात. विशेषत: उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये संध्याकाळी येथे कोणीही आपापल्या घरांत नसते. येथे तरुणांना सोशल गॅदरिंगसाठी विशेष प्रवृत्त केले जाते, जेणेकरून लोकांमधील नाते केवळ इंटरनेटपुरते मर्यादित राहू नये. याशिवाय लोक मोकळ्या आकाशाखाली एकत्र वाढदिवस साजरा करतात.

बातम्या आणखी आहेत...