आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • India Pakistan In Super 4 Is A Tougher Challenge Than In The League | Marathi News

अयाज मेमन यांच्या लेखणीतून:सुपर-4 मध्ये भारत-पाकिस्तान संघांसमाेर लीगच्या तुलनेत अधिक कठीण आव्हान

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिया चषकात भारत आणि पाकिस्तानमध्ये तीन वेळा क्रीडा संघर्ष होण्याची शक्यता आहे. ही एक प्रकारे आयोजक, प्रसारक आणि चाहत्यांसाठी बोनस मिळाल्यासारखेच आहे. लीग सामन्यांनंतर दोन्ही संघ रविवारी सुपर-४ मध्ये भिडतील. जर सर्वकाही ठिक राहिले तर दोघेही नॉकआऊट किंवा फायनलमध्येही समोरासमोर राहण्याची अपेक्षा आहे.

अशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी दोन्ही संघांना सुपर-४ मध्ये सर्वोत्तम खेळ करावा लागेल, जिथे इतर दोन संघ श्रीलंका आणि अफगाणिस्तानही आहे. या दोन्ही संघांचे भारत आणि पाकिस्तानसाठी लीग स्टेजच्या तुलनेत अधिक आव्हान असेल. लीग स्टेजमध्ये तर भारत-पाकसोबत हाँगकाँग होती. परंतु सुपर-४ मध्ये विरोधक अधिक मजबूत आहेत. श्रीलंका ज्येष्ठ संघ आहे. कारण त्यांच्याकडे जास्त आंतरराष्ट्रीय अनुभव आहे. परंतु भारत-पाकिस्तानसमोर अफगाणिस्तान मोठा धोका आहे. कारण या संघाने लीग टप्प्यात जबरदस्त कामगिरी केली आणि श्रीलंका व बांग्लादेशला कडवे आव्हान दिले. तीन गोष्टी आहेत, ज्यामुळे अफगाणिस्तानची आशिया चषकाने मदत केली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते न घाबरता खेळले आहेत. त्यांच्यावर इतर संघांप्रमाणे अपेक्षांचे ओझे नाही.

परंतु अफगाणिस्तानच्या आजवरच्या चांगल्या कामगिरीचे हेच एकमेव कारण नाही तर त्यांच्या खेळाडूंनी चांगले कौशल्यही दाखवले आहे. फिरकीपटू राशिद खान आणि मुजीब उर रहमान जागतिक स्तरावरील गोलंदाज आहेत. त्यांनी टी-२० युनिव्हर्समध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. मग तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो की लीग, त्यांनी सर्वोत्कृष्ट फलंदाजांविरुद्धही चांगली कामगिरी केली. अफगाणिस्तानचे फलंदाज तेवढे खास नाहीत. परंतु त्यांच्यात जोश आणि उत्साह आहे. एकूणच हा एक असा संघ आहे, त्याला हलके मानता येणार नाही. तर दुसरा संघ श्रीलंका सध्या सर्वच प्रकारांत जोश आणि उत्साहाने खेळत आहे.

बातम्या आणखी आहेत...