आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंतवणूक सल्ला:बचतीची करा योग्य गुंतवणूक

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भिशीऐवजी ‘आर. डी.’ उघडा अनेक महिला आपल्या ओळखीच्या ठराविक मैत्रिणी किंवा शेजारपाजारच्या स्त्रियांना एकत्र करून भिशी अथवा किटीच्या स्वरूपात एक ग्रुप तयार करतात. त्यामध्ये दर महिन्याला एक ठराविक रक्कम जमा केली जाते. प्रत्येक महिन्याला जमा झालेली सगळी रक्कम एखाद्या महिलेला लकी ड्रॉच्या माध्यमातून मिळते. अशा वेळी आपण केलेल्या बचतीमुळेच घसघशीत रक्कम मिळाल्याला आनंद महिलांना होतो. मात्र दर महिन्याला अशा पद्धतीने केलेल्या बचतीमधून कुठलाच आर्थिक फायदा होत नाही. त्याऐवजी भिशी किंवा किटीमध्ये टाकली जाणाऱ्या रकमेसाठी आर. डी. खाते अर्थात रिकरिंग डिपॉझिट अकाउंट उघडल्यास त्यावर काही निश्चित टक्क्यांनी व्याज मिळते. गुंतवणूक सोन्यात करा, दागिन्यांत नाही

सोन्यात गुंतवणुकीची सवय ही भारतीय महिलांची एक चांगली सवय आहे. मात्र, ही गुंतवणूक सोन्याच्या दागिन्यांमध्ये नाही तर शुद्ध सोन्याच्या स्वरूपात करणे आवश्यक आहे. तरच त्या गुंतवणुकीचा लाभ आणि फायदा आपल्याला मिळू शकतो. कारण गुंतवणूक म्हणून घेतलेला दागिना मोडावा लागला तर त्याचे मेकिंग चार्जेस, सोन्याची गुणवत्ता, दागिन्यांची झीज, कॅरेट इत्यादी अनेक गोष्टी समाविष्ट असल्यामुळे सोन्याच्या दागिन्यांची तेवढी किंमत मिळत नाही. तुलनेने शुद्ध सोन्याची नाणी, वेढे किंवा तुकडे घेतल्यास ते सोने मोडताना त्यावेळचा भाव मिळतो आणि झीज वगैरेचा प्रश्नच नसल्यामुळे चढ्या भावाचा फायदाही मिळतो.

छोट्या रकमेपासून करा सुरूवात दर महिन्याला ठराविक रकमेची एसआयपी अर्थात सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनअंतर्गत गुंतवणूक करणं हे बचतीच्या दिशेने टाकलेलं महत्त्वपूर्ण पाऊल ठरू शकतं. गृहिणी महिन्याला ५०० रुपये जरी वाचवू शकत असल्या तरी ती रक्कम एसआयपीमध्ये गुंतवावी. यासाठी गृहिणींचं बँकेत खातं असणं आवश्यक आहे. शक्य असल्यास एक एसआयपी लघु कालावधीची आणि दुसरी दीर्घ कालावधीची असे केल्यास उत्तम. जितक्या ,लवकर एसआयपीमध्ये गुंतवणूक करणे सुरू कराल आणि जितक्या दीर्घ कालावधीसाठी या गुंतवणुकीचे नियोजन कराल तितका आर्थिक लाभ अधिक मिळतो.

मासिक टपाल योजना गृहिणी तसंच नोकरदार महिलांसाठीही टपाल खात्याच्या मासिक गुंतवणूक योजना हा एक उत्तम पर्याय आहे. कारण यामुळे बचतीमधून मिळणारे नियमित उत्पन्न निश्चित करता येते. या योजनांचा कालावधी एक वर्षांपासून ते पाच वर्षांपर्यंत असतो. कमीत कमी एक हजार रुपयांपासून ते जास्तीत जास्त साडेचार लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. ही योजना वनटाइम इन्व्हेस्टमेंटसारखी असते. यामुळे रक्कम आणि गुंतवणुकीच्या कालावधीच्या आधारे व्याज मिळवता येते.

टीम मधुरिमा

बातम्या आणखी आहेत...