आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा:शहराला हिरवे बनवण्याची जबाबदारी आपलीच.

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

.

रोज सकाळी मनाेज दीक्षित प्लास्टिकच्या कॅनमध्ये पाणी भरून रिंग रोडवर लावलेल्या कडुलिंब, पिंपळ आणि इतर झाडांना पाणी देताना दिसतात. या झाडांमुळे शहराला ऑक्सिजन मिळतो. हा ऑक्सिजन दीक्षित यांच्या घरात पाइपलाइनने जात नाही ते विशेष. पावसाळा सोडून ते सुमारे सहा वर्षांपासून रोज झाडांना पाणी देतात. फायदा आणि कुणाकडून सन्मानाची अपेक्षा न करता त्यांचे हे काम निरंतर सुरू आहे. त्यांचे अनेक मित्र उदा- मनोज भट्ट, श्रीवास्तव, मंडलोईदेखील त्यांना या फळदार झाडांना वाचवण्यासाठी मदत करत आहेत, जेणेकरून पक्ष्यांना त्यांचे खाद्य मिळावे. अनेक वर्षे पक्ष्यांना नैसर्गिकरीत्या खाद्य मिळत राहावे, त्यात माणसाने हस्तक्षेप करू नये, असा त्यांचा उद्देश आहे. लक्षात ठेवा, जिथे जिथे मानवाने देणारा (निसर्ग) आणि घेणारा यांच्यात हस्तक्षेप केला (इतर प्रजाती वाचा) तिथे लोभामुळे नैसर्गिक सुसंवाद बिघडला.

आणखी एक रहिवासी रेल्वेचे कर्मचारी राजेंद्र सिंह सेंद्रिय शेती करतात. पूर्ण वाढलेल्या झाडांभोवतीची प्रत्येक लोखंडी जाळी काढण्यासाठी ते प्रशासनाशी संघर्ष करतात आणि आजही हा संघर्ष सुरू आहे. महानगरपालिका सामान्यपणे रोपटे लावल्यानंतर ट्री गार्ड लावतात, मात्र काढणे विसरून जातात. ते एक मजेदार पण महत्त्वाची लढाई लढत आहेत. महानगरपालिकेने प्रौढ झाडांची मुळे आणि त्याचा पाया पेव्हर ब्लॉकने झाकून टाकला. त्यामुळे झाडाजवळ दोन बाय दोन फूट जागा शिल्लक राहावी यासाठी न्यायालयाच्या आदेशाने ते महापालिकेकडे जातात. मला एक मजेदार प्रकरण आठवले. इंदूरमध्ये यशवंत क्लब रोड क्लब नावाने एक प्रसिद्ध रस्ता आहे. तेथे शहरातील श्रीमंत आणि प्रसिद्ध लोक फिरतात. त्या रस्त्यावर काही न्यायाधीशांची घरेही आहेत. या सर्व श्रीमंत-प्रसिद्ध लोकांसाठी महानगरपालिकेने झाडांसाठी एक इंच जागा न सोडता फुटपाथचे काँक्रिटीकरण केले. त्यासाठी राजेंद्र सिंहने दीर्घ लढाई लढली आणि प्रत्येक झाडाच्या तळापासून सिमेंट काढून टाकले. आज तुम्ही त्या रस्त्यावरून गेलात तर तुम्हाला नक्कीच तो रस्ता हिरवागार दिसेल.

या गुरुवारी मला हे दोन किस्से आठवले, जेव्हा मी देवी अहिल्याबाई विद्यापीठाची एक बातमी वाचली. येथील विद्यार्थ्यांनी सीड बॉल (बियांचा बॉल) बनवणे सुरू केले आहे, जेणेकरून पावसाळ्यात इंदूरच्या जवळपास ते लावले जातील.

पावसाळा सुरू होण्याच्या आधी एक लाख सीड बॉल तयार करण्याचे त्यांनी ध्येय ठेवले आहे. हा खूपच चांगला विचार आहे. कारण त्या सीड बॉलपैकी १० टक्के जरी बिया उगल्या तरी या मुलांकडून दहा हजार झाडे लावली जातील. त्यामुळे पक्ष्यांना घर आणि फळे मिळू शकतील. शिवाय स्थानिक लोकांनाही त्याचा फायदा होईल. त्यांना मोठ्या प्रमाणात हिरवळ आणि ऑक्सिजन मिळेल.

मात्र विद्यापिठातील काही झाडे अजूनही ट्री गार्डमध्येच आहेत याचे मला दु:ख वाटले. त्यामुळे झाडे वाढत नाहीत, अनेक ट्री गार्डमुळे रोपटी तुटतात. माझ्यावर विश्वास नसेल तर त्या भव्य कॅम्पसमध्ये जाऊन पाहा. मी इंदूरच्या प्रवासात नेहमी तेथे जातो. पुढे चालून ही झाडे कमी वयातच दम तोडतील. त्यामुळे मला एकदम ट्री-वॉरियर राजेंद्र सिंह यांची आठवण झाली आणि मी त्यांना मदतीसाठी फोन केला. त्यांनी लगेच सीएम हेल्पलाइनमध्ये तक्रार केली. काही तासांतच अधिकाऱ्यांनी यावर ते काढण्याचे आश्वासन दिले. - फंडा असा की, हवामान बदलाचे गंभीर संकट दार ठोठावत असताना आपल्या मुलांना निरोगी आणि स्वच्छ पृथ्वी देण्यासाठी आपल्याला एकत्र यायला यावे.

एन. रघुरामन मॅनेजमेंट गुरू raghu@dbcorp.in

बातम्या आणखी आहेत...