आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएकीकडे तरुणाई सोशल मीडियावर फक्त वेळ वाया घालवते आणि एकमेकांच्या आयुष्यात डोकावते, अशी चर्चा जगभर सुरू असताना दुसरीकडे ताज्या आकडेवारीनुसार २०२५ पर्यंत भारतात इन्फ्लुएन्सर मार्केटिंग २२०० कोटी रुपयांची होईल. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, २०२१ मध्ये ती केवळ ९०० कोटी रुपयांपर्यंत मर्यादित होती. जागतिक स्तरावर २०१९ पासून इन्फ्लुएन्सर विपणन बाजार दुप्पट झाला आहे. २०२२ मध्ये बाजाराचे मूल्य विक्रमी १.३४ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे, तर २०१९ मध्ये ते ५३ हजार कोटी रुपये होते. या दृष्टिकोनातून तरुणांचा सोशल मीडियावर केवळ वेळ वाया घालवत नाही, तर सोशल मीडियाचा योग्य वापर करून पैसे कसे कमावता येतील, याची कला समजून घेण्याचा ते प्रयत्न करत आहेत. कारण ते जितका जास्त सोशल मीडिया पाहतील तितके त्यांना काही तरी नवीन शिकायला मिळेल. येथे त्याचे मानसिक पैलू नाकारता येत नसले तरी या क्षणी आम्ही बाजाराच्या दृष्टिकोनातून त्याच्या सकारात्मक पैलूंबद्दल बोलत आहोत.
तथापि, सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर मार्केटिंग करणे तितके सोपेही नाही, कारण जागरूकता वाढण्याबरोबरच स्पर्धाही वाढली आहे. आणि यामुळेच आजच्या तरुणांनी सोशल मीडियाचे रूपांतर उद्योजकतेत केले आहे. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून काही तरी विकणे, फेसबुकवर समुदाय तयार करून प्रचार करणे, तुमच्या उत्पादनाची किंवा सेवांबद्दल सतत माहिती देण्यासाठी व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करणे किंवा ई-कॉमर्सद्वारे ब्रँड तयार करणे सोपे नाही. सोशल मीडियाने तरुणांना आपल्या घरातून, शहर न सोडता जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जाऊन आपले काम करता येईल, अशी सोय उपलब्ध करून दिली आहे. इतकेच नाही, तर सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुण केवळ स्वत:चेच नाही, तर कुटुंबातील इतर सदस्यांचे कौशल्यही समोर आणत आहेत.
आता ‘इन्फ्लुएन्सर’ हा शब्द थोडासा समजून घेऊ. लोकांवर परिणाम करणारी रणनीती बनवून सोशल मीडियावर कंटेंट प्रकाशित करत सोशल मीडियावर प्रभाव पाडणारे लोक म्हणजे इन्फ्लुएन्सर. लोकांना त्यांचे काम आवडते तेव्हा ते फाॅलोअर/सदस्य होतात आणि ते इन्फ्लुएन्सर बनतात. मोठे ब्रँड आणि संस्था या इन्फ्लुएन्सर्सशी कनेक्ट होऊ इच्छितात, जेणेकरून ते त्यांच्या उत्पादनांचा किंवा सेवांचा प्रचार करू शकतील. दिल्लीची लोकप्रिय फॅशन इन्फ्लुएन्सर कृतिका खुराना हिने सुमारे आठ वर्षांपूर्वी तिच्या इन्स्टाग्रामवर ‘आऊटफिट ऑफ द डे’ अपलोड करणे सुरू केले, ते लोकांना खूप आवडले. आणि अशा रीतीने तिचा फॅशन इन्फ्लुएन्सर म्हणून प्रवास सुरू झाला. ती नियमितपणे अनेक फॅशन ब्रँडसोबत काम करते. हे असे ब्रँड आहेत, ज्यांना चांगल्या किमतीत दीर्घ कालावधीसाठी चांगले फॉलोअरशिप असलेले इन्फ्लुएन्सर कायम ठेवायचे आहेत. त्याचप्रमाणे प्रसिद्ध ट्रॅव्हल ब्लॉगर डॉ. वरुण वागेश गेल्या १५ वर्षांपासून प्रवास करत आहेत. ते भारतात आणि आंतरराष्ट्रीय ठिकाणी बजेटमध्ये कसा प्रवास करायचा याच्या टिप्स देतात. त्यांनी २०१७ मध्ये स्वतःचे यूट्यूब चॅनेल सुरू केले, ते झटपट हिट झाले. तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचायचे असेल, त्यांना मदत करायची असेल किंवा त्यांना सोशल मीडियाद्वारे सुचवायचे असेल आणि ते तुमच्या आवडीशी जुळत असेल तसेच शाश्वत करिअरकडे नेत असेल तर तुम्हाला इन्फ्लुएन्सर बनण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.
(ही लेखिकेची वैयक्तिक मते आहेत.)
डॉ. जॉली जैन डिजिटल मार्केटिंग एक्सपर्ट jollyjain.jmc@gmail.com
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.