आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंतरराष्ट्रीय महिला दिन विशेष:‘ती’च तर सर्व करते

सोलापूर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रणिती शिंदे , शीतल तेली - Divya Marathi
प्रणिती शिंदे , शीतल तेली

‘ती’ आई आहे, सून आहे, मुलगी आहे, पत्नी आहे. या सर्व जबाबदाऱ्या ‘ती’ घरात समर्थपणे सांभाळत असते. सोबतच विविध क्षेत्रांत सेवाही बजावते. सामाजिक कार्यातही ‘ती’ नेहमीच पुढे असते. काहीजण म्हणतात, ‘ती कुठे काय करते?’ पण आम्ही म्हणतो, ‘ती’च तर सर्व करते. महिला दिनानिमित्त ‘दिव्य मराठी’ तर्फे ‘ती’ च्या कर्तृत्वाला सलाम.

प्रणिती शिंदे आमदार, शहर मध्य गेल्या १४ वर्षांपासून त्या शहर मध्य मतदार संघातून आमदार म्हणून लाेकांच्या सेवेत. कुठेही दुर्घटना घडली की मदतीचा हात देतात. जाई-जुई या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून महिला, युवक-युवतींना राेजगार मिळवून दिला. व विडी कामगार महिलांसाठी योजना राबविले. विधिमंडळाच्या एससी,एसटी कमिटीच्या अध्यक्ष म्हणूनही काम केले. त्या पक्षाच्या प्रदेश कार्याध्यक्षा म्हणून कार्यरत.

शीतल तेली आयुक्त, साेलापूर मनपा सध्या पालिका प्रशासक या सिनिअर आयएएस अधिकारी पदावर सेवेत. शहराचे कामकाज पाहत त्या घरातील जबाबदारी पार पाडतात. आई-वडील आणि आठ वर्षांचा मुलगा साेबत आहेत. घरात आई-वडिलांची सेवा आणि मुलास शाळेसाठी पूर्वतयारी करतात. घरातील काम नेहमी स्वत: करतात. पालिकेचा डोलारा सांभाळत घर सांभाळण्याची जबाबदारी त्या यशस्वी पार पाडत आहेत.

डॉ. वैशाली कडूकर प्राचार्य, पोलिस प्रशिक्षण केंद्र, केगाव कर्तृत्वान स्त्री, महिला पोलिस अधिकारी. धिटाने आणि सामर्थ्याने त्या बारा वर्षे पोलिस खात्यामध्ये आहेत. अकरा वर्षाचा मुलगा, पती, सासू, सासरे व अन्य नातेवाईक यांच्याशी एकोपा. त्यांचे कमी जास्त पाहणे. गुन्हेगारी, कायदा व सुव्यवस्था, सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवत असताना कधी कधी मुलगा तुझ्याच हातचे जेवण पाहिजे म्हणून हट्ट धरतो, मग ताेही त्या पुरवतात.

रेखा पांढरे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश २२ वर्षांपासून न्यायदान क्षेत्रात न्यायाधीशपदी काम करत आहेत. एलएलएमपर्यंतची पदवी प्राप्त. न्यायाधीश पदावर सेवेला प्राधान्य दिले. अनेक शहरांत काम केले. सध्या सोलापूरमध्ये जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून जबाबदारी. २२ वर्षांत अनेकांना न्याय मिळवून दिला. पती,‌ सासू-सासरे, मुले आणि नातेवाईक ही नातीही जपली. कौटुंबिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात.

माधुरी देशपांडे सहायक सरकारी वकील २१ वर्षे सहायक सरकारी वकील म्हणून त्या काम करत आहेत. सासू-सासरे असताना त्यांची सेवा केली. सुटीच्या दिवशी पतीसोबत शेतात जातात. मोक्का अंतर्गत दोघांना शिक्षा लागावी म्हणून युक्तिवाद केला. विविध गुन्ह्यांत २५० हून अधिक आरोपींना जन्मठेप,‌ सक्तमजुरी आणि अलीकडे तिघांना एका गुन्ह्यात तीस वर्षे शिक्षा लागली. आणि कुटुंबात एक आदर्श पत्नी, सून म्हणून भूमिका त्या निभावतात.

