आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Jack Got Fired By The Same Company He Built To The Tune Of 25 Lakh Crores; Empire Destroyed In 2 Years

दिव्य मराठी विशेष:जॅकने 25 लाख कोटींची जी कंपनी उभारली त्याच कंपनीने काढून टाकले; 2 वर्षांत साम्राज्य उद्ध्वस्त

बीजिंगएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जॅक मा यांनी जगातील सर्वात मोठ्या फिनटेक कंपन्यांपैकी एक असलेल्या अँट ग्रुपची मालकी गमावली. २४ वर्षांपूर्वी स्वत: स्थापन केलेल्या कंपनीने जॅकला कामावरून काढून टाकले आहे. आता त्यांच्याकडे या कंपनीत फक्त ६.२ % मतदान हक्क शिल्लक आहे. जे दोन वर्षांपूर्वी ५०% होते. समूहातील त्यांची हिस्सेदारीही १०% पर्यंत खाली आली आहे.

चिनी महाकाय ई-कॉमर्स कंपनी अलीबाबाची मूळ कंपनी अँट ग्रुप २०२० मध्ये २०० अब्ज डॉलर (रु. १६.४५ लाख कोटी)ची कंपनी होती.नोव्हेंबर २०२०मध्ये जॅकने अँट ग्रुपचा आयपीओ जाहीर केल्यानंतर कंपनीचे मूल्यांकन ३१५ अब्ज डॉलरपर्यंत (रु. २५.९१ लाख कोटी) वाढले. त्यानंतर २.८० लाख कोटींच्या संपत्तीचा मालक जॅक जगातील पाचवे आणि आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती होते. आता ते जगात ३४व्या क्रमांकावर आहे. आयपीओ आणल्यानंतर त्यांचा चीन सरकारशी वाद झाला. त्यानंतर जॅकच्या अटकेची आणि त्याच्या बेपत्ता झाल्याची बातमी आली. ताज्या माहितीनुसार ते टोकियोमध्ये आहेत.

आयपीओच्या घोषणेनंतर सुरू झाले वाईट दिवस
अँट ग्रुपने २०२० मध्ये ३.०४ लाख कोटी रुपयांचा जगातील सर्वात मोठा आयपीओ आणण्याची घोषणा केली. चीन सरकारसोबतच्या वादामुळे ते थांबवण्यात आले होते. यानंतर अँट गटात अनेक बदल झाले. कंपनीला२२६०० कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. पेमेंट अॅप ‘अली पे’साठी कॅश लिक्विडिटी रेशो २.५५ लाख कोटी रुपये करण्यात आले आहे. मक्तेदारी विरोधी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी चीनने कारवाई केली.

एखाद्या चित्रपटासारखी आहे जॅक मा यांच्या संघर्षाची कथा
जॅकचा जन्म १९६४ मध्ये एका गरीब कुटुंबात झाला. १९८८ मध्ये पदवी प्राप्त केली. ३० ठिकाणी नोकऱ्यांसाठी अर्ज केले पण नाकारले गेले. केएफसीत नोकरीसाठी मुलाखती घेतलेल्या २४ लोकांपैकी फक्त जॅकना नाकारले. हार्वर्डमध्ये प्रवेश घेण्यासाठी १० वेळा प्रयत्न केले, परंतु प्रत्येक वेळी अपयशी ठरले. अखेरीस, हेंगझाऊ कॉलेजमध्ये इंग्रजी शिकवण्यास सुरुवात केली आणि १९९९ मध्ये अलीबाबाची पायाभरणी केली.

बातम्या आणखी आहेत...