आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनापासून आजपर्यंत गरिबांना ५ किलो मोफत धान्य, युद्धाचे दुष्परिणाम व रासायनिक खतांवर भरघोस सबसिडी देऊनही भारताचा विकास दर जगातील बहुतांश देशांपेक्षा, विशेषतः जी-२० देशांपेक्षा चांगला असेल, असा विश्वास आहे. सरकारच्या धोरणांचे आणखी मोठे यश म्हणजे चालू वर्षात महागाईचा दर जपान, सौदी अरेबिया व दक्षिण कोरिया वगळता उर्वरित जी-२० देशांमध्ये भारतापेक्षा जास्त होता. चीन व भारत समान ७% महागाई दरावर राहिले. एवढेच नाही, तर रशिया, इटली व जर्मनीचा विकास दर नकारात्मक राहण्याची अपेक्षा आहे. आयएमएफच्या मते, भारत वगळता या सर्व देशांसाठी पुढील वर्षातील वृद्धीचे चित्र उत्साहवर्धक नाही. एकूणच जगातील इतर देशांच्या तुलनेत भारताने महागाईवर नियंत्रण ठेवले आणि विकास दरही सर्वोच्च राहण्याची अपेक्षा आहे. चांगल्या आर्थिक धोरणाव्यतिरिक्त रशियाकडून अत्यंत स्वस्त दरात तेल आयात हे कदाचित यामागचे आणखी एक कारण आहे. दुसरीकडे नव्या अंदाजानुसार महसुली संकलनही अर्थसंकल्पातील अंदाजापेक्षा सुमारे चार लाख कोटींनी अधिक आहे, हे सरकारच्या भक्कम रणनीतीमुळेच शक्य झाले. येत्या वर्षात आंतर-रचनात्मक विकासासह अल्प मुदतीच्या योजनांचाही विस्तार होऊ शकतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.