आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्तणूक विज्ञान:प्रेरणादायी पद्धती नेहमी यशस्वी होण्याला आव्हान

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आणखी काही तास अभ्यास केल्यास तुम्हाला चांगले गुण मिळतील, असे टोरंटो विद्यापीठातील अर्थतज्ज्ञांनी २०१४ मध्ये विद्यार्थ्यांना सांगायला सुरुवात केली. यामुळे विद्यार्थ्यांना अधिक मेहनत करण्याची प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली, पण तसे झाले नाही. त्याऐवजी विद्यार्थ्यांना कमी गुण मिळतील, असे वाटू लागले. मानवी वर्तनावर प्रभाव पाडण्याच्या आणि हळूहळू प्रेरित करण्याच्या पद्धतीच्या (नज थिअरी) अपयशाचे उदाहरण म्हणून विद्यापीठाचा अनुभव उद्धृत केला जाऊ लागला. अर्थतज्ज्ञ रिचर्ड थॅलर आणि कायदेतज्ज्ञ कॅस सनस्टीन यांच्या नज थिअरी या पुस्तकानंतर २००८ मध्ये वर्तनात्मक अर्थशास्त्रात हा शब्द लोकप्रिय झाला. अनेक सरकारांनी यावर आधारित धोरणे व कार्यक्रम बनवले.

सध्या जगभरात २०० पेक्षा अधिक नज युनिट्स आहेत. हे संघ दैनंदिन जीवनात वर्तणूक विज्ञान लागू करण्यात तज्ज्ञ आहेत. नज थिअरी माहिती आणि सूचनांसह अनेक मनोवैज्ञानिक धोरणांद्वारे बळजबरी करण्याऐवजी मन वळवून वर्तनात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करते. थॅलर, सनस्टीनने लिहिले की, जंक फूडवर बंदी घालण्याऐवजी डोळ्यांसमोर फळे ठेवणे म्हणजे नज. महामारीत अनेक ठिकाणी नज सिद्धांताला फारसे यश मिळालेले नाही. लॉकडाऊनसह इतर कठोर उपायांपेक्षा ब्रिटिश सरकारने घरीच राहा, जीव वाचवा अशा घोषणांवर अधिक भर दिला होता. अमेरिकेच्या फिलाडेल्फियामध्ये ५०,००० डाॅलरची लॉटरीदेखील लोकांना लस घेण्यास प्रवृत्त करू शकली नाही. तथापि, २०२१ मध्ये नज थिअरीच्या बाजूने चांगली बातमी समोर आली. जिनिव्हा विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञांनी जवळपास २०० नज अध्ययनांचे विश्लेषण करून निष्कर्ष काढला की, नज सिद्धांत एकंदरीत कार्य करतो. त्याचे खूप प्रभावी परिणाम दिसले. इतर काही मानसशास्त्रज्ञ या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. गेल्या आठवड्यात ब्रिटन, हंगेरी आणि अमेरिकेतील तीन गटांनी त्यांच्या संशोधनात सांगितले की, नजचे परिणाम अतिशयोक्तीपूर्ण आहेत. नज रिसर्चच्या प्रकाशनात पक्षपात होण्याची शक्यता जास्त आहे. संशोधन जर्नल्स अधिक लोकांशी संबंधित अभ्यासांना महत्त्व देतात. समीक्षकांचे म्हणतात की, नजचा प्रभाव जे काही सांगितले जाते त्यापेक्षा कमी आहे.

बातम्या आणखी आहेत...