आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्लेषण:अराजकतेच्या उंबरठ्यावर पोहोचला इस्रायल

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आज इस्रायलची स्थिती कधीही स्फोट होईल अशा प्रेशर कुकरसारखी झाली आहे. एकीकडे इस्रायली वसाहती वाढत चालल्या आहेत आणि पॅलेस्टिनी गावांना आगी लावल्या जात आहेत. तर याच्या विरोधात पॅलेस्टिनी तरुण इस्रायलविरोधात आक्रमक झाले आहेत. इस्रायलमध्येच पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी न्याययंत्रणेवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नांविरोधात आंदोलन, निदर्शने होत आहेत. या सर्वांमुळे इस्रायलमध्ये प्रशासकीय अराजकाची स्थिती तयार झाली आहे. स्थिती एवढी बिकट आहे की, मोसादच्या अनेक माजी प्रमुखांनी नेतन्याहूंविरोधात आघाडी उघडली आहे. यात दैनी यातोम सर्वात नवे नाव आहे. गेल्या आठवड्यात त्यांनी इस्रायली माध्यमांसमोर बोलताना सांगितले की, जर नेत्यनाहू असेच वागत राहिले आणि न्यायालयाची स्वायत्तता संपवण्याचा प्रयत्न करत राहिले तर लढाऊ वैमानिक आणि विशेष दले सरकारच्या आदेशांचे उल्लंघन करण्यास कायदेशीरदृष्ट्या सक्षम होतील. यातोम यांचे म्हणणे आहे की, त्यांनी एका लोकशाही देशाशी करार केला आहे, मात्र जर इस्रायल हुकूमशाही देश झाला आणि लष्कराला एका बेकायदेशीर सरकारकडून आदेश मिळू लागले तर त्यांना ते मानण्यास नकार देण्याचा पूर्ण हक्क असेल. गेल्या काही दिवसांत विशेष गुप्त मोहिमांतील २५० अधिकाऱ्यांनी एका सार्वजनिक पत्रावर स्वाक्षरी केल्या. त्यात म्हटले आहे की, जर सरकारने हुकूमशाही पद्धत थांबवली नाही तर ते कामावर जाण्यास नकार देतील. इस्रायलने याआधी कधी अशा स्थितीचा सामना केलेला नव्हता, ज्यात पॅलेस्टिनींचा इंतिफाद, ज्यूंचे बंड आणि इस्रायली नागरिकांच्या निदर्शनांचा एकाच वेळी सामना करावा लागला असेल. मात्र, नेतन्याहू यांचे अति उजव्या विचारसरणीचे सरकार सत्तेवर येताच ही परिस्थिती निर्माण होऊ लागली. गेल्या रविवारी एका पॅलेस्टिनी बंदूकधाऱ्याने नॅबलुसमध्ये दोन इस्रायली ज्यूंची हत्या केली. काही दिवसांपूर्वी माजी इस्रायली सैन्य दलांकडून मारल्या गेलेल्या ११ पॅलेस्टिनींच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्याने हे कृत्य केले. यानंतर ज्यूंनी चार पॅलेस्टिनी गावांतील कमीत कमी २०० घरांना आग लावली. त्याआधी शनिवारी रात्री तेल अवीवमध्ये दीड लाख इस्रायली रस्त्यावर उतरले आणि नेत्यनाहूंकडून न्याययंत्रणेवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नांना विरोध दर्शवत होते. नेतन्याहूंनी त्यांच्या कॅबिनेट मंत्र्यांना सांगून टाकले होते आता ते आंदोलकांवर प्रहार करण्यास मोकळे आहेत. ज्यू सेटलर्स आणि पॅलेस्टिनींमध्ये होणारे तंटे नवे नाहीत. मात्र, आज इस्रायलमध्ये जशी स्थिती आहे आणि ज्या प्रकारचे लोक सत्तेत आहेत, तशात स्थिती खूप बिकट होते. आज सत्तेत असे उजवे बसले आहेत, ज्यांची पूर्ण वेस्ट बँक इस्रायलमध्ये सामावून घेण्याची योजना आहे आणि पोलिस व लष्कर त्यांच्या हातात आहे. संयम दाखवणाऱ्या मंत्र्यांना हटवण्यात आले आहे. आता नेतन्याहू न्यायिक सुधारणेच्या नावाने इस्रायली सर्वोच्च न्यायालयाची स्वायत्तता संपवत आहेत, जो त्यांच्या देशात लोकशाहीच्या शेवटावर अखेरचा प्रहार ठरेल. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या सल्ल्याकडेही नेतन्याहूंनी दुर्लक्ष केले आहे. ते विदेशी नेते आणि पत्रकारांना म्हणत आहेत की ते केवळ तांत्रिक बदल करत आहेत, म्हणजे इस्रायलचे सर्वाेच्च न्यायालय अमेरिका, कॅनडा वा फ्रान्ससारखे होईल. मात्र हे खरे आहे का? कारण असे करून नेतन्याहू यादवीचा धोका पत्करत आहेत. ते पूर्ण जगातील ज्यू लोकशाहीवाद्यांनाही आपल्यापासून लांब करत आहेत. यातून अमेरिकेशी इस्रायलच्या नात्यांवरही वाईट परिणाम होईल आणि त्याच्या हायटेक क्रांतीलाही याचा फटका सहन करावा लागेल. नेतन्याहू एवढी मोठी जोखीम एखाद्या किरकोळ गोष्टीसाठी घेणार नाहीत. त्यांच्या मनात एखादी मोठी योजना असेल. या कथित न्यायिक बदलांच्या मुळात त्यांच्यावरील घोटाळे आणि भ्रष्टाचाराच्या आरोपातून वाचवण्याचा हेतू तर नसेल ना? कारण जर आरोप सिद्ध झाले तर त्यांना कैदेतही जावे लागेल. या कथित न्यायिक सुधारणांनंतर ज्यू सेटलर्स कोणत्याही पॅलेस्टिनी जमिनीवर ताबा मिळवून तिच्यावर नवी वसाहत वसवू शकतात. हे सर्व बेंजामिन नेतन्याहू यांच्या पॉवर गेमशिवाय दुसरे काही नाही. (द न्यूयॉर्क टाइम्समधून)

थॉमस एल. फ्रीडमॅन तीन वेळा पुलित्झर अवॉर्ड विजेते व ‘द न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये स्तंभलेखक

बातम्या आणखी आहेत...