आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Indian Medicines Are A Lifeline For Many Countries, But Problems Where Quality Control Is Weak

औषधनिर्माण उद्योग:भारतीय औषधे अनेक देशांसाठी संजीवनी, पण जिथे गुणवत्ता नियंत्रण कमकुवत तिथे अडचणी

हरी कुमार, सैकोऊ जमेह, मुजीब मशाल, एलियन पेल्टियरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

त्यांना ताप, अंगदुखी, सर्दी झाली होती. बालपणात हे सामान्य असते. अशा आजारासाठी डॉक्टर कफ सिरप लिहून देतात. मात्र, मुलांची प्रकृती बिघडत गेली. त्यांची किडनी निकामी झाली होती. प्रकृती सुधारण्याऐवजी भारतातून आयात करण्यात आलेले कफ सिरप मुलांसाठी घातक ठरले. गेल्या काही महिन्यांत गाम्बिया या आफ्रिकन देशात भारतीय कफ सिरपचे सेवन केल्याने ७० मुलांचा मृत्यू झाल्याने अनेक बाबींवर प्रकाश पडला आहे. ज्या देशांमध्ये औषधांचा दर्जा तपासण्याची क्षमता नाही, तेथे भारतीय औषध कंपन्या निकृष्ट दर्जाची औषधे पाठवतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

भारताला जगाची फार्मसी म्हटले जाते. त्यांची औषधे विकसनशील देशांसाठी जीवनदायी आहेत. मलेरिया आणि एड्ससारख्या अनेक आजारांसाठी जेनेरिक औषधे अमेरिका किंवा युरोपियन औषधांपेक्षा स्वस्त आहेत. तथापि, गाम्बियामधील मृत्यूने चिंता वाढवली आहे. एक तज्ज्ञ या स्थितीला धोकादायक कॉकटेल म्हणतात. एकीकडे ४ लाख कोटी रुपयांच्या भारतीय औषध उद्योगाचे नियमन सैल आहे. दुसरीकडे गरीब देशांमध्ये आयात केलेल्या औषधांच्या गुणवत्तेची चाचणी घेण्यासाठी कमी किंवा कोणत्याही सुविधा नाहीत. तज्ज्ञ म्हणतात की, भारतीय औषध उद्योगात बोगस डेटा, अपुरी चाचणी आणि प्रमाणित औषध उत्पादन प्रक्रियेचे पालन यांसारख्या समस्या आहेत. नियमांच्या अंमलबजावणीतील कमकुवतपणामुळे औषध निर्मात्यांना नफा वाढवण्याचे सोपे मार्ग सापडतात. यामुळे औषधांची सर्वाधिक गरज असलेल्या देशांचा भारतीय औषधांवरील विश्वासाला तडा जाऊ शकतो. आफ्रिकन युनियनचे विशेष दूत मिशेल सिडिबे म्हणाले, “गाम्बियामध्ये जे घडले ते इतर आफ्रिकन देशांत लोकांच्या नकळत घडत असावे.” बहुतांश आफ्रिकन देशांत चाचणी क्षमता आणि प्रशिक्षित नियामक एजन्सी नाहीत.

आरोग्य कार्यकर्ते दिनेश ठाकूर, संशोधक आणि वकील प्रशांत रेड्डी यांनी औषध उद्योगातील चुकीच्या पद्धतींवरून पडदा हटवला आहे. रेड्डी यांनी द ट्रुथ पिल या पुस्तकात नियामक त्रुटींकडे लक्ष वेधले आहे. ठाकूर, रेड्डी आणि इतर तज्ज्ञांना शंका आहे की, भारतीय उत्पादक ज्या देशांमध्ये गुणवत्ता नियंत्रण कमकुवत आहे अशा देशांमध्ये निर्यात केल्या जाणाऱ्या काही औषधांमध्ये शॉर्टकट घेत आहेत. ते नमूद करतात, अमेरिकन फूड, ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनसारख्या पाश्चात्त्य नियामक संस्था त्यांच्या देशांत औषधे निर्यात करणाऱ्या भारतीय औषधी कारखान्यांची तपासणी करतात. पण, गरीब देशांकडे तसे करण्यासाठी संसाधने नाहीत. इतर देशांच्या तुलनेत आफ्रिकेत निर्यात होणाऱ्या औषधांचा दर्जा निकृष्ट असतो, असे रेड्डी सांगतात.

कप सिरप मारक असण्याची समस्या जुनी आहे. अशी परिस्थिती निर्माण झाली तेव्हा शंभर वर्षांपूर्वी अमेरिकेत अमली पदार्थ नियंत्रणाचे कठोर कायदे लागू करण्यात आले. औषधनिर्मिती व फार्मास्युटिकल्स आणि फार्मा कच्च्या मालाचे प्रमुख उत्पादक चीनमध्ये उत्पादित औषध, विशेषत: कफ सिरपपासून गेल्या काही दशकांमध्ये मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. बनावट औषध निर्मात्यांनी डायथिलीन ग्लायकॉल आणि इथिलीन ग्लायकॉलचा वापर केला. हे घटक शरीरात गेल्यावर विषारी बनतात. ते अधिक महाग सॉल्व्हंट्सच्या जागी वापरले जातात. गाम्बियाला निर्यात होणाऱ्या भारतातील सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकॉल आणि इथिलीन ग्लायकॉलचा वापर करण्यात आला आहे. हे सिरप हरियाणाच्या मेडन फार्मास्युटिकल कंपनीने बनवले आहेत. भारत जगातील तिसरा सर्वात मोठा औषध उत्पादक भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा औषध उत्पादक देश आहे. येथे जगातील ६० टक्के लसी आणि २० टक्के जेनेरिक औषधे तयार केली जातात. महामारीच्या पहिल्या वर्षात भारतातून औषधांची निर्यात जवळपास २० टक्क्यांनी वाढून सुमारे २ लाख कोटी रुपये झाली. हे जगाचे भारतीय औषधांवर अवलंबून राहण्याचे लक्षण आहे. इंडियन फार्मास्युटिकल अलायन्सच्या मते, अमेरिकेतील प्रत्येक तिसरी आणि युरोपमधील प्रत्येक चौथी गोळी भारताची असते. भारतात उत्पादित होणारी निम्म्याहून अधिक औषधे दर्जावर देखरेखीचे कठोर कायदे असलेल्या देशांमध्ये जातात.

बातम्या आणखी आहेत...