आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दृष्टिकोन:वेशभूषेबाबतच्या सवयींवर परकीय फॅशनचे आक्रमण

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुमच्या कधी लक्षात आले आहे का, की २४ अंश सेल्सियसच्या तापमानातही इकडे अनेकजण उबदार कपडे वापरू लागले आहेत? मुंबईत तर डिसेंबरमध्येही गारठा नसतो आणि पाटण्याचे हवामानही गुलाबी थंडीसारखे असते, तरीही अनेकजण थंडीपासून बचाव करण्यासाठीचे उबदार कपडे घातलेले दिसतात, जे ऑक्टोबरमध्येच आलेले असतात. माल विकण्याची कोविडनंतरची ही तत्परता म्हणावी काय? या निमित्ताने मी विचार करायला लागले की, आम्ही नकली लेदर जॅकेट आणि रेग्झिनच्या कोटसाठी इतके आग्रही का झालो आहोत? या फास्ट-फॅशनने इतक्या वेगाने आपल्या बाजारांवर कसा ताबा मिळवला आणि आपल्या कपडे आवडीनिवडीच्या सवयींत अढळ स्थान कसे मिळवले? यापेक्षा मोठे आश्चर्य म्हणजे हे सर्व मार्केटिंगविनाच आले आहे. जणू आपणच फास्ट-फॅशनचा स्वीकार करण्यासाठी आतुर झालो होतो. आता कालचीच गोष्ट पाहा. मी माझे जुने सुटकेस उघडले, त्यात हिवाळ्यासाठीचे उबदार कपडे होते. त्यातच खाली आईची हाताने वीणलेली काश्मिरी शाल होती. त्याच्या उबदारपणाच्या अनुभूतीने माझ्या आजी - आजोबांच्या हिवाळ्यातील कपड्यांची आठवण आली. हैदराबादच्या मंद थंडीत आजोबा शर्टवर खादीची बंडी घालायचे. आजीकडे दोन पश्मीना आणि एक सिल्कची शॉल होती, त्या कुणालाही मत्सर वाटावा अशा होत्या. मी आजीची तरुणपणातील छायाचित्रे पाहिली, त्यावेळी ती राजस्थानात होती. थंडीत ती पोलके, रेशमी घागरे वापरायची आणि त्यावर मोठ्या सुताची शाल घ्यायची. लोकरीच्या टोप्या आणि जॅकेट ही पुरुषांची फॅशन होती. त्यानंतर थोड्याच कालावधीत लोकरीच्या स्वेटरचा वापर वाढला. ज्या पिढीने सर्वात आधी स्वेटरचा वापर सुरू केला त्या पिढीशी माझ्या आजोबांचा संबंध होता, असे म्हणता येईल. १९ व्या शतकापर्यंत पंजाबसारख्या शीत राज्यातही स्वेटर घालायची पद्धत नव्हती. गारठून टाकणाऱ्या थंडीतही स्वेटर नव्हते. श्रीमंत लोक पश्मीना वापरायचे आणि उर्वरित लोक लोकरीची घोंगडी लपेटून घ्यायचे. याच्या किमती वेगवेगळ्या असायच्या. काहीजण सुताचे जाड कोटही वापरत. महिला आपल्या सलवार सूटसाठी हाताने विणलेल्या खादीचा वापर करायच्या. कारखान्यात तयार झालेल्या सुताच्या तुलनेत हे अधिक जाड आणि उबदार असायचे.

विणकामाची सुरुवात इजिप्तमधून झाली. इंग्रजांनी आपल्यासोबत ते भारतात आणले आणि मिशनरी शाळांतील मुलींना त्यांनी विणकाम शिकवायला सुरुवात केली. सर्वात आधी त्यांनी पायमोजे तयार केले. २० वे शतक उजाडता उजाडता लुधियांना हा यंत्रावर तयार झालेल्या कपड्यांचा गड बनला होता. श्रीमंत लोक आता स्वेटर घालताना दिसू लागले. स्वेटरचे विणकाम महिला करायच्या, मात्र सुरुवातीला ते केवळ श्रीमंत पुरुषच वापरायचे. सामान्य नागरिकांनी नंतर स्वेटरचा वापर सुरू केला. ते मशीनवर तयार केलेले आणि घरात आई, आजींनीही विणलेले असायचे. आता फास्ट-फॉरवर्ड करून २०१० मध्ये येऊ. बहुराष्ट्रीय ब्रँडसचे भारतात आगमन झाले. तोपर्यंत आपण मॉल आणि सवलतीच्या दरात आयात दुकानांतील उबदार कपडे वापरायला सुरुवात केली होती. मात्र त्या ब्रँडनी फॅशन जगताला कायमचे बदलून टाकले. आपल्याला तोपर्यंत फॅशनसाठी हिवाळा आणि उन्हाळा हे दोनच ऋतू माहीत होते, मात्र त्यांनी ५२ सूक्ष्म हंगामांची आपल्याला ओळख करून दिली, म्हणजे प्रत्येक आठवड्यासाठी नवीन फॅशन. त्यांची उत्पादने सिंथेटिक फायबरपासून निर्मित होती, ज्यात इलेस्टीन, नायलॉन आणि पॉलिस्टरसह अॅक्रिलिकचा मोठा वापर करण्यात आला होता. या फास्ट-फॅशनचा ६८ टक्के भाग नंतर कचराकुंड्यांत टाकला जाऊ लागला. ही पालिकांसाठी मोठी समस्या बनली. कोविड-१९ मध्ये नुकसान झाल्यानंतर त्याची भरपाई करण्याचा निर्णय या ब्रँडनी घेतला आणि ते आपल्या उद्दिष्टात यशस्वी ठरले, असे दिसते. मात्र आम्हा भारतीयांना काय झाले आहे की ते आपली पारंपरिक विणकाम केलेले कपडे सोडून आंतरराष्ट्रीय दुकांनातील शिल्लक कपडे घालून फिरण्याला आपला मोठेपणा समजयाला लागले आहेत? (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)

निधी डुगर कुंडलिया युवा लेखिका आणि पत्रकार nidhidugar@gmail.com

बातम्या आणखी आहेत...