आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्धे आकाश:एका थापडीने हे सर्व सुरू होते, मुलींनी ते सहन करू नये!

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलीकडेच माझ्या एका मैत्रिणीने मला सांगितले की, तिच्या पतीने - ज्याच्याशी ती गेल्या २० वर्षांपासून संसार करते- तिच्या चेहऱ्यावर गरम किटली मारली होती. तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. असे असतानाही तिने आपल्या पतीच्या वागणुकीचा बचाव करण्याचा प्रयत्न केला की, त्या वेळी तो मद्यधुंद होता, आमची वादावादी सुरू होती तो पहिल्यांदाच तिला मारत होता! मग हे प्रकरण घरगुती हिंसाचारात येते का? माझ्या मैत्रिणीने हिंसाचाराच्या केवळ एका घटनेनंतर त्या माणसाला सोडले पाहिजे का, जो तिचा दोन दशकांपासून पती आहे, ज्याच्यासोबत तिने अर्ध्याहून अधिक आयुष्य व्यतीत केले आहे आणि जो तिच्या मुलांचा बाप आहे? यावर काय बोलावे ते कळत नाही. ‘थप्पड’ चित्रपटात आपण पाहिले की, पहिल्या थापडीनेच गैरवर्तन सुरू होते आणि ते अजिबात खपवून घेतले जाऊ नये. अनुपमा गुलाटी आठवतात का? त्यांचे पती राजेश हे सॉफ्टवेअर इंजिनिअर होते. त्याने अनुपमाला जोरात चापट मारली. ती बेशुद्ध पडली होती. त्यानंतर राजेशने उशीने तिचा श्वास गुदमरवला आणि इलेक्ट्रिक करवतीने तिच्या शरीराचे ७२ तुकडे केले. चापट मारून सुरू झालेली ही काही पहिली घटना नव्हती. मग श्रद्धा वालकरसारख्या मुली - ज्या दीर्घकाळ अत्याचाराला बळी पडल्या आहेत - त्यांनी जोडीदार सोडला तर ठीक आहे, पण एका चापटीनंतर तसे करणे योग्य नाही, असे कसे म्हणता येईल? कौटुंबिक हिंसाचाराचा राक्षस दोन्ही घटनांमध्ये उपस्थित नाही का? कारण श्रद्धासारख्या मुलींचा बळी जाऊनही पीडितांनी गप्प बसले तर बरे होईल, असेच समाजाला वाटते. मारहाण झालेली स्त्री ही समाजाची समस्या बनते. तुझी समस्या. पण, त्याच्याशी आम्हाला देणे-घेणे? उद्या ती तुमची बहीण, आई, मित्र, सोबती आणि मुलगीदेखील असू शकते, याच्याशी आपला संबंध आहे. पुढच्या वेळी तुमच्याबाबतही असे होऊ शकते. अर्थात अत्याचाराला फक्त महिलाच बळी पडत नाहीत, पुरुषांनाही याचा सामना करावा लागतो. परंतु, बळाच्या वापरावर आधारित कौटुंबिक हिंसाचारासाठी पुरुष महिलांइतके असुरक्षित नाहीत. नॅशनल कोएलिशन अगेन्स्ट डोमेस्टिक व्हायोलेन्सच्या मते, एकतृतीयांश महिला आणि एकचतुर्थांश पुरुष घरगुती हिंसाचार अनुभवतात. पण जेव्हा जाळणे, मारहाण करणे किंवा गुदमरवणे यांसारख्या गंभीर हिंसाचाराचा प्रसंग येतो, तेव्हा असे सातपैकी एका पुरुषाबाबत होते, तर चारपैकी एक महिला त्याची बळी ठरते. १३ पैकी एका पुरुषाच्या तुलनेत निम्म्या महिलांची हत्या त्यांच्या साथीदारांनी केली आहे. फरक मोठा आहे. स्त्रिया शांतपणे अत्याचार सहन करतात तेव्हा त्यांना माहीत असते की, त्यांचा खूनही होऊ शकतो किंवा त्याहून वाईट म्हणजे मारहाणीमुळे पक्षाघात होऊ शकतो. आणि कोणीही त्यांना मदत करणार नाही. यामुळेच इतकं असूनही ती आपल्या जोडीदारासोबत हसतमुखाने चकचकीत पार्ट्यांमध्ये हजेरी लावते. मेक-अप, सनग्लासेस आणि स्कार्फने ती तिच्या जखमा लपवते. ती तिच्या आईला सांगते की, ती पडली होती, त्यामुळे तिला दुखापत झाली. त्याच वेळी ती तिच्या जोडीदाराला हा संदेश देते की, तू मला मारहाण करत राहिलास, माझा अपमान करत राहिलास तरी काही फरक पडत नाही, कारण तू वास्तवात काय आहेस, हे कोणालाही कळणार नाही. त्याला कोणी वाचवू शकत नाही, हे त्या राक्षसालाही माहीत असते. यामुळे त्याची हिंमत आणखी वाढते. पुढच्या वेळी तो आणखी जोरात मारतो. पण, लक्षात ठेवा, मौनाची किंमत मोजावी लागते. म्हणूनच बोला, तुम्हाला जे बोलायचे आहे ते बोला. तुम्ही पुरुष असो वा स्त्री, तुम्हाला कोणी मारले तर त्याला गैरवर्तन समजा. मी माझ्या मैत्रिणीला म्हणाले की, वीस वर्षे एकत्र राहूनही एखादा माणूस आपल्या जोडीदाराचा आदर करू शकत नाही, तर तूही असेच का करायचे? अनावश्यक भावनांपेक्षा जीवन महत्त्वाचे! (ही लेखिकेची वैयक्तिक मते आहेत.)

मेघना पंत पुरस्कारप्राप्त लेखिका, पत्रकार आणि वक्त्या meghnapant@gmail.com

बातम्या आणखी आहेत...