आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनमार्ग:यावर्षी स्वतःला दुर्गुणमुक्त ठेवा

औरंगाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

या नवीन वर्षात चिरंजीव व्हा. जो मरत नाही तो चिरंजीव, असा त्याचा शाब्दिक अर्थ आहे. पण, यावर्षी आपण चिरंजीवचा अर्थ असा घेऊया की, आपण मृत्यूच्या ओझ्यातून मुक्त होऊ आणि आपले जीवन शापित नसेल. या दोन्ही परिस्थिती शास्त्रातील सात पात्रांनी निर्माण केल्या आहेत. हे सात चिरंजीव म्हणजे बळी, परशुराम, हनुमान, बिभीषण, व्यास, कृपाचार्य आणि अश्वत्थामा. या प्रत्येकामध्ये एक साम्य आहे. हे सर्व ऑफ बीट अॅक्टिव्हिटीसाठी ओळखले जात होते. तथापि, काही झाडे आणि प्राणीदेखील चिरंजीव आहेत. पण, या सात जणांवर नजर टाकली तर त्यांनी आयुष्यात जे प्रयोग केले ते आपणही करू शकतो. यावर्षी जीवन शापित नसेल याचा अर्थ वाईट गुणांपासून मुक्त राहा. मृत्यूच्या ओझ्यातून मुक्त होणे म्हणजे भीतीपासून मुक्त होणे. या सात जणांचे वैशिष्ट्य म्हणजे ते निर्भय होते. यावर्षी परिस्थिती अशी होऊ शकते की, लॉकडाऊन लागेल, मग कोविड पसरेल, असे वाटते. आपण निर्भय, दुर्गुणमुक्त राहिलो तर यावर्षी तरी आपण चिरंजीव आहोत.

पं. िवजयशंकर मेहता humarehanuman@gmail.com

Facebook:Pt. Vijayshankar Mehta

बातम्या आणखी आहेत...