सायली जोशी शिक्षण, साहित्य, चित्रपट-मालिका २००२ साली सोलापूरमध्ये पहिल्यांदाच ‘विना दप्तर शाळा’ या नवीन संकल्पनेवर इंग्रजी माध्यमाच्या शाळेची स्थापना करण्यात सासरे, पती यांना साथ दिली. मसाप, जुळे सोलापूर शाखेच्या माध्यमातून साहित्यसेवा, को-ऑप. सोसायटी आणि पेट्रोलियमच्या माध्यमातून अर्थकारण करणाऱ्या संस्थांमध्ये व्यग्र असतात. मराठी चित्रपट- मालिकांची निर्मिती, सांस्कृतिक महोत्सवाचे आयाेजन त्या करतात.

डॉ. प्रतिभा पाटील बालराेग तज्ञ हॉस्पिटलच्या संचालक, गंभीर अवस्थेतील बालकांवर त्या उपचार करतात. मोठी मुलगी सानिया एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. तर मुलगा आर्यन याने बारावीची परीक्षा दिली. त्यांच्या तयारीतही हातभार लावला. कौटुंबिक आघाडीवर देखील त्या अग्रभागी आहेत. एम.डी शिवाय योगा प्रशिक्षक. आता स्पिरिच्युएल टुरिझमला चालना मिळावी यासाठी प्रयत्नशील आहेत.

संगीता जाधव योग अभ्यासक २५ व्यक्तींच्या गोतावळ्यातील थोरली सून. आंतरराष्ट्रीय कराटेपटू व राष्ट्रीय कराटे पंच अशा दोन मुलांची आई. पारंपरिक युद्धकला प्रशिक्षक, आधुनिक युद्धक्रीडा व सेवासुरक्षा संस्थेची राष्ट्रीय प्रमुख, संस्कार क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ती आणि योग अभ्यासक. मुलांच्या देश-विदेश प्रवासासाठीची तयारी. दुपारी ग्रंथवाचन- जीवनमूल्यांसंदर्भात लेखन, सायंकाळी कराटे प्रशिक्षण. अशी सर्व कामे त्या करतात.

रेखा सग्गम विडी कामगार संयुक्त कुटुंबातील धाकट्या सूनबाई. घरची ठरलेली कामे उरकली की, मुलांच्या शाळेचा डबा देणे, पती कपडे शिवतात. विड्या वळण्याची तयारी, कारखान्यात नेऊन देण्याचे काम त्या करतात. अर्थार्जनासाठी त्या हातभार लावतात. सायंकाळी मुले शाळेतून आली की, त्यांचा अभ्यास त्या घेतात. परंतु हातातील काम सुटत नाही. दुसऱ्या दिवशी पहाटेपासूनच पुन्हा ती धांदल. घरातील कामे सांभाळून त्या हे सर्व करतात.

अनिता माळगे उद्याेजिका २००८ साली स्वयंसहायता संस्था स्थापन केली. अॅग्रो प्रोड्यूसर कंपनी स्थापन केली. सुरुवातीला डाळी, शेंगा चटणी, मसाले तयार करून विक्री करीत. आता शेतमालावर प्रक्रिया करून वस्तू तयार करण्याचा उद्याेग उभारला. हे सर्व करताना कुटुंबाकडे कधीच दुर्लक्ष झाले नाही. आई-वडील घरीच असतात. मुलगा दहावीत शिकतोय, पती मदतीसाठी असतात. घरातील सर्व करून मगच त्या बाहेर पडतात.

योगिनी घारे कुलसचिव, विद्यापीठ मुंबईत पदवीच्या दुसऱ्या वर्षात असतानाच लग्न झाले. सासरी पतीच्या पाठिंब्याने पदवी, पदव्युत्तर शिक्षण. एम. फिल पूर्ण केले. आता पीएच.डी. सुरू आहे. महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम. नंतर मुंबई विद्यापीठात प्रशासकीय विभागात. मुलाचे संगोपन, बालपण, शिक्षण याकडेही लक्ष देऊन, जिद्द ठेवून स्वतंत्र ओळख निर्माण केली. सर्व स्वीकारत, मार्ग काढतात.

सुप्रिया सुधीर ठाणे भारतीय स्टेट बँक एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांचे सातवी-आठवीत शिक्षण सुरू होते. अशात पतींचे अकाली निधन झाल्याने, आईसह बाबांची देखील भूमिका धिरोदात्तपणे त्या सांभाळतात. तडवळ, (ता. अक्कलकोट) येथे भारतीय स्टेट बँकेत कार्यरत. दुर्बल महिलांसाठी काही तरी करावे असा विचार करत बचत गटाच्या माध्यमातून सेवाभाव जपला आहे. दोन्ही मुले शिकली. आता नोकरीलाही लागली.

शैला खुर्द एसटी वाहक गेली बारा वर्षे राज्य परिवहन महामंडळात कंडक्टर म्हणून काम. बऱ्याचवेळा मुक्कामी जावे लागते. कधी पहाटे, कधी मध्यरात्री घरी येतात. जाताना घरी स्वयंपाकाची कमतरता पडू नये म्हणून जबाबदारी पार पाडतात. सध्या मुलाचे पेपर सुरू आहेत. दहावीचा त्याचा अभ्यास घेऊन मग घरचं काम करून पुढे नोकरीवर निघातात. रजा घेणे शक्यताे टाळतात. काहीतरी वेगळं करतोय याचे त्यांना समाधान वाटते.

साेनाली जाधव कृषी व कृषी पर्यटन निसर्गनिर्मित मानव देहाची कृतज्ञता म्हणून त्या शेतीकडे वळल्या. त्यातून पर्यटन व्यवसायास सुरुवात केली. दोन्ही मुलांना उच्चशिक्षित करून आईजन्माचे कर्तव्य बजावले. ३५ वर्षे जुना वडिलोपार्जित व्यवसाय त्या सांभाळत आहेत. रोजगार देण्याची ताकद निर्माण केली. मुलांनाही तसे घडविले. आई-वडील, घर, मुले, व्यवसाय सांभाळण्याची माेठी जबाबदारी त्या हिमतीने पार पाडतात.

पूजा कांबळे पोस्ट मास्तर, हगलूर, ता. उत्तर सोलापूर कुटुंबाची जबाबदारी आणि नोकरी दोन्ही सांभाळताना त्यांची ओढाताण होते. परंतु दोन्हीमध्ये समतोल साधत चार वर्षांपासून टपाल खात्यात शाखा डाकपाल म्हणून ग्रामीण भागात त्या काम करत आहेत. त्यांना कोणत्याही कामाचे ओझे वाटत नाही. घरातील कामेही त्या आवडीने करतात.

वैशाली सुरवसे हॉटेल सूर्या मॅनेजमेंट प्रमुख घर आणि व्यवसाय यातील समतोल ज्याला राखता आला तोच आयुष्यात यशस्वी होतो असे त्या मानतात. वेळ, प्रसंग पहात निर्णय घेता आले पाहिजेत. कुटुंबाचे करतानाच व्यवसाय सांभाळण्याचीही कसरत प्रत्येक महिलेला करावी लागते. ती कसरतच आयुष्याचा सार त्या मानतात.

संध्या गावडे परिचारिका, शासकीय रुग्णालय २६ वर्षांपासून सिव्हिलमध्ये बालरोग व स्त्री रोग विभागात सेवेत. कोविड वाॅर्डात काम. कुटुंब व रुग्णसेवेचा ताळमेळ घालताना तारेवरची कसरत करावी लागली. पती व मुलीची चांगली साथ मिळाली. रुग्ण बरा झाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हीच मोठी पावती असते, असे त्या मानतात.

मनीषा रणशूर गृहिणी आई किंवा गृहिणीपण सांभाळणं तितकं सोपं नाही. ते प्रचंड कठीण आहे. घरचं मॅनेजमेंट करणं सर्वात अवघड काम. नित्यनियमाने आणि कोणताही कंटाळा न करता त्या हे काम करतात. दिवसभर काम केल्यावरही आपल्या लोकांसाठी काही वेगळं केल्याचा आनंद त्यांना आहे.

बातम्या आणखी आहेत...