आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पीक-अप:भारताने आपली ताकद आणखी वाढवण्याची गरज

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एलएसीवर चीनच्या वाढत्या आक्रमकतेमागील कारण म्हणजे भारताच्या आर्थिक आणि लष्करी प्रगतीमुळे जी-२ जागतिक व्यवस्था प्रस्थापित करण्याच्या चीनच्या महत्त्वाकांक्षेला खीळ बसू शकते. जी-२ म्हणजे फक्त अमेरिका आणि चीन हे दोन ध्रुव असलेले जग. भारत या परिस्थितीला आव्हान देऊन त्याला जी-३ त्रिकोणाचे रूप देऊ शकतो. चीनची भीती निराधार नाही, असे म्हणायला हवे. कोणत्याही देशाची भू-राजकीय शक्ती त्याच्या हार्ड पॉवर आणि सॉफ्ट पॉवरच्या संयोगाने ठरवली जाते. ऑस्ट्रेलिया आणि कॅनडाची अर्थव्यवस्था छोटी आहे आणि लष्करी शक्ती कमी आहे, परंतु सॉफ्ट पॉवर मोठी आहे. दुसरीकडे जपान ही जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असूनही मोठी भौगोलिक राजकीय शक्ती नाही. ब्रिटनची अर्थव्यवस्था चांगली नाही आणि त्यांची लष्करी क्षमताही फारशी नाही, तरीही त्यांनी दीर्घकाळ जगावर वर्चस्व गाजवले. याचे प्रमुख कारण म्हणजे त्याची सॉफ्ट पॉवर म्हणजे इंग्रजी, चित्रपट, टीव्ही, साहित्य, संगीत, खेळ, शैक्षणिक संस्था इ.

भारताला अजूनही अपेक्षित आत्मविश्वास आलेला नाही आणि तो परकीयांकडून ओळख मिळवू पाहतो आहे. यामुळे त्याची हार्ड पाॅवर मजबूत होत नाही, तर ती पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि जगातील चौथी सर्वात मोठी लष्करी शक्ती आहे. सांस्कृतिक बहुलवादाने समृद्ध असलेल्या जगात त्याच्या सॉफ्ट पॉवरला पुरेशी जागा मिळत नाही. जून २०२२ मध्ये ब्रिटनला हद्दपार करून भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाला. भारताचा जीडीपी पुढील वर्षी ६ टक्के आणि त्यानंतर ७ टक्के वाढेल, यावर जागतिक आणि भारतीय वित्तीय संस्थांमध्ये एकमत आहे. रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम आणि चीनमधील कोविड परिस्थिती यावर बरेच काही अवलंबून असेल. जागतिक बँकेच्या ताज्या अंदाजानुसार, ३१ मार्च २०२३ पर्यंत भारताचा नाममात्र जीडीपी ३.६० ट्रिलियन डाॅलर होण्याचा अंदाज आहे. यानंतर भारत जर्मनी आणि जपानच्या जवळ पोहोचेल. जर्मनी सध्या जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे आणि ३१ मार्च २०२३ पर्यंत ४.३ ट्रिलियन डाॅलर अर्थव्यवस्था होण्याचा अंदाज आहे. जपान तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि ५.१ ट्रिलियनचा आकडा पार करू शकतो. जर्मनी आणि जपानचा वार्षिक विकास दर अनुक्रमे १.४ टक्के आणि ०.८ टक्के असण्याचा अंदाज आहे. सध्याच्या विकास दरानुसार, भारत २०२५-२६ पर्यंत जर्मनी आणि २०२७-२८ पर्यंत जपानला मागे टाकून जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकतो. ही इतकी मोठी कामगिरी आहे की, त्याला कमी लेखणे चुकीचे ठरेल. २०१० पर्यंत भारत जगातील नवव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था होती, त्यामध्ये इटलीसारखे देश त्याच्या पुढे होते. २०१४ मध्ये भारत एका स्थानाने घसरून १० व्या स्थानावर आला होता. तेव्हा आपला जीडीपी २.०४ ट्रिलियन डॉलर होता. त्यानंतरच्या दहा वर्षांत कोविड आणि कमकुवत रुपयाशी लढूनही भारताचा जीडीपी जवळजवळ दुप्पट झाला.

असे असूनही भारतासमोरील भौगोलिक-सामरिक आव्हानांमुळे भारताला जगात प्रभावी स्थान मिळू शकलेले नाही. चीन-पाकिस्तान संबंध त्याच्या उदयास अडथळा आणण्यास सक्षम आहे. चीनच्या थिंक टँक ज्यांच्या मदतीने पुढील अनेक दशकांतील विविध देशांच्या आर्थिक प्रगतीचा अंदाज लावता येतो अशा अंदाज-साधनांचा वापर करतात. आकडेवारीनुसार, येत्या २० वर्षांत भारत आणि चीनच्या जीडीपीमधील फरक हळूहळू कमी होईल. २०३० च्या दशकात अमेरिका आणि भारताच्या एकत्रित अर्थव्यवस्था चीनच्या तुलनेत खूप मोठ्या असतील आणि आशिया-पॅसिफिक प्रदेशात त्यांची लष्करी-आघाडी कमी शक्तिशाली नसेल. भारताच्या प्रगतीने चीन भयभीत होतो. शी जिनपिंग भारताकडे क्षमतांपेक्षा पुढे गेलेली एक उगवती शक्ती म्हणून पाहतात. एलएसीवरील चीनच्या आक्रमकतेच्या मुळाशी हेच आहे. परंतु, जिनपिंग यांच्या महत्त्वाकांक्षा चीनची वाढती लोकसंख्या, अंतर्गत मतभेद आणि ढासळणारी अर्थव्यवस्था यामुळे निष्फळ होऊ शकतात. भारतासमोर एकच ध्येय असायला हवे, ते म्हणजे पुढील काही वर्षांत सैन्याचे आधुनिकीकरण करून आपली सॉफ्ट पॉवर जगभर पसरवणे. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)

मिन्हाज मर्चंट लेखक, प्रकाशक आणि संपादक mmleditorial@gmail.com

बातम्या आणखी आहेत...