आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइतिहासाच्या पुस्तकांत फेरबदल करावेत का? शहरांची नावे बदलावीत का? इतिहासाच्या मूळ पुस्तकांमध्येच वस्तुस्थितीचा विपर्यास केला गेला नाही का आणि काही शहरांची नावे हत्याकांड आणि लुटमारीचा गौरव करणारी दिसत नाहीत का, यावर या प्रश्नांची उत्तरे अवलंबून आहेत. एनसीईआरटी ही एक स्वायत्त संस्था आहे, ती शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. १२वीच्या विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकांमधून त्यांनी मोगल दरबाराशी संबंधित धडे काढून टाकल्याबद्दल सध्या त्यांच्यावर टीका होत आहे. यावरून माजी शिक्षणमंत्री कपिल सिब्बल चांगलेच संतापले. ते म्हणाले की, भारताच्या इतिहासातून मोगलांचे ‘योगदान’ छाटले जात आहे. प्रत्युत्तरात एनसीईआरटीचे संचालक दिनेश प्रसाद सकलानी म्हणाले की, हे खोटे आहे. मोगलांशी संबंधित कोणतेही धडे काढलेले नाहीत. नवीन शैक्षणिक धोरणानुसार पाठ्यपुस्तकांचे २०२४ मध्ये पुनर्मुद्रण केले जाणार आहे. देशातील जनमत आधीच खूप विभागलेले होते, या वादामुळे आणखी ध्रुवीकरण झाले. मात्र, शहरांची नावे बदलणे ही आपल्या देशात नवीन गोष्ट नाही. चारपैकी तीन मेट्रो शहरांची जुनी नावे बदलण्यात आली आहेत ः मुंबई, चेन्नई आणि कोलकाता. त्यांच्या स्थानिक नावांना महत्त्व देण्यासाठी हे केले गेले. नुकतेच उस्मानाबादचे नाव धाराशिव आणि औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे करण्यात आले. या दोन्ही नामांकनांना मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून त्यावर २० आणि २१ एप्रिलला सुनावणी होणार आहे. नामांतराची कल्पना उद्धव ठाकरे सरकारची होती आणि ती एकनाथ शिंदे सरकारने राबवली, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. हिंदू-मुस्लिम यांच्यात जातीय तेढ निर्माण करून राजकीय फायदा घेण्यासाठी हे केले जात आहे. याला उत्तर देताना शिंदे-फडणवीस सरकारने मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले असून बहुतांश नागरिकांनी या बदलाचे स्वागत केले आहे. स्थानिक प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले आहे की, ४ लाख लोकांनी नवीन नामांकनाचे स्वागत केले, तर २.७ लाख लोकांनी विरोध केला. गेल्या अनेक वर्षांत अनेक छोट्या शहरांची फारसा वादविवाद न होता नामांतरे करण्यात आली. यात अलाहाबाद (आता प्रयागराज), होशंगाबाद (आताचे नर्मदापुरम), खिजराबाद (आताचे प्रतापनगर) आणि मियाँ का बाडा (आता महेशनगर हॉल्ट) यांचा समावेश आहे. मुगलसराय आणि हबीबगंज रेल्वेस्थानके आणि दिल्लीच्या मुघल गार्डनची नावेही बदलण्यात आली आहेत. पण, भविष्यात ते इतके सोपे होणार नाही. न्यायमूर्ती जोसेफ आणि नागरत्न यांचा समावेश असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने प्राचीन भारतीय ग्रंथांवर आधारित शहरांची नावे बदलण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली आहे. न्यायमूर्ती जोसेफ म्हणाले की, हिंदू धर्माची आध्यात्मिक परंपरा महान असून वेद, उपनिषदे, गीता यांच्या उंचीला कोणीही स्पर्श करू शकत नाही. आपले मोठेपण माहीत असूनही आपण त्याला छोटे करू नये आणि उदार होऊ नये. जग भारताकडे पूर्वी आदराने पाहत असे व आजही पाहते. मी ख्रिश्चन असूनही हिंदू धर्माचा मोठा चाहता आहे. या संपूर्ण वादातून एक दृश्य समोर येते. ते म्हणजे मतपेढीचे राजकारण करून अल्पसंख्याकांचे समाधान करण्यासाठी भारतीय धर्मनिरपेक्षतेच्या खऱ्या अर्थाचे अनेक दशकांपासून अवमूल्यन करण्यात आले आहे. आता बहुसंख्य समाज त्याविरोधात प्रतिक्रिया देत आहे, त्यामुळे ध्रुवीकरणाची परिस्थिती निर्माण झाली आहे. यातून निर्माण झालेल्या जातीय तेढीचा फायदा दोन्ही विचारसरणीच्या नेत्यांना होतो. भारत हा जगातील एकमेव असा देश असेल, जो शतकानुशतके स्वत:ला गुलाम बनवून लुटून मारणाऱ्यांचा गौरव करतो. भारताच्या राष्ट्रीय चारित्र्यामध्येच काही चूक आहे का, ज्यामुळे तो असा निःस्वार्थीपणा दाखवतो? इतिहास हा विजेत्यांनी लिहिला आहे. परंतु, भारतातील इतिहास-लेखन अशा लोकांनी केले आहे, जे शतकानुशतके काही राज्यकर्त्यांच्या विजयांच्या कथांचे आश्रय घेतात. हा एक बौद्धिक दोष आहे, कारण आपले इतिहासकार आणि शिक्षणतज्ज्ञ आपल्या विभाजित भूतकाळाचे अचूक चित्र दाखवणारे खरे कथानक तयार करण्यात अपयशी ठरले आहेत. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.) मिन्हाज मर्चंट लेखक, प्रकाशक आणि संपादक mmleditorial@gmail.com
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.