आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हास्यक्लेमर:हास्यरंगात भिजली शब्दमार होळी

छत्रपती संभाजीनगर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कंटेंट होळीच्या आनंदासाठी लिहिला गेला. उद्देश एवढाच की सर्व मिळून हसूया. हा कंटंेट वाचताना भावना दुखावून घेऊ नका आणि...लॉजिकपासून दूर राहा...

राहुल गांधी
मंदिरांशी, त्रिपुंडाशी, जानव्याशी आमचे नाते दिखाऊ, भावनिक नाही
मोदीजी बघा, आम्हाला तुमच्यापेक्षाही जास्त दाढी वाढवता येते.

योगी आदित्यनाथ
एक दिवस इतिहास सर्व सांगेल, ५०-५० कोस दूरपर्यंत जेव्हा एखादा गुन्हेगार गुन्हा करत होता, तेव्हा आई म्हणत होती, बेटा सुधर, नाही तर बुलडोझर येईल..

अशोक गहलोत
काही रिकामटेकट्यांमुळे संमोहन भंग होते. प्रत्येक पेपर कोणी ना कोणी लुटून नेते विश्वास ठेवा धोकेबाजांनी कारागृह भरेन/ जादूगर आहे, सर्व व्यवस्थित करेन

ऋषी सुनक
एक विदेशी इंडियन त्यांचा राजकीय चॅम्पियन झाला आहे,
त्यांचे क्लब म्हणत होते डॉग्ज आणि इंडियनला मनाई आहे
वेळेचे धुके खरेच खूप गडद असते

शाहरुख खान
विरोधाचे ग्लोबल वॉर्मिंग आणि घोषणांची गरमी चुलीत गेली /हजार कोटींवर कमावले- आपल्या रंगाच्या बेशरमीने

जावेद अख्तर
पाकिस्तानला तिथे जाऊन समजावून सांगितले आम्ही किती ओळखतो.. जानी, हम डायलॉग लिखना ही नहीं, डायलॉग मारना भी जानते हैं

अमिताभ बच्चन
महानायक होणे सोपे नाही, आगीच्या डोंगरातून जावे लागते/ यकृत खराब असले तरी नमकीनची जाहिरात करावी लागते...

रणवीर सिंह
माणसाने नेसावा लहंगा वा सूट अन् करावे न्यूड फोटोशूट
एवढी चर्चा, इतकी गरमी का/ महागाईत कुणी शिंप्याचे पैसे वाचवत असेल तर जळफळाट का?

नरेंद्र मोदी
अंधाराला चीड येतेय
की आम्ही सर्वांच्या
हाती मशाली का दिल्या?
लोक नोटबंदीवर रडत राहिले आणि आम्ही जी-20 तही कमळ फुलवले...

बातम्या आणखी आहेत...