आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संधींचा मार्ग:चॅटजीपीटी हे तंत्रज्ञान म्हणजे नोकऱ्यांसाठी धोका आहे का?

छत्रपती संभाजीनगर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘एआय तंत्रज्ञान विकसित होत असताना या प्रणाली लवकरच मानवाकडून पारंपरिकपणे केलेल्या कार्यांची जागा घेतील, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. अशाच एका तंत्रज्ञानाने अलीकडेच सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे, ते म्हणजे चॅटजीपीटी. हे ओपनएआयद्वारे विकसित केलेले एक मोठे भाषा-मॉडेल आहे. पण, चॅटजीपीटी खरोखरच नोकऱ्यांसाठी धोकादायक ठरू शकते का?’ तुम्ही नुकताच वाचलेला परिच्छेद चॅटजीपीटीने लिहिला होता. तुम्हाला कळले का? चॅटजीपीटी गेल्या वर्षी ३० नोव्हेंबर रोजी लाँच करण्यात आले होते आणि एका महिन्यातच त्याचे १० कोटींच्या वर वापरकर्ते झाले होते. मग अखेर ते कसे काम करते? साधारणपणे, आपण इंटरनेटवर डेटा आणि माहिती शोधतो, परंतु चॅटजीपीटी नवीन सामग्री प्रदान करण्यासाठी अशाच एका जनरेटिव्ह एआय तंत्रज्ञानाचा वापर करते. सोप्या भाषेत सांगायचे तर चॅटजीपीटी डेटा शोधत नाही, उलट माहिती संकलित करून नवीन डेटा तयार करते. चॅटजीपीटीने ट्युरिंग चाचणीदेखील यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली आहे, जी मानवासारखी संभाषणे अचूकपणे आणि कोणतीही चूक न करता चालवण्याच्या मशीनच्या क्षमतेचे मोजमाप करते. रोमँटिक कविता लिहिणे असो वा पटकथा-लेखन, हे उपकरण सर्व काही करू शकते! नोकऱ्यांवर परिणाम : पूर्वी असे मानले जात होते की, सर्जनशील नोकऱ्यांवर ऑटोमेशनमुळे परिणाम होणार नाही. पण, चॅटजीपीटीसारख्या शक्तिशाली जनरेटिव्ह एआय टूल्सच्या उदयाने चित्र बदलत आहे. चॅटजीपीटीने कॉपीरायटिंग, मीडिया रायटिंग, फिक्शन रायटिंग, स्क्रीन-राइटिंग इ. मध्ये प्रभावी क्षमता दाखवली असली तरी सर्जनशील लोकांच्या अद्वितीय क्षमतांची जागा घेणे बाकी आहे. सर्जनशीलतेसाठी सहानुभूती, अंतःप्रेरणा, मानवी वर्तन आणि संस्कृतीचे सखोल आकलन गरजेचे असते आणि या इतक्या जटिल गोष्टी आहेत की त्यांचे मशीनद्वारे पूर्णपणे अनुसरण करता येणे शक्य नाही. अशा अनेक भूमिका आहेत, ज्यात एखादे बिझनेस-व्हिजन वास्तविकतेत उतरवण्यासाठी मानवी बुद्धिमत्ता गरजेची असते, उदा. प्रोग्राम व्यवस्थापन किंवा अग्रीगेशन. एआय हे करू शकत नाही. चला, तर मग असे काही बिझनेस व्हर्टिकल पाहू, ज्यात चॅटजीपीटी आपल्याला मदत करू शकते : ग्राहक सेवा : कंपन्या चॅटजीपीटीचा वापर साध्या तसेच जटिल चौकशीला प्रतिसाद देण्यासाठी करू शकतात. तथापि, अंतिम निर्णय घेण्यासाठी प्रश्नांची उत्तरे देण्यापेक्षा आणखी बऱ्याच गोष्टींची आवश्यकता असेल. यासाठी सक्रिय व जलद निर्णय घेण्याची क्षमता आवश्यक आहे, ती केवळ मानवांमध्येच असू शकते. प्रोग्रामिंग : चॅटजीपीटी कोडिंगमध्ये मदत करू शकते, परंतु उच्चस्तरीय डिझाइनच्या निर्मितीमध्ये ते मानवांची जागा घेण्याची शक्यता नाही. ही कामे करण्यासाठी मानवाला सर्जनशीलता, टीकात्मक विचार, निर्णयक्षमता यांसारख्या कौशल्यांची आवश्यकता असते. अशा परिस्थितीत चॅटजीपीटी हे प्रोग्रामर आणि प्राॅडक्ट डिझायनर्ससाठी एक उपयुक्त साधन ठरू शकते, ते त्यांची जागा घेऊ शकत नाही. होय, आता सॉफ्टवेअर अभियंत्यांना बदलत्या तंत्रज्ञान-लँडस्केपमध्ये सुसंगत राहण्यासाठी समस्या सोडवणे, डिझाइन विचार आणि प्रकल्प व्यवस्थापन यासाठी कौशल्ये विकसित करणे आवश्यक आहे. चॅटजीपीटीच्या मर्यादा आणि भविष्यातील संधी : अखेर चॅटजीपीटी हे एक अल्गोरिदम आहे, जे त्याच्या सिस्टिममध्ये भरलेल्या डेटावर अवलंबून आहे. सध्या त्यात फक्त डिसेंबर २०२१ पर्यंतचा डेटा आहे, त्यानंतर प्रश्नांची अचूक उत्तरे देण्यासाठी नगण्य डेटा आहे. सर्ज इंजिनच्या उलट, चॅटजीपीटी त्याच्या ज्ञानाचा स्रोतदेखील प्रकट करत नाही. वापर केलेल्या सामग्रीच्या गुणवत्तेवर चॅटजीपीटीद्वारे वापरल्या जाणाऱ्या प्रशिक्षण डेटाच्या मर्यादा आणि पूर्वग्रहांचे मूल्यांकन करण्यात अक्षमतेमुळे परिणाम होऊ शकतो. पुढे जाण्याचा मार्ग : चॅटजीपीटीसारखे तांत्रिक शोध हे मानवांना मदत करण्यासाठी आहेत आणि नवीन रोजगार संधीदेखील निर्माण करू शकतात. समस्या सोडवणारे व्यावसायिक या साधनावर प्रभुत्व मिळवू शकले, तर त्यांच्याभोवती संपूर्ण नवीन उद्योग वाढू शकेल. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)

पंकज बन्सल Taggd (डिजिटल रिक्रूटमेंट प्लॅटफॉर्म) व वर्क युनिव्हर्सचे सहसंस्थापक, @pankajbansalPB.

बातम्या आणखी आहेत...