आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासाहित्य : बारीक कुस्करलेली दुधी एक कप, उपवास भाजणी किंवा तांदळाचे पीठ १ कप, दही १ कप, हळद पावडर लहान चमचा, तिखट १ लहान चमचा, काळी मिरी पावडर १ लहान चमचा, हिरवी मिरची आणि आले पेस्ट, १ लहान चमचा, सैंधव मीठ चवीनुसार, तेल ३ ते ४ मोठे चमचे.
कृती : एका वाटीत पीठ, कुस्करलेली दुधी आणि दही घालून मिक्स करा. आवश्यकतेनुसार पाणी टाकून फेटून घ्या. भज्याप्रमाणे मिश्रण मध्यम पातळ करा. यासाठी भगर, साबुदाण पीठ किंवा उपवास भाजणीचे पीठ वापरू शकता. नंतर त्या मिश्रणात हळद पावडर, लाल तिखट, काळी मिरी, हिरवी मिरची पेस्ट आणि मीठ टाकून मिश्रण एकत्र करा. मिश्रण १५ ते २० मिनिटे झाकून ठेवा. मिश्रण घट्ट वाटले तर त्यात थोडे पाणी टाका. नंतर पॅन गरम करून त्यावर चमच्याने थोडेसे तुप फिरवून घ्या. नंतर हे मिश्रण धिरड्यासारखे पसरून घ्या. चमच्याने किंचित तेल फिरवून दोन्ही बाजूने धिरडे मध्यम आचेवर शेकून घ्या.
मखाना करी
साहित्य : मखाने २ कप, १ कप कापलेला टोमॅटो, १ हिरवी मिरची, १ मोठा चमचा किसलेले आले, चार मोठे चमचे तुप, काजू १ कप, जिरा १ लहान चमचा, सैंधव मीठ चवीनुसार, हळद पावडर लहान चमचा, लाल तिखट एक लहान चमचा, क्रीम किंवा साय २ मोठे चमचे, पाणी १ कप, बारीक चिरलेली कोथिंबीर १ मोठा चमचा
कृती : टोमॅटो, हिरवी मिरची, आलं एकत्र करून वाटून घ्या. कढईत दोन चमचे तुप गरम करून त्यात मखाने टाकून कुरकुरीत भाजा. मखाने काढल्यानंतर त्याच कढईत काजूला सोनेरी रंग येईपर्यंत भाजा. उरलेल्या तुपात जिरे घालून थोड्या वेळाने टोमॅटोचे मिश्रण टाका. तुप सुटेपर्यंत मसाले शिजवा. नंतर त्यात क्रीम टाका. मिश्रण मध्यम आचेवर ५ ते ६ मिनिटे शिजवा.काजू आणि मखाने घाला. त्यानंतर दोन-तीन मिनिटे शिजू द्या. शिजल्यावर त्यामध्ये कोथिंंबीर, क्रीम घालून सर्व्ह करा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.