आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा:योग्य असण्यापेक्षा नम्र असणे महत्त्वाचे

औरंगाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

फंडा असा की, देवाने सर्व प्राणिमात्रांचे हृदय प्रेम आणि करुणेने भरले आहे. इतरांच्या जीवनात बदल घडवून आणण्याची ही एक संधी आहे. तुम्हाला ‘तारे ज़मीं पर’ चित्रपट आठवतोय का? त्यात आमिर खान कला शिक्षक बनला होता. तो दर्शिलच्या वडिलांना सोलोमन आयलँडविषयी सांगतो. दर्शिलचे वडील डिस्लेक्सियाने ग्रसित मुलाचा नेहमी राग-राग करत असतात. त्या खंडावरील जमाती झाडांना कापत नाहीत. ते झाडाला वेढा घालतात आणि रोज तासन‌्तास त्याला शिव्या देतात. काही दिवसांनंतर शिव्या दिल्यामुळे झाडाचा मेंदू (हाे, त्यांच्यातही मेंदू असतो!)ची आण्विक रचना बदलते आणि त्याला आतून पोकळ करते. दुर्दैवाने ते झाड गळून पडते. ही खरी गोष्ट आहे. आपल्याला याचे आश्चर्य वाटेल की, अदृश्य विचार आणि शब्द झाडाला कसे मारतात? पण हे खरं आहे, माणसांमध्येही असे घडते. मानसिक आरोग्य हा आरोग्य आणि निरोगीपणाचा एक अंगभूत भाग आहे. व्यापकपणे सांगायचे तर, हा आपल्या मानसिक आरोग्याशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संबंधित क्रियाकलापांचा संग्रह आहे. हे मानसिक आजारांचे प्रतिबंध आणि अशा आजारांमुळे प्रभावित लोकांचे उपचार आणि पुनर्वसन यांच्याशी संबंधित आहे. डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, ९ कोटींहून अधिक भारतीय कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्रस्त आहेत. पण आपल्या समाजात, आपण अनेकदा मानसिक आरोग्याशी संबंधित चर्चेला किंवा मदत मागण्यासाठी प्रोत्साहन देत नाही. अनेक चित्रपट जसे छिछोरे, डिअर जिंदगी, तमाशा, हिरोइन, बर्फी, माय नेम इज खान, ब्लॅक आणि १५ पार्क अ‍ॅव्हेन्यूने आपल्या पद्धतीने अनेक मानसिक रोग दाखवण्याचे चांगले काम केले. पण आपल्यासारख्या सामान्य लोकांना अजूनही संवेदनशील होण्याची जास्त गरज आहे. हा विचार काल माझ्या डोक्यात आला, जेव्हा मी राजस्थान सचिवालयातील एक कर्मचारी अक्षय भटनागरचे प्रकरण ऐकले. अक्षय ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर (एएसडी)ने ग्रस्त आहे. हे अपंगत्व मेंदूतील फरकांमुळे उद्भवतं. तो ३१ डिसेंबर २०२० रोजी राजस्थान सचिवालयाच्या कार्मिक विभागात आरक्षण श्रेणीतून कनिष्ठ सहायक लिपिक (ग्रेड-२) या पदावर रुजू झाला होता.

राजस्थान सरकारमध्ये तो पहिला होता, ज्याला २०१६ मध्ये लागू नव्या आरक्षण श्रेणीतून नियुक्ती मिळाली होती. रुजू होण्याच्या दिवशी अक्षयच्या अधिकाऱ्यांना एएसडी असलेल्या लोकांच्या वर्तणुकीच्या पद्धतींबद्दल तसेच डेटा एंट्री कार्यातील त्यांच्या कौशल्याबद्दल माहिती देण्यात आली. खरं तर अनेक लोक त्याला काम देण्यास घाबरत होते. तो अनेक दिवस रिकामा बसून राहायचा. नंतर त्याने स्वत:च आपल्या पद्धतीने काम करणे सुरू केले. पण ११ एप्रिल २०२२ रोजी त्याच्या तथाकथित वेगळ्या वर्तनासाठी कुणीतरी त्याचा छळ केला (जसे दर्शिल “तारे जमीं पर’मध्ये करतो). त्याची आई प्रतिभा यांनी हे प्रकरण राजस्थान सरकारच्या मुख्य सचिव आणि अपंग व्यक्तींच्या आयुक्तांकडे लेखी स्वरूपात नेले, त्यांनी चौकशी समिती स्थापन केली, ती छेडछाड करणाऱ्याची ओळख पटवण्यात अयशस्वी ठरली आणि यामुळे अक्षयने काय केले हे कळू शकले नाही.

कुणाला शिक्षा करण्याऐवजी कर्मचाऱ्यांमध्ये जागरूकतेसह स्वीकारण्याचे वातावरण तयार करण्यासाठी आणि लोकांना संवेदनशील बनवण्यासाठी बोलावण्यात आले. २५ मे रोजी सचिवालयात आयोजित अभिमुखता कार्यक्रमानंतर सर्व विभागांना अपंग व्यक्तींचे हक्क अधिनियम-२०१६च्या कलम ८९ आणि ९२ वर प्रकाश टाकणारी नोटीस पाठवण्यात आली होती. त्यानुसार अशा सर्व लोकांना संरक्षण देण्याची विनंती करण्यात आली होती. आपल्या जवळपास अनेक ‘वेगळी-योग्यता’ असणारे लोक आहेत, याचे भान ठेवावे. त्यांनाही आपल्यासारखं चांगलं जीवन जगण्याचा अधिकार आहे, असे तुम्हाला वाटत असेल, तर आपल्याला “खास जन्माला आला आहात तर तुम्हाला नियमांच्या बंधनाची काय गरज?’ असं म्हणायला हवं. मग बघा ते कसं प्रभुत्वानं काम करतात. माझ्यावर विश्वास बसत नसेल तर एकदा करून बघा.

मॅनेजमेंट गुरु raghu@dbcorp.in एन. रघुरामन

बातम्या आणखी आहेत...