आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • It Was Necessary To Spend On Agricultural Research | Agralekh Of Divya Marathi

अग्रलेख:शेती विषयक संशोधनावर खर्च करणे झाले गरजेचे

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी विविध अनुदाने, कर्जमाफी, वीज बिल आणि खतांच्या किमतीत कपात, थेट खात्यात पैसे, एमएसपी, स्वस्त आणि शेतकरी-मजुरांना मोफत रेशन आणि उदरनिर्वाहासाठी मनरेगाची व्यवस्था आहे, पण तरीही स्थिती सुधारत नाही. वरील बाबींवर सरकार एकूण साडेपाच लाख कोटी किंवा देशाच्या बजेटच्या १४ टक्के खर्च करते.

याउलट कृषी संशोधनावर केंद्र आणि राज्य सरकारचा एकत्रित खर्च जीडीपीच्या केवळ ०.६ टक्के आहे, तो इतर विकसनशील देशांच्या तुलनेत अडीच ते चारपट कमी आहे. एक रुपया कृषी संशोधनात खर्च केला तर त्याच्या ११.२ पट नफा मिळतो, हे गणिताने सिद्ध झाले आहे, तर वरील सर्व सबसिडी इत्यादींच्या हेडमध्ये दिलेला प्रत्येक रुपया त्याच्या किमतीपेक्षा (साधारण तीनचतुर्थांश) परतावा देतो. शिवाय, शेतकऱ्यांचा मोठा समाज उत्पादन आणि उत्पादकता वाढवण्याबाबत उदासीन आहे. निवडणुका आल्या तर हे सर्व माफ होईल या आशेने ते थकीत बिले व कर्जे भरत नाहीत. ज्या काळात देशात अन्नधान्याची मागणी आहे आणि निर्यातीची दारे खुली आहेत, अशा वेळी उत्पादनाला जागतिक बाजारपेठेत स्पर्धात्मक बनवण्यासाठी संशोधनावरील खर्च वाढवण्याची गरज होती.

बातम्या आणखी आहेत...