आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेल्थवेल्थ:‘दिल का मामला है...’

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयुर्वेदाने माणसाच्या शरीर प्रकृतीचं वात, पित्त आणि कफ या तीन भागात विभाजन केलंय. आपली प्रकृती तज्ज्ञांंकडून समजून घेऊन त्याप्रमाणे आहार-विहार आणि दिनचर्या ठेवणे आयुर्वेदशास्त्रामध्ये अपेक्षित आहे. या लेखाचा प्रपंच यासाठीच आहे की, प्रत्येकाने स्वत:ची शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक प्रकृती समजून घ्यावी. कारण हे आपल्याला होणाऱ्या आजारामागचे एक मुख्य कारण असू शकते. जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्याची व्याख्या केलीय की, माणूस शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक आणि अाध्यात्मिक पातळीवर सुस्थिर असेल तर ती व्यक्ती आरोग्यसंपन्न असते.

शारीरिक पातळीवर व्यायाम करणे, चालणे, पळणे, सायकल चालवणे, योग्य तो आहार घेणे याचे पालन करूनही अनेकांना हृदयविकार होतो. व्यायाम ही प्रत्येकाची गरज आहे. परंतु अति व्यायाम करताना नाडीचे ठोके वाढतात, श्वास वाढतो, दम लागतो, घाम येतो. त्यामुळे व्यायाम गरजेपुरताच करावा. मनुष्य एका मिनिटामध्ये १६-१८ वेळेस श्वास घेतो. माणसाच्या हृदयाचे ठोके एका मिनिटामध्ये ७२ वेळा पडतात. ज्या वेळी श्वासांची गती मिनिटाला २५ ते ३० होते अशा वेळी व्यायामाची आपली गती कमी करावी. अशा वेळी दीर्घ श्वसन करावे. लांब लांब श्वास घ्यावेत. योगशास्त्रात आम्ही दीर्घ श्वसन शिकवतो. म्हणजे लांब श्वास घ्यायचा आणि तितक्याच संथ रीतीने सोडायचा. ते महत्त्वाचे आहे. राग आल्यानंतर किंवा भावनाविवश झाल्यावरही असाच श्वास वाढतो. त्या वेळीही दीर्घ श्वसन करावे. प्रत्येक व्यक्तीने हे श्वसन शिकून त्याचा दैनंदिन जीवनात अवलंब केला पाहिजे. श्वास आणि मन याचा जवळचा संबध आहे. श्वासावरील नियंत्रणाला प्राणायाम म्हणतात..

हृदयावर ताण येणारी आणखी एक बाब म्हणजे ताण आल्यानंतर त्याचा परिणाम जास्त वेळ राहणे म्हणजे एखादी गोष्ट लवकर स्वीकारता न येणे. जोपर्यंत आपण ती गोष्ट स्वीकारत नाही तोपर्यंत आपले स्नायू आकुंचित राहतात. त्यामुळे शरीरातील हार्मोन्स पातळी विस्कळीत होते, पचनक्रिया बिघडते. म्हणून फक्त व्यायामच करू नका तर दुखावलेल्या हृदयासाठी संवाद साधा. मी विसरू शकत नाही असे म्हणण्यापेक्षा ‘मला विसरायचे आहे’ असे म्हणा. सकारात्मक संवाद खूप चांगले बदल घडवताे.

चेस्ट एक्पांडिंग ब्रीदिंग महत्त्वाचे आहे. ते प्रशिक्षित व्यक्तीकडून शिकून घ्या. आपल्या उजव्या मेंदूचे कार्य तणावाचे नियोजन करणे, नवीन गोष्टीचा शोध घेणे, असे असते. त्यासाठी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास घ्या आणि सोडा. असे किमान ११ वेळा करा..श्वास घेताना आणि सोडताना लांब श्वास घेणे आणि सोडणे अशी सवय लावा. डावा मेंदू हिशेब, गणिताचा असतो. आपण कोणासाठी काय केले आणि त्याने आपल्याला रिटर्न काय दिले? या हिशेबात डावा मेंदू जास्त राहिला की ताण वाढत जातो आणि हृदयावर ताण वाढतो आणि रक्तदाब सोबतीला येतो. मेंदूच्या रिलॅक्ससेशनसाठी आयुर्वेदातील नस्य म्हणजे नाकात झोपताना दोन थेंब घरी बनवलेले तूप आठवड्यातून दोनदा टाकावे. मनातील क्रोध, राग या नकारात्मक भावना दूर झाल्या पाहिजेत त्यासाठी ‘त्राटक’ ध्यानसाधना म्हणजे अश्रू वाटे ताण निघून जातो. योगनिद्रा, शिथिलीकरण तंत्र शिकून घ्यावे. मला शांत होता आले पाहिजे. आवाहने इतकीच स्वीकारा की ज्यामुळे शरीर मनावर ताण येणार नाही.. प्रत्येक जण आपल्यावर खुश राहील अशी आशा करू नका आणि प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न ही करू नका.

डॉ. चारुलता रोजेकर संपर्क : ९४२३७४५७८८

बातम्या आणखी आहेत...