आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाणूस अनेक वेळा अपयशी ठरतो, परंतु पालकत्वात अपयश येते तेव्हा त्याचे दूरगामी परिणाम होतात. आपण पालनपोषणात अयशस्वी झालो तर येणाऱ्या अनेक पिढ्यांना त्याची किंमत मोजावी लागेल. मुलांचे संगोपन हा सापशिडीच्या खेळासारखा आहे. कधी मुले आव्हान बनतील, तर कधी ती खूप सोपी होतील. म्हणूनच या बाबतीत निराश होऊ नका. मुलांच्या संगोपनात जेव्हा जेव्हा अपयश येते तेव्हा सर्वप्रथम आपण प्रामाणिकपणे निरीक्षण केले पाहिजे की, त्यात मुलांचा किती दोष आहे आणि पालक म्हणून आपला किती दोष आहे? मुलांसमोर कधीही असमर्थ होऊ नका. त्यांच्या आयुष्यात पाच-सात व्यक्तिमत्त्वे आली आहेत- उदा. आई-वडील, भावंडे, मित्र इ. परमात्म्याच्या रूपात एक व्यक्तिमत्त्व निश्चितपणे उतरवा. देवही उपयोगी पडतो, याची जाणीव त्यांना करून द्या. मेन्सियस हा कन्फ्युशियसचा शिष्य होता. चांगुलपणा हा माणसाचा मूळ धर्म आहे, असे ते म्हणत. त्यामुळे कुटुंबातील मुलांचे संगोपन मानवी मूल्यांच्या आधारे झाले पाहिजे. ही मूल्ये म्हणजे श्रद्धा, प्रेम, मानवता आणि स्वातंत्र्य. प्रत्येक वयोगटातील मुलाला त्याच्या पालकांकडून अनेक गोष्टी हव्या असतात. काळ बदलतो, पण मूल्ये तीच राहतात. म्हणूनच आज पालकत्वाची कला अवघड आहे, पण ऋषी-मुनींनी सांगितलेली पद्धत आचरणात आणा.
पं. िवजयशंकर मेहता humarehanuman@gmail.com Facebook:Pt. Vijayshankar Mehta
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.