आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्वयंरोजगाराच्या संदर्भात सरकारकडून अनेकदा म्हटले जाते की, तरुणांनी केवळ नोकरी शोधणारे न राहता स्वयंरोजगाराच्या दिशेने जावे आणि इतरांना नोकरी देणारे झाले पाहिजे. या संकल्पनेंतर्गत स्वयंरोजगाराचा एक भाग मानून भजे तळणे (विक्री) करण्याचा सल्ला देण्यात आला. परंतु, खोलवर विचार केला तर स्वयंरोजगार हा प्राचीन वस्तुविनिमय पद्धतीचा (पैशाच्या ऐवजी वस्तू किंवा सेवा) एक सुधारित प्रकार आहे. तो एका स्थिर समाजात, कृषी-आधारित अर्थव्यवस्थेत किंवा ग्रामीण भागात तर पिढ्यान््पिढ्या चालू शकत होता. पण, आज तंत्रज्ञानाचा वेग एवढा प्रचंड असताना स्वयंरोजगाराचे स्वरूप बदलणे गरजेचे आहे. उत्पादन स्वस्त आणि जीवन सुलभ करणे हे तंत्रज्ञानाचे वैशिष्ट्य आहे. पण, ते मिळवण्यासाठी स्पर्धा असते आणि ज्याच्याकडे भांडवल असते तो आधी त्याचा फायदा घेतो. एक उदाहरण घ्या. आज बाजारपेठेचे मानसशास्त्र तूप किंवा मिठाई खाणे आरोग्यासाठी वाईट मानते. मार्केट फोर्सने चॉकलेट (विशेषत: डार्क चॉकलेट) हृदयासाठी चांगले म्हणून प्रचार करण्यास सुरुवात केली. सणासुदीला मिठाईची जागा चॉकलेटच्या पाकिटांनी घेतली. कारण वंशपरंपरागत नोकरीत गुंतलेला मिठाईवाला हे भांडवल, तंत्रज्ञान आणि होम डिलिव्हरीच्या नवीन पद्धतींशी स्पर्धा करू शकत नाही. त्यामुळे उद्योजकतेला प्रोत्साहन देणे आणि भजे विकण्याला रोजगार समजणे यातील फरक समजून घ्यावा लागेल. त्यासाठी त्यांच्या कामात तंत्रज्ञानाचा समावेश करण्याबरोबरच उद्योजकतेसाठी आवश्यक संसाधने जमवावी लागतील. आणि ही जबाबदारी सरकारसोबतच जनतेचीही आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.