आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा:हवामान बदल रोखण्यासाठी तातडीने आवश्यक पावले उचलणे गरजेचे

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार-सोमवारच्या मध्यरात्री, बहुतांश लोक सोशल मीडियावर क्रिकेटवर चर्चा करण्यात आणि त्या सामन्यातील खेळाडूकडून झालेल्या चुकीचे ब्रँडिंग करण्यात व्यग्र होते. सोमवारी सकाळपर्यंत त्याला ट्रोल करण्यात आले. तुम्हाला प्रश्न पडला असेल की रात्रभर झालेल्या या सर्व ट्रोलिंगकडे पाहत मी काय करत होतो? मी जागा होतो, कारण माझे नातेवाईक आणि मित्रांच्या जीवाला धोका होता. हो, ते बंगळुरूमध्ये होते आणि तिथे मुसळधार पाऊस पडत होता. मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि इतर अनेक राज्यांत अलीकडेच जसे झाले तसेच बंगळुरू जलमय झाले होते. तिथे राहणाऱ्या माझ्या एका माजी सहकाऱ्याने मला बंगळुरूमधील ‘एप्सिलॉन’ या एका उच्चभ्रू परिसराचे फोटो पाठवले.

ज्यांना हे ठिकाण माहीत नाही त्यांच्यासाठी सांगतो की, हा परिसर सिलिकॉन सिटीच्या सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्टपासून फक्त १३ किमीवर आहे. ही जागा इतकी सामान्य दिसते की तुमच्या-माझ्यासारख्या वाटसरूंचे क्वचितच लक्ष जाते. पण, तुम्ही बंगळुरूचे असाल तर या ठिकाणाबद्दल माहिती असेलच. येथे एक एकर जमिनीची किंमत ८० कोटी रु. पेक्षा कमी नाही. सर्वात छोटा व्हिलादेखील १० कोटींचा असेल आणि आकारानुसार दर बदलतील. येथेच बहुतांश अब्जाधीश राहतात. जुन्या काळातील लोकांमध्ये विप्रोचे अध्यक्ष अझीम प्रेमजी ते नवीन काळातील स्टार्टअप अब्जाधीश बायजूचे रवींद्रन येथे राहतात. ब्रिटानियाचे सीईओ वरुण बॅरी, बिग बास्केटचे सहसंस्थापक अभिनय चौधरी आणि ब्रँड जॉकी तयार करणाऱ्या पेज इंडस्ट्रीजचे एमडी अशोक जेनोमल हेही येथे राहतात. या यादीत १५० नावे असतील. हे ठिकाण रविवार-सोमवारच्या मध्यरात्री जणू निर्जन बेट झाले होते. कोट्यवधींच्या कार बोटी झाल्या होत्या. वीजपुरवठा खंडित आणि नळांना पाणी येणे बंद झाले होते. हे सर्व इथेच थांबले नाही. हे उच्चभ्रू लोक दुसऱ्या दिवशी नाइट ड्रेसमध्ये बोटीतून जवळच्या तारांकित हॉटेलांमध्ये जाताना दिसले. एकूणच रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे सीईओ, सीओओ, सीएफओ आणि व्हिला व महागड्या अपार्टमेंटमधील टॉप मॅनेजरसाठी ट्रॅक्टर, तात्पुरत्या बोटी आणि जेसीबी मशीन जीवनरक्षक ठरल्या! रविवारी रात्रीच्या पावसाने सोमवारी संध्याकाळपर्यंत अर्ध्या बंगळुरूला गुडघ्यापर्यंत पाण्यात बुडवले, हा ७५ वर्षांतील तिसरा सर्वात मोठा पाऊस होता. दृश्ये एखाद्या शोकांतिकेच्या चित्रपटासारखी होती. पाण्याच्या पंपांचे भाडे अचानक वाढले, इतकेच नाही, तर हॉटेलच्या खोल्या, बोटी, तराफे, जेसीबी, ट्रक, ट्रॅक्टर यांचेही भाडे गगनाला भिडले. इतर वेळी दुर्लक्षित लाकडी शिड्याही लोकांना अपार्टमेंटमधून काढण्यासाठी खरेदी केल्या गेल्या. एनडीआरएफने पाच हजारांहून अधिक लोकांना वाचवले आणि सहा हजारांहून अधिक पाळीव प्राण्यांना जीवदान दिले.

आपण क्रिकेटसारख्या मुद्द्यांवरून हवामान बदलामुळे होणाऱ्या आपत्तींकडे आपले लक्ष वळवले नाही, तर क्रिकेटही पूर्णपणे बदलून जाईल, असे मला वाटते. आत्ताचेच पाहा, दुपारी ३.३० वाजता होणाऱ्या आयपीएलची नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी निवडतो. तीव्र उष्णतेमध्ये एकाग्रता-निर्णय क्षमतेवर परिणाम होतो, हे त्यांना माहीत आहे. क्रिकेट खेळणारे बहुतांश देश तीव्र उष्णता, पूर, दुष्काळ, वादळ यामुळे त्रस्त आहेत.

फंडा असा ः जागरूकता निर्माण करण्यासाठी सोशल मीडियासह सर्व माध्यमांचा वापर करा आणि या पृथ्वीला हवामान बदलापासून वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा.

एन. रघुरामन, मॅनेजमेंट गुरू [raghu@dbcorp.in]

बातम्या आणखी आहेत...