आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनमार्ग:पैसा कसे काम करतो ते शिका

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैसे कसे कमावायचे याचे जगात हजारो मार्ग आले आहेत. पण एका छोट्या गोष्टीत बहुतेक लोक चुकतात, ती म्हणजे पैसा कसे काम करतो? ही समजही खूप महत्त्वाची आहे. यालाच आर्थिक शिक्षण म्हणतात. पैसा कमावण्याचा हेतू वाईट नसतो, पण बहुतांश लोक भरकटतात. अमृत ​​काढण्यासाठी जसे समुद्रमंथन केले होते. त्यातून १४ रत्ने निघाली. लोक अमृत विसरले, लक्ष्मीवरच केंद्रित राहिले. असे भरकटणे एखाद्या चांगल्या हेतूलाही बिघडवते. त्यामुळे मिळेल तेथून पैसा कसे काम करतो, याची माहिती घ्यावी. पैसा कमावायला बाहेर जातो तेव्हा हळूहळू पैसा कसा काम करतो, याची समज स्वतःत विकसित करावी. जसे लोक धर्मगुरूंकडे जाऊन विचारतात - देव आहे की नाही? तेव्हा ते होय किंवा नाही, असे उत्तर देतात. याला प्रश्नांची उत्तरे हवी आहेत की समस्यांचे निराकरण, हे धर्मगुरूंना माहीत असते. कारण प्रश्नाचे उत्तर गुरू देऊ शकतात, पण त्यावर उपाय आपल्यालाच शोधावा लागेल. याप्रमाणे इतर लोक पैसे कसे कमावायचे हे सांगू शकतील, परंतु पैसा कसे काम करतो, हे आपल्यालाच शिकावे लागेल.

पं. िवजयशंकर मेहता humarehanuman@gmail.com

Facebook:Pt. Vijayshankar Mehta

बातम्या आणखी आहेत...