आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजेव्हा व्यावसायिक नातेसंबंधांचा विचार केला जातो, तेव्हा अनेकदा दोन भिन्न पिढ्यांच्या लोकांत समेट नसतो. त्यांच्यात संभ्रम असतोे. नव्या लिडर्सना असे वाटते की वरिष्ठ त्यांच्या प्रगतीतले अडथळा आहेत. नवी व तंत्रज्ञान जाणणारी पिढी आपले अस्तित्वच नाकारते, असे ज्येष्ठांना वाटते. हे उपाय दोघांमध्ये यशस्वी संबंध प्रस्थापित करू शकतात.
टिप्स
१) आधी आपल्या गृहितकांची चाचणी घ्याजर तुम्हाला वरिष्ठ लिडर्सशी नातेसंबंध निर्माण करण्यात अडचण येत असेल, तर तुम्ही त्यांच्याबद्दल गृहितके बांधली असतील. तुमचा त्यांचा गैरसमज होत असेल. तुम्हाला ते आवडत नाहीत कारण ते तुमच्यापेक्षा वेगळे आहेत, कदाचित त्यांना तुमच्यापासून वेगळे करणारी जी गोष्ट आहे तीच खरी ताकद आहे.
२) केवळ आत्मविश्वासाने विश्वासार्हता निर्माण होत नाहीअधिकांश नव्या लिडर्सना असे वाटते की वरिष्ठ लीडर्सना प्रभावित करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्यांच्यासमोर आपला आत्मविश्वास आणि दृढ निश्चय प्रकट करावा. परंतु मुळात स्वत:ला कमकुवत दाखवतच आपला परिपक्वपणा दर्शवता येतो. काही गोष्टी माहीत नसल्याचे कबूल करा. तसेच त्यांच्याकडून मदतही घ्या.
३) मानवतेला नाते- संबंधाचा आधार बनवानातेसंबंध मजबूत करायचे असतील तर अधिकच्या मानसन्मानाची अपेक्षा करू शनका. नवे लिडर्स प्रत्येक गोष्टीला सन्मानाशी जोडतात. ज्याच्यामुळे प्रतिमा डागाळू शकते. औपचारिकताही वाढवते. त्यांच्याविषयी अधिक जाणून घ्या. मानवतेच्या आधारावर कोणतेही नाते मजबूत केले जाऊ शकते.
४) आपल्या मागण्या ठेवण्यास घाबरू नकाजर तुम्ही कुणासोबत अधिक काळ व्यतीत करू इच्छिता, त्याच्याकडून काही शिकू इच्छिता तर ते त्यांना मन मोकळेपणाने सांगा. एकदाच सांगण्याने असे होणार नाही, वारंवार सांगावे लागेल. तेव्हा पूर्ण आदर सन्मानाने आपली मागणी त्यांच्यासमोर ठेवा आणि त्यांना सांगा की असे करणे तुमच्यासाठी का गरजेचे आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.