आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • It Is Everyone's Responsibility To Spread The Light Of Our Country To All Over The World

मॅनेजमेंट फंडा:आपल्या देशाची चमक जगात सर्वदूर पोहोचवणे ही प्रत्येकाची जबाबदारी

छत्रपती संभाजीनगर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुर्कस्तानचे सुंदर पर्यटन शहर एंटालिया येथे पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत वाहतुकीची अनेक साधने सहज उपलब्ध आहेत, हे राजधानी इस्तंबूलपासून ५१६ किमी अंतरावर आहे. तिथे लोक सर्व प्रकारची वाहतूक वापरतात. काम करत नाही, असे तिथे काही नाही. विमानतळ आणि बस यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी एस्केलेटरपासून ट्राम स्थानकांपर्यंत सार्वजनिक वाहतुकीचे अनेक पर्याय आहेत. जगभरातील माझ्या अलीकडील प्रवासात मी पाहिले की, सुमारे १२ लाख लोकसंख्या असलेल्या एंटालियामध्ये सर्वात विश्वासार्ह आणि किफायतशीर सार्वजनिक वाहतूक आहे. दोन प्रकारच्या ट्राम, अनेक बस ऑपरेटर, शेकडो टॅक्सी कोणत्याही घोटाळ्याशिवाय पर्यटकांना घेऊन जातात. कुंपण व खांबांना बांधलेल्या इलेक्ट्रिक स्कूटर शहरात कुठेही आढळतात. अनेक स्कूटर भाड्याने देणाऱ्या कंपन्यांच्या या स्कूटर्स कमी अंतरासाठी सोयीच्या असतात. हवामान चांगले असेल व तुम्हाला स्थानिकांप्रमाणे शहराचा आनंद घ्यायचा असेल तर एंटालिया सायकल शेअरिंग हा आणखी एक चांगला पर्याय आहे. कोणतीही वाहतूक फक्त एका कार्डाने वापरता येते. सर्वात चांगला भाग असा की, कोणतेही परदेशी शुल्क नाही, किमान शुल्क भरून कोणीही ते घेऊ शकते. आज सार्वजनिक वाहतूक, एस्केलेटर व लिफ्ट्ससारख्या स्थानकांवरच्या सोयींवर लक्ष केंद्रित करण्याचे कारण म्हणजे होळीच्या दिवशी मी मुंबई सोडली तेव्हा मला कळले की, मुंबईतील ७९ स्थानकांवर बसवलेल्या १११ एस्केलेटरपैकी अनेक बंद आहेत. लक्षात ठेवा, देशात मोठ्या संख्येने वृद्ध आहेत, ते सामान घेऊन पायऱ्या चढू शकत नाहीत. केवळ मुंबईतच नव्हे, तर देशभरातील अनेक स्थानकांवर एस्केलेटर कार्यरत नसणे असामान्य नाही. तुम्ही कधी विचार केला का की, लांब पल्ल्याच्या रेल्वे येण्याआधी हे इलेक्ट्रिक जिने अचानक का थांबतात? ज्या कुलींच्या उत्पन्नावर याचा परिणाम होतो, ते मेल-एक्स्प्रेस गाड्या येण्यापूर्वीच त्यांची तोडफोड करतात किंवा थांबवतात, अशी रेल्वे अधिकाऱ्यांची खात्री आहे. केवळ मुंबईतच नाही, तर बंगळुरूमध्येही इलेक्ट्रिक स्कूटर-सायकल अशी स्वस्त व पर्यायी वाहतुकीची साधने मेट्रो स्थानकांखाली काम करत नाहीत, कारण ऑटोरिक्षा त्यांचे नुकसान करतात, जेणेकरून प्रवासी त्यांच्याकडे यावेत. लोकांनी त्यांचा नाश करण्यात ऊर्जा खर्च केली तर कोणताही देश प्रगती करू शकत नाही, तेही केवळ जुन्या व्यवसायात गुंतलेल्या काही लोकांची रोजीरोटी हिरावून घेतली म्हणून. त्याऐवजी त्यांनी त्यांच्या वाहतुकीच्या पद्धतीमध्ये अभ्यागतांचा अनुभव कसा वाढवता येईल, याचा विचार केला पाहिजे. आपल्या विकास धोरणांतर्गत नवीन सुविधा, कल्पना येतील. त्या विचारांशिवाय ही वाढती लोकसंख्या कशी हाताळायची? कल्पना करा, १,५५,००० पोस्ट ऑफिसने त्यांच्या कर्मचाऱ्यांना इंटरनेट वायर कापण्याच्या कामावर लावले, कारण त्यामुळे आपण त्यांचे पोस्टमन व पत्र सेवा घेणे बंद केले आहे, तर दळणवळण उद्योगाचे काय होईल. एक समाज म्हणून आपण तेच काम नव्या पद्धतीने करण्याचे मार्ग शोधायला हवे. {फंडा असा की, स्पर्धकांची प्रगती कमी करण्यात आपली ऊर्जा वाया घालवण्याऐवजी, ती विद्यमान व्यवसाय मजबूत करण्यासाठी आपण गुंतवली, तर एक देश म्हणून आपण आंतरराष्ट्रीय क्षेत्रात चांगली कामगिरी करू शकू.

एन. रघुरामन, मॅनेजमेंट गुरू [raghu@dbcorp.in]

बातम्या आणखी आहेत